शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

युवा करें, तो करें क्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 07:00 IST

प्रयागच्या कुंभमेळ्यात तरुण गर्दीही भरपूर आहे. कुंभमेळा एकच असला तरी अनेकांची मतं आणि इथं येण्याची कारणं मात्र वेगळी आहेत. जो तो शोधतोय काहीतरी या गर्दीत. त्या शोधाचाच एक ‘शोध !’

ठळक मुद्देकुंभमेळ्याच्या गर्दीत भेटलेल्या तरुणांबरोबरच्या दिवसांच्या आठवणी

शर्मिष्ठा भोसले

कुंभमेळा सजतो तो साधूंमुळं, आखाडय़ांमुळं, गंगा-यमुनेच्या संगमामुळं. कुंभमेळा दिव्यकुंभ, भव्यकुंभ  बनतो तो भारतासह जगभरातून कुणीही न बोलावता इथं येणार्‍या माणसांमुळं. अध्यात्म, पाप-पुण्य, मोक्ष म्हणलं, की डोळ्यासमोर येणारी गर्दी साधारणतर्‍ बुजुर्ग लोकांची असते. पण कुंभातल्या गर्दीत मात्र तरुणही लक्षणीय प्रमाणात दिसतात. यूपी, बिहार, बंगाल, मध्य प्रदेश अशा भागांतून सध्या प्रयागच्या अर्धकुंभाला भरपूर तरुण आलेत.कुंभातल्या जत्रेला आलेल्या या तरुणांशी गप्पा मारल्या, सध्याचा समाज, राजकारण, संस्कृती याबाबत त्याला काय म्हणायचंय असं बोलत बोलत निघाले.अलोपी बाग चौराहापासून कुंभमेळा परिसरात एण्ट्री करता येते. गर्दीचा अखंड ओघ तिथल्या रुद्राक्षद्वारमधून आत वाहतो. तिथंच एका रिक्षात काही तरुण निमूट बसलेले दिसतात. मी त्यांच्याशी बोलू पाहते तेव्हा कळतं, की यांनी मेला परिसरात इ-रिक्षा चालवण्याचं टेंडर भरलंय. मी विचारते, फीर दिक्कत क्या हैं? त्यावर रवि सिंग म्हणतो,  अरे मैडम क्या बतायें, जब टेंडर भरा था तो मेला प्राधिकरणने बताया था के मेला परिसरमें सिर्फ आप टेंडर भरनेवालोंकीही रिक्षा चलेगी. पर अबतो बाहरसे कोईभी रिक्षा अंदर आ रही हैं, हमारा पैसा तो निकालेगा नही. बार बार बोलनेपरभी हमारा कोई नहीं सून रहा!’ - रविसोबत शाम विश्वकर्मा, सुनील यादव, रंगनाथ दुबे आहेत. ते मान डोलावतात. 150 इ-रिक्षा सध्या मेला परिसरात सुरू आहेत. तेवढय़ात एक रिक्षावाला येतो. दोघेजण उतरतात.  त्यात दोघं जण भेटतात. दोघं लखनऊहून कुंभमेळा अनुभवायला इथं आलेत. हरदीप म्हणतो,  मेला तो बहुत चकाचौंधवाला है. पर पैसा तो हमारीही जेबसे जा रहा हैं ना? हमने इनको वोट देकर हमारी जेबमें हाथ डालनेका हक तो नही दिया ना? यूपीमे योगी सरकार एकदम घाटिया काम करा रही है। मै यूपीएसआयकी परीक्षा पास हुए तीन साल हो राहे. मेडिकल राउण्ड, पोस्टिंग, किसका कुछ पता नाही. मेरे जैसे हजारो युवा है। करें क्या? पिछली सरकार कमसकम धरणा तो देने देती. ये सरकार दहशत दिखाती है!’’इलाहाबादच्या जवळ राहणारा नैनीचा जितेंद्र यादव मेळ्यात फुलं-प्रसाद विकतो. त्याला मात्र मेळ्यातली रोशनाई आणि भव्यता खूप आवडलीय. मोहित मूळचा काश्मीरचा आहे. इलाहाबादला गेल्या चार पिढय़ांपासून त्याचं कुटुंब येऊन वसलंय. वडील ठेकेदार आहेत. त्यानं 2013 साली इलाहाबादला झालेला कुंभही बघितलाय. तो म्हणतो, यावेळची रौनक काही औरच आहे. जनतेच्या आस्थेचे विषय सरकारला गांभीर्याने घ्यावेच लागतात. ही लोकशाही आहे. त्रिवेणी संगमावर होणारा इलाहाबादचा कुंभ खरोखरच महत्त्वाचा आहे. त्याची जाहिरात जगभर झाली, त्यावर कोटय़वधी रुपये खर्च केले तरच भारताचं जगात नाव होईल. मोदी-योगी आल्यापासून भारताची शान जगात उंचावलीय !’ तो हरखून सांगत असतो. श्वेता निशब्द, वैशाली गर्ग, जानकी आणि बरखा या चौघींनी टीव्हीवर सतत जाहिराती बघून कुंभला यायचं असं ठरवलं. इथं वेळ घालवणं, भटकणं त्यांना आवडतं. चौघीही बारावीला आहेत. बरखा म्हणते, इतकी पोलीस यंत्रणा तैनात केलीय की आम्हाला अजिबात असुरक्षित वाटत नाही. आम्ही इलाहाबादच्या जवळ असलेल्या अल्लापूर भागात राहतो. आई-वडिलांनीही आम्हाला चौघींना यायला परवानगी दिली. एरवी सातनंतर आम्ही घराबाहेर पडत नाही. छेडछाड खूप होते. यूपीमधला माहोल मुलींसाठी अजिबात चांगला नाही. आम्हाला उच्चशिक्षण घ्यायचंय; पण आई-वडील आमचं बारावीनंतर लग्न लावून देतील. म्हणतील, ससुराल जाकर पढ लेना. त्यांना काहीतरी बरंवाईट घडण्याची भीती असते ना!’ चहाच्या ठेल्यावर भेटलेले रितेश मिश्रा आणि सचिन द्विवेदी बी.ए. करत स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. दोघे मिर्जापूरचे आहेत. रितेश म्हणतो, योगी सरकार युवाओके शिक्षा और रोजगारके लियेतो कुछ नही कर रही. पर ब्रॅण्डिंग बहुत करती है। इसलिये बाहरी लोग झांसेमें आ जाते है. अब देखो मोदी सरकारने सवर्णको दस टका आरक्षण दिया. पर नोकरीयां हैं कहां?  ये हमारा यूपी ना मैडम, बेरोजगारोंका मुल्क है. लोग कहते हैं गुंडई बहुत है. अब रोजगार ना मिले तो कोई क्या करे? गरम खून हैं, हाथमें कट्टा ले लेगा. बिधायक लोग उसका इस्तमाल सस्तेमे कर लेत है. जरु रत खतम हो तो बाजू कर देंगे.’ यूपीचा एक तरुण अस्वस्थ चेहरा प्रातिनिधिक व्यथा सांगत होता. स्वरूप सिन्हा बिहारच्या दरभंगाहून आलाय. स्वरूप सांगतो,  मेरा लाइिटंगका बिजनेस है. कामके सिलसिलेमें हमेशा इलाहाबाद आते रहता हूॅँ. पर इसबार आया तो चौंक गया. शहरका सौंदर्यीकरण बहुत गजबका करवाया हैं योगीजींने. एकदम बढिया! इससे पहले यहां 2001 और 2013 में कुंभ हुआ था. पर इसबारकी तैयारी कई गुना बेहतर है. ये तो पुरे देशके लिये अभिमानकी बात है. योगी-मोदीजी भारतके सच्चे सुपुत्न हैं. 2019 में भी जनता उन्हीको चुनके देगी.’एमपीच्या रिवा गावातून आलेला सचिन पाल मात्र शहराच्या रंगरंगोटीकडे वेगळ्या नजरेनं बघतो. ‘ये भारत है. किसी एक धर्मके एक रंगके बल पर नहीं चलेगा. मुझे इस तरह शहरका भगवाकरण करना अच्छा नही लगा. शहरका नाम प्रयागराज बदलनेसे नागरिकोंका भविष्यतो नहीं बदल जायेगा. फार कोई नई सरकार आकर और दुसरा नाम राख देगी. विकासके मुद्देतो इसमे कही नहीं हैं!’दुर्गा आणि इशिता फोटो देणार नसल्याची अट घालत माझ्याशी बोलतात. त्या बदोही गावात राहतात. त्यांच्या मते,  यूपी महिला आणि मुलींच्या प्रगतीसाठी अनुकूल नसलेलं राज्य आहे. इथली गुंडागर्दी, निरक्षरता आणि स्रियांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बाईचं जगणं खूप अवघड बनवतो. शिकणारी, काम करणारी महिला अजूनही इथल्या लोकांच्या पचनी पडत नाही. लोक कितीही धार्मिक असले तरी सुसंस्कृत मात्र नाहीत!’ त्या म्हणतात ते खोटं नाही, विशेष म्हणजे मलाही यूपीत फिरताना काही अपवादवगळता बहुतेकदा हाच अनुभव आला.बडे हनुमानजी मंदिराच्या बाजूला, दारागंज नावाची वस्ती आहे. तिथं कनिष्ठवर्गीय लोक कच्ची घरं आणि झोपडय़ांमध्ये राहतात. मृतदेहावर अंतिम संस्कार करणारा डोम समाज याच वस्तीत राहतो. राहुल राज, विशाल राज, आकाश, मोनू निषाद हे तरु ण वस्तीत भेटले. विशाल म्हणतो, कुंभ पवित्रता और श्रद्धाका उत्सव है. पर कुंभमें हमारे खाने-पिनेके लाले पड जाते है. दसास्वमेध घाटपर मुर्दा जलाना दो महिना बंद हो जाता है. फिर क्या करे हम? हम पिछडे हुए, निचली जातीके लोग है. हमारे उपर हाथ रखनेवाला कोई नही. 50-60 लोग इस व्यवसायसे जुडे है. सालभर रोज सिर्फ 10-15 बॉडी जलाने के लिये आता है. गरिबी बहुत हैं हमारे समाजमे. शिक्षाका अवसर नही. यही करते हुए जीना हैं फिरतो!’ कुंभमेळ्याचा हा असा आसपासच वावरणारा अदृश्य चेहरा. अपवित्र, अशुभ म्हणवणारा!   जर्मनीहून आलेली क्रि स्टीन आणि जेम्स वाराणसीला आठवडाभर राहून कुंभाचा मुहूर्त साधत प्रयागराजला आलेत. जेम्स म्हणतो, इतकी सगळी लोकं  हजारो किलोमीटरवरून केवळ गंगेत स्नान करायला इथं येतात हे केवळ भारतातच घडू शकतं. हे सगळं बघून आम्हा दोघांना खूप ऊर्जा मिळते. कुंभमेळ्याचं व्यवस्थापन करणंसुद्धा कमालीचं चॅलेंजिंग आहे.’असे अनेक तरुण चेहरे भेटत राहतात.कुंभमेळा एकच असला तरी अनेकांची मतं आणि इथं येण्याची कारणं मात्र वेगळी आहेत. जो तो शोधतोय काहीतरी या गर्दीत.

(मुक्त पत्रकार असलेली शर्मिष्ठा सध्या कुंभमेळ्याचा अनुभव घेण्यासाठी प्रयागराज येथे गेली आहे)