शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

राही- आशियाई सुवर्णपदक तिने ते आधीच बूक करून ठेवले होते!- ते कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 15:04 IST

2013ची गोष्ट. कोरिया येथील वर्ल्डपकप स्पर्धेत राही फायनलर्पयत पोहचली होती. प्रेक्षकांनी तिला विचलित करायचा प्रयत्न करूनही तिनं सुवर्ण जिंकलं होतं. आताही दुखापतीमुळे बराच काळ सरावापासून ती दूर होती, तरीही...

ठळक मुद्देशूटिंगमध्ये एन्ट्री केल्यापासून तिने जणू कातच टाकली. राज्य, राष्ट्रीय स्पर्धापासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धात, आख्या जगात ही मराठमोळी मुलगी आपला दबदबा निर्माण करत होती.

- मोनाली गोर्‍हे

यंदाच्या आशियाई स्पर्धेत नेमबाजीत कोल्हापूरच्या राही सरनोबतने सुवर्णपदक पटकावले; पण ते जणू काही तिने आधीच बुक करून ठेवल्यासारखे वाटत होते. गेल्या काही दिवसांपासून मी फेसबुकवर तिचे अपडेट्स बघत होते. त्यात तिच्यातला आत्मविश्वास खूप वाढलेला दिसत होता. तिच्यात तो मुळातच खूप आहे. पण सोशल मीडियावर माझ्या माहितीप्रमाणे ती पहिल्यांदाच ते जणू चॅलेंजिंगली सांगत होती की, एशियन गेम्सचे सुवर्णपदक मी जिंकणारच ! आणि तिने ते जिंकलेच !!मी राहीला 2007-2008पासून ओळखते, खूप मितभाषी. पण शूटिंगमध्ये एन्ट्री केल्यापासून तिने जणू कातच टाकली. राज्य, राष्ट्रीय स्पर्धापासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धात, आख्या जगात ही मराठमोळी मुलगी आपला दबदबा निर्माण करत होती.2008मध्ये पुणे येथे कॉमनवेल्थ युथ गेम्स भरविण्यात आले होते. राहीने तेव्हा 25 मी स्पोर्ट्स पिस्तूल या तिच्या आवडत्या क्र ीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय क्रीडा जगात आपले नाव कोरले. तेव्हा राही फक्त 18 वर्षाची होती. तेव्हापासूनच राही केवळ युवा गटातच नव्हे, वरिष्ठ गटातसुद्धा आपला दबदबा निर्माण करत होती.माझा खेळ तेव्हा जवळ जवळ बंद झाला होता. मी माझ्या संस्थेच्या इतर नेमबाजांबरोबर प्रशिक्षक म्हणून जात असे तेव्हा राही आपल्या आईबरोबर स्पर्धेसाठी येत असे. राही जर फायनलमध्ये खेळत असेल तर जबरदस्त स्पर्धा खेळून ती जणू यश खेचून आणते असे वाटत असे.राहीच्या यशामागे अनेक रहस्य आहेत. मी राहीला 2011मध्ये पुणे येथे बालेवाडीच्या शूटिंग रेंजवर सराव करताना जवळून बघितलं. 8.30 वाजता रेंज उघडण्याच्या आधी राही नियमित वेळेवर हजर असायची. बर्‍याच वेळा  रेंजवर स्वतर्‍च सर्व दिवे लावून, पूर्वतयारी करून वेळेवर सराव सुरू करत असे. 8.30 ते  1 र्पयत सराव मग 2 ते 2.30 र्पयत जेवणाचा ब्रेक. परत 3 ते 5 सराव. सायंकाळी 5.30 ते 7 फिटनेस असे तिचे व्यस्त वेळापत्नक असे. आजदेखील ते अशाच प्रकारे आहे. आठवडय़ातून 5 ते 6 दिवस सराव.यश एका दिवसात येत नाही, त्याला अनेक दिवसांची मेहनत व तपश्चर्या लागते. 2011-12 पासून जवळजवळ 2015र्पयत राही रशियन प्रशिक्षक अनातोली पिदूबनी यांच्याकडे नेमबाजीचे कौशल्य शिकत होती. राही आणि अनातोली यांचे गुरु-शिष्य टय़ुनिंग खूप चांगले होते.  नेमाबाजीमधील करिअरच्या बर्‍याच चढउतारात राहीने अत्युच्च कामगिरी केली आहे. 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक, सांघिक सुवर्णपदक, 2012 ऑलिम्पिक स्पर्धा सहभाग. कोरिया येथे 2013 मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत ती फायनलर्पयत पोहचली होती. स्पर्धा खेळत असताना तिच्या असे लक्षात आले की, कोरियन लोक जे प्रेक्षक म्हणून बसले होते ते तिच्या चांगल्या शॉट्सवर शांत राहत व इतर देशांच्या मुलींनी चांगला शॉट मारला की त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत. तिच्या मनाला ते फार लागले; पण तरीही तिने स्वतर्‍ला विचलित होऊ दिले नाही. तिने जिद्दीने ठरवले की, वाजवा काय टाळ्या वाजवायच्या त्या इतरांसाठी; पण मी येथून सुवर्णपदकच घेऊन जाणार. शेवटच्या टाळ्या तुम्हाला माझ्यासाठीच वाजवाव्या लागतील. आणि खरोखरच जिद्दी राहीने अत्युच्च कामगिरी करून सुवर्णपदक जिंकले आणि कोरियन लोकांकडून स्वतर्‍साठीच नव्हे तर आपल्या देशासाठीही टाळ्या वाजवून घेतल्या ! आपल्या देशाचा तिरंगा कोरियात रोवून ती आली. ती पहिली भारतीय महिला होती जिने 25 मि. स्पोर्ट्स पिस्तूल क्र ीडा प्रकारात वर्ल्डकपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.2014 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये परत तिने आपल्या कामगिरीचा आलेख वर नेला व 25 मि. स्पोर्ट्स पिस्तूलमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. 2014च्या आशियाई स्पर्धेत तिने सांघिक कांस्य जिंकले.2016चे साऊथ एशियन गेम्स; जे भारतात झाले होते, त्यातही तिने वैयक्तिक व सांघिक सुवर्णपदक जिंकले.2008 ते 2016 या कालावधीत राहीने नेमबाजीतील आपल्या करिअरमध्ये आठ वर्षात खूप मोठी सफलता संपादित केली आहे. राष्ट्रीय स्पर्धाच नव्हे तर कॉमनवेल्थ, आशियाई स्पर्धा, जागतिक नेमबाजी. या सर्व स्पर्धा तिने गाजविल्या आहेत.तिच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र शासनाने शिवछत्नपती क्रीडा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला आहे. सध्या ती उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे.

