शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राजेश खन्ना - एका तरुण पिढीचा सच्चा सुपरस्टार

By admin | Updated: July 18, 2016 16:21 IST

आज त्याला जाऊन ४ वर्षे झाली.. त्याची आठवण आली की सोबत बरंच काही आठवतं. पाकिस्तान आणि चीन सोबतची लागोपाठची युद्धं, दुष्काळ, आणीबाणी आणि भारताच्या निर्मितीपासून पाचवीला पुजलेल्या आर्थिक मागासलेपणाच्या दुष्टचक्रातून जाणा-या भारतीय जनमानसाला स्वप्नाच्या दुनियेची सफर घडवून आणणारा एक सुपरस्टार हवा होता.

आज त्याला जाऊन ४ वर्षे झाली.. त्याची आठवण आली की सोबत बरंच काही आठवतं.पाकिस्तान आणि चीन सोबतची लागोपाठची युद्धं, दुष्काळ, आणीबाणी आणि भारताच्या निर्मितीपासून पाचवीला पुजलेल्या आर्थिक मागासलेपणाच्या दुष्टचक्रातून जाणा-या भारतीय जनमानसाला स्वप्नाच्या दुनियेची सफर घडवून आणणारा एक सुपरस्टार हवा होता. निर्माता-दिग्दर्शक शक्ती सामंता हे त्या सुपरस्टारला जन्माला घालणारे त्या काळचे अफलातून रसायन होते. आणि त्या सुपरस्टारचं नाव होतं, राजेश खन्ना. त्याचे व्यक्तिमत्त्व लौकिकार्थाने नायकाचे नव्हते. किंबहुना त्याची बेडौल शरीरयष्टी, त्याचे ते हातवारे करणे, मान वाकडी करणे, गुरु शर्ट घालून वावरणे आणि काहीशी अवघडलेली देहबोली थोडी खटकणारीच होती. कलाकृतींना प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक आणि पाशर््वगायकांची उत्तम साथ लाभल्याने त्याला सुपरस्टारपदाकडे नेणारा मार्ग अलगद निर्माण व्हायचा. ये दुनिया बडी जालीम रे पुष्पा हा भावविभोर संवाद किंवा ए..बाबू मोशाय ही हृदय पिळवटून टाकणारी आर्त हाक, प्रेक्षकमनाचा ठाव घेत होती. राजेश खन्नाचे पडद्यावर लाडीगोडी करणे, आपल्या हळुवार आवाजाने त्याचे साद घालणे... सारे काही विलक्षण होते.किशोरच्या आवाजाने सजलेली, आर.डी/ एल.पी.च्या संगीताने नटलेली, पडद्यावर खास राजेश खन्ना स्टाइलची एकाहून एक सरस गाणी. त्याचे सुपरस्टारडम अधिक उजळवणारी होती. अशा या सुपरस्टारचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला. जतीन खन्ना हे त्याचे मुळ नाव. बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात करताना त्याने आपले नाव बदलून राजेश खन्ना केले होते.काका या नावानेही ते प्रसिद्ध होते. काका हे टोपणनाव कसे मिळाले, हे खुद्द काकांनीच सांगितले. आयफा पुरस्कार सोहळ््यादरम्यान त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले मी पंजाबी, काका या शब्दाचा अर्थ पंजाबीमध्ये लहान गोंडस मुलगा असा होतो. मी जेव्हा सिनेजगतात पाऊल ठेवले, त्यावेळी मी तरुण होतो. व्यक्तीमत्त्वही तसेच होते. त्यामुळे मला सर्वजण काका म्हणू लागले. अनेक वेळा पंजाबीमध्ये काके अशीही हाक मारण्यात येते. मलाही तशीच हाक मारायचे. हळूहळू हेच नाव लोकप्रिय झाले. पुढे काका या शब्दाला एक जी लागला. लोक आदराने काकाजी म्हणू लागले. त्याचे ओझरते का होईना दर्शन व्हावे, यासाठी त्याच्या प्रसिद्ध आशीर्वाद बंगल्यासमोर ऊन-पाऊस आणि वयाची तमा न बाळगता दिवस-दिवस उभे राहण्याचा तरु णींचा तो काळ. म्हणूनच जेव्हा त्याने चाहत्यांना गुंगारा देत सोळा वर्षीय डिंपल कपाडियाशी लग्न केले, तेव्हा देशातील लाखो चाहत्यांचा हृदयभंग झाला होता. नैराश्याच्या भरात हाताच्या शिरा अनेकींनी कापून घेतल्याच्या बातम्या देखील चर्चेत होत्या.आपली उंची जीवनशैली त्याने शेवटपर्यंत ठेवले होते. मात्र काळ थांबत नाही, हा सुपरस्टार अखेरच्या टप्प्यात विस्मरणाच्या वाटेवर गेलाच..एक मात्र नक्की अपयशाने त्याच्यातील कलाकार कधी संपला नाही. त्यामुळेच ते छातीठोक पणे म्हणाले होते, पुन्हा जन्म झालाच तर राजेश खन्ना बनून त्याच चुका करण्याची इच्छा आहे. कारण आनंद कधी रडत नसतो..त्याला डोळ्यातील आसवांची चिड होतीच..- निलेश बुधावले