शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर सिंग सारखा कॉन्फिडन्स आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 17:58 IST

असेल तर तो घालतोय तसे ट्रेण्डी कपडे घाला, किती दिवस ते काळे-पांढरेच शर्ट घालणार?

ठळक मुद्देआता तरुणांनीही  रणवीरसारखं धाडस करून बघालयला हवं.

- श्रुती साठे 

रणवीर सिंग हा नेहमीच त्याच्या स्टाइल स्टेटमेण्टसाठी ओळखला जातो. बरेच लोक त्याला नाकं मुरडताना दिसतात. पण काही असो, तो त्याला हवा तसा जगतो.  बेफिक्र. अजिबातच जगाची तमा न बाळगणारा हा हिरो स्टेटमेण्ट पिसेस घालून बिनधास्त आणि  कॉन्फिडण्ट असतो. ते त्याला चांगलं दिसतं की नाही हा प्रश्न इथं अगदीच गौण आहे; पण त्याला जे हवं तेच तो करतो हे मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे.

रणवीर नुकताच एका टीव्ही शोसाठी प्रिंटेड शर्ट आणि जॅकेटमध्ये दिसला.  वरसाचे  हा जागतिक दर्जाचा ब्रँड त्याच्या बोल्ड स्टाइल्ससाठी प्रसिद्ध आहे. वरसाचे फॉल विंटर कलेक्शनमधील हा पीस वाइल्ड अ‍ॅनिमल स्टोरीने प्रभावित दिसतो. रणवीरने त्याबरोबर सोन्याच्या चेन्स, ब्लॅक ट्राउसर आणि ब्लॅक शूजही घातले होते. एकंदरीतच हल्ली कॉलेज तरु ण नेहमीचे प्लेन कपडे बाजूला ठेऊन प्रिंटेड, एम्ब्रॉयडरी केलेले शर्ट वापरताना दिसतात. बहुतेक करून पुरुषांची पारंपरिक पोशाखात नवीन स्टाइल ट्राय करायची तयारी आता दिसू लागली आहे. मग तो हाय-लो कुर्ता असेल किंवा फ्लोरल प्रिंटेड फेटा असेल. शेवटी त्यांनासुद्धा ‘व्हाय शुड गल्र्स हॅव ऑल द फन?’ असं वाटत असेलच की. बरोबर ना?      रोजच्या पांढर्‍या, ग्रे, काळा शर्ट, टी-शर्ट आणि टिपिकल चिनो, ट्राउजरचा कंटाळा आला असेल तर आता तरुणांनीही  रणवीरसारखं धाडस करून बघालयला हवं. पण लक्षात ठेवा, हे असे  आउट ऑफ द वे  स्टाइल करताना जोरदार कॉन्फिडन्स हवा!