नोव्हेंबर 2017मध्ये मी भारतीय नेमबाजी संघाबरोबर ऑस्ट्रेलियातून कॉमनवेल्थ स्पर्धेवरून परत येत असताना विमानात मी व राही बरोबर बसलो होतो. आमच्या समोरील टीव्हीचा स्क्रीन काही बिघाड झाल्याने बंद होता. मग आम्ही गप्पा मारत बसलो. ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) ते मुंबई सहा तास आम्ही सलग बोलत होतो. इतर खेळाडू नंतर कुतूहलाने आम्हाला विचारत होते, तुम्ही काय बोलत होता एवढे?.राहीच्या यशामागची अनेक कारणे मला कळाली. राहीने मूलतर्‍ नेमबाजीचे प्राथमिक प्रशिक्षण कोल्हापूरमध्ये घेतले; पण सराव अधिक चांगला व्हावा म्हणून केवळ नेमबाजीसाठी तिला पुण्याला यावे लागले. पुणे येथे बालेवाडी शूटिंग रेंजवर ती नेमबाजीचा सराव करते. एकत्न कुटुंबात जन्मलेल्या राहीला घरातूनच शिस्तीचे बाळकडू मिळाले आहे. एकुलती एक मुलगी म्हणून कुठला दुजाभाव तिने घरातूनच पाहिलेला नाही. तिच्या घरातील वातावरण अतिशय शिस्तीचे, खेळीमेळीचे व तेवढेच वैयक्तिक जबाबदारीचे आहे. राही खरोखरच अष्टपैलू आहे. तिला वाचनाची प्रचंड आवड आहे, तिचे वक्तृत्व उत्तम आहे. ती कविता करते, ती चांगली चित्नकारदेखील आहे. राहीच्या यशामागे तिची नेमबाजीमधील गुणवत्ता जेवढी महत्त्वाची आहे तेवढाच तिच्या घरच्यांचा पाठिंबा, त्यांनी तिला लावून दिलेली शिस्त. सकाळी लवकर उठायची सवय असो, मोठय़ांचा मान राखण्याची रीत असो, जबाबदारीची जाणीव असो. लहानपणापासून शिस्त अंगात मुरलेली असल्यामुळेही नेमबाजीत मेहनत घेऊन ती यश मिळवते आहे.2016 नंतर बर्‍याच जणांना असं वाटलं की, राहीची कामगिरी आता संपली, कारण 2018 मधील कॉमनवेल्थ गेम्समध्ये नवीन नावं झळकली, बरेच नवीन चेहरे वर आले होते.राहीचे रशियन प्रशिक्षक अनातोली पिदूबनी यांचे 2015 मध्ये निधन झाले. राहीला प्रशिक्षकाचा शोध होता. पण त्याच दरम्यान राहीच्या उजव्या हाताला (ज्या हाताने ती पिस्तूल पकडते) दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तिला नेमबाजीतून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. राहीला फिजिओथेरपी करण्यासाठी व तंदुरुस्त होऊन परत कमबