शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
2
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
3
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
4
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
5
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
6
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
7
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
8
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
9
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
10
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
11
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
12
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
13
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?
14
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
15
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
16
प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
17
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड
18
First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम
19
तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?
20
IPL- एक ‘डॉट बॉल’ पडला, की लागतील ५०० झाडे!

reskilling & upskilling म्हणजे नक्की करायचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 17:58 IST

कौशल्याच्या कक्षा रुंदावा तरच रिलेव्हण्ट राहाल, असं पंतप्रधान सांगतात.

ठळक मुद्देआपलं काम वरच्या स्तरात नेण्याचा, दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करणं. 

जागतिक युवा कौशल्य दिवस आणि स्किल इंडियाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (बुधवारी) तरुणांना एक व्हिडिओ संदेश दिला. त्यात ते म्हणतात, जगात अशाच माणसांना यश मिळतं जे सतत नवनवीन स्किल्स शिकत राहिले, तेच जग जिंकू  शकले. नव्या काळात ‘रिलेव्हण्ट’ राहणं ही मोठी गोष्ट आहे त्यासाठी नवनवीन स्किल्स शिकत राहावी लागतील. कौशल्य ही आपणच आपल्याला दिलेली एक मौल्यवान भेट आहे. त्यासाठी ते तरुणांना एक संदेशही देतात. एक मंत्र सांगतात. स्किल, री-स्किल आणि अप-स्किल.हा मंत्र सोबत असेल आणि सतत कौशल्य शिकत, विस्तारत गेले तर अनेक संधी समोर येतील असं त्यांनी आपल्या व्हिडिओतून सांगितलं.यातलं स्किल अर्थात कौशल्य तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ‘कुशल’ कामगार मिळत नाहीत अशी तक्रारही वारंवार दिसते. त्यामुळे काम करण्यासाठीचं आवश्यक स्किल्स-कौशल्य यासह सॉफ्ट स्किल्सही शिकणं किती महत्त्वाचं आहे याविषयी नेहमीच चर्चा होते.मात्र री-स्किल आणि अप-स्किल करणं म्हणजे नक्की काय?साधं गुगल करून पाहिलं तरी याविषयात सध्या अनेक  संस्था, कंपन्या आपल्या कर्मचा:यांसाठी काम करत आहेत.

री-स्किलिंग  म्हणजे काय?1. पंतप्रधान म्हणाले तसं एक कौशल्य शिकलं, तेच कायम वापरलं असं करून चालणार नाही तर री स्किल म्हणजे आपण जे कौशल्य शिकलो आहोत, त्यात वारंवार सुधारणा करणं. 2. आपल्याला अवगत आहेत त्या कौशल्यात भर घालत त्यातून नव्या गोष्टी करणं. नव्या गोष्टी त्या कौशल्याला पूरक -पोषक म्हणून शिकणं. 3. आपण जे कौशल्य शिकलो, त्याच्याशी संबंधित कामच संपून जाईल अशी शक्यता याकाळात अधिक आहे. त्यामुळे अनेक कंपन्या त्याचा अंदाज घेऊन आपल्या कर्मचा:यांसाठी हे री-स्कि लिंग हल्ली करतात. 4.  आधीच्या कौशल्यासोबत नवीन कौशल्य शिकवून ते कामासाठी ‘रिलेव्हण्ट’ कसे राहतील, हातचं काम कसं जाणार नाही याचा विचार केला जातो.5. आपल्या कामात काय टेक्नालॉजी येऊ घातली आहे याचा विचार करून आपल्यासाठी नवीन स्किल शिकणं म्हणजे रि-स्किलिंग.

 

अप स्किलिंग  म्हणजे काय?

1. नवीन कौशल्य शिकून काम बदल करता येणंही शक्य आहे. रि-स्किलिंगमध्ये अनेकदा तेच होतं.2. आपल्याकडे जे कौशल्य आहे, जो आपल्या कामाचा विषय आहे त्यात आधुनिकता आणणं. 3. त्यातून आधी कधीच न केलेलं काम करून पाहणं, कामाची जबाबदारी घेत त्यात अधिक कल्पकतेनं, नव्या कौशल्यासह नवीन गोष्टी करणं आणि त्यासाठी एखादा अभ्यासक्रम शिकणं, नव्या पद्धती, तंत्रज्ञान शिकून घेणं 4. .. आणि आपलं काम वरच्या स्तरात नेण्याचा, दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करणं.