शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

AI चा बटवा कोणती क्रांती घडवेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 16:58 IST

आज क्रांतिदिन. क्रांती आपल्या अवतीभोवती घडते आहे. आपण नव्या क्रांतीचे साक्षीदार आहोत. वैद्यकीय क्षेत्रात अशी क्रांती होतेय. कोण करतंय? कृत्रिम बुद्धिमत्ता.

ठळक मुद्देवैद्यक क्षेत्रातही ‘आजीबाईचा बटवा’ जाऊन एआयचा बटवा येण्याची क्रांती होते आहे!!

- डॉ. भूषण केळकर

आपण मागच्या लेखात एआयचे कला/साहित्य क्षेत्रात काय परिणाम होतील ते पाहिलं. या पुढील काही लेखात आपण एआयचे अन्य अनेक क्षेत्रात काय परिणाम व तद्नुषंगिक स्थित्यंतरं होतील ते पाहू. आजच्या आपल्या संवादात आपण एआयचे वैद्यकीय क्षेत्रातील उपयोग व परिणाम बघू.दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतील मुलांसाठी कॅलिफोर्निया व न्यू जर्सीमध्ये करिअर काउन्सिलिंग करताना प्रकर्षाने जाणवलं की वैद्यकीय क्षेत्रातील विशेषतर्‍ पॅथॉलॉजी व रेडिओलॉजी या उपशाखांबाबत करिअर करणं धोक्याचं आहे, असा तेथील डॉक्टर, पालकांचा ठाम विश्वास दिसला. मला फार धक्का बसला नाही कारण मी स्वतर्‍च अशा तंत्रज्ञानावर आयबीएममध्ये असताना काम केलंय.‘ट्रायकॉर्डर’ नावाचं  अंगावर बाळगता येईल असं छोटं उपकरण हे  एआय, क्लाउड, बिग डाटा, अ‍ॅनलिटिक्सचा वापर करून आजमितीला रक्त, घाम, रेटिना स्कॅन वगैरे विश्लेषण करून तुमची आरोग्यस्थिती घरबसल्या सांगतो. पॅथॉलॉजी लॅबची गरज नाही! एवढं छोटं उपकरण किती गोष्टी मोजतो तर ‘अब तक छपन्न.’ आरोग्याची जणू ‘स्विस नाइफ’ वाटावी असं उपकरण! नुसती सोयच नव्हे तर हे उपकरण पॅथॉलॉजी लॅबपेक्षा अधिक अचूकतेनं  56 गोष्टी मोजतं आणि विश्लेषण करतं असे सध्याचे अहवाल आहेत!रेडिओलॉजीचं उदाहरण घेतलं तर डीप लर्निग व बिग डाटा (ज्याचा ऊहापोह आपण याच लेखमालेत आधी केलाय.) यांचा वापर करून लाखो इमेजेसचा अभ्यास करून आजकाल प्रख्यात रेडिओलॉजिस्ट्सपेक्षा अधिक अचूक व क्षणार्धात रोगनिदान करताहेत, आयबीएम वॉटसन सारखी मशीन्स! क्षयरोगाचं निदान हे 96 टक्के अचूक केलं जातंय साध्या मशीन्सद्वारे!मी स्वतर्‍ आयबीएममध्ये असताना डायबेटिक रेटिनोपथी (मधुमेहामुळे अंधत्व येणं) याचे रोगनिदान लुइझियानामधील  खेडेगावासाठी आणि आपल्या ईशान्य भारतीय जनजातींसाठी केलंय, तेही 2010 मध्ये! आता तर ते तंत्रज्ञान अजून विकसित असणार हे उघड आहे!दिल्लीमधल्या काही शल्यचिकित्सा व शस्त्रक्रियासुद्धा प्रख्यात हॉस्पिटलमध्ये रोबॉटिक्सद्वारा होत आहेत. अगदी मायक्रो सजर्रीर्पयत! रोबॉटिक्स म्हणजे इंडस्ट्री 4.0चाच भाग हे आपण जाणतोय!2006 मध्ये मी एआय वापरून क्लीव्हलॅण्ड क्लिनिक या ओहायो प्रांतात हृदयरोगावर काम केलं होतं. त्यात नुसतं अचूक निदान हा भाग नव्हता, तर असलेल्या माहितीचा वापर करून काही पूर्वी दृग्गोचर नसणारे व काही आश्चर्यकारक निष्कर्ष आम्ही काढू शकलो होतो. ज्यामुळे तेथील डॉक्टर्स चकित झाले होते. आता बघा त्यालाही एक तप लोटलं आहे!!कर्करोगावरचे संशोधन हे प्रचंड आहे. 5.5 कोटींपेक्षा अधिक शोधनिबंध असणारं हे क्षेत्र एआय वापरणारा संगणक सहज ‘खाऊ’ आणि ‘पचवू’ शकतो! त्यातून कर्करोगाचे नुसते निदान नव्हे तर त्यावर मात करण्याच्या दिशेने, रेडिएशन शस्त्रक्रिया किंवा अलीकडील ‘डॉमा नाइफ’’ या तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊन, नॅनोरोबॉट्सच्या साहाय्याने आत्यंतिक अचूकतेने ‘स्थानिक’ पातळीवर दुरुस्त्या, शस्त्रक्रिया करतो की ज्यामुळे रुग्णाला त्रास कमी होतो व जीवनमान सुसह्य होतं.हेच काय तर ज्याला इन्फॉर्मेशन बेस्ड मेडिसिन म्हणतात की ज्यात नुसतेच वैद्यकीय/लक्षणं व पॅथॉलॉजीचीच माहिती विचारात घेतली जात नाही तर जनुकीय माहिती  वापरली जाते. ती शाखा तर जणू एआयवरच आधारित आहे. त्याविषयी आपण विस्ताराने पुढील भागात ऊहापोह करू.मानवी देह हा सीमित आहे. आपल्याला सगळं माहिती आहे असं म्हणून आपणं जर सांगत राहिलो की वैद्यकीयशास्त्र परिपूर्ण आहे, तर तो भ्रम ठरेल. परवाच एका नव्या मानवी अवयवाचा शोध लागला. त्याचं नाव इंटरसिशियन. हे आपण वाचलं असले.!आज 9 ऑगस्ट या क्रांती दिनाला हा लेख वाचताना लक्षात ठेवू की वैद्यक क्षेत्रातही ‘आजीबाईचा बटवा’ जाऊन एआयचा बटवा येण्याची क्रांती होते आहे!!आपण सर्वच त्याचे साक्षी आहोत!!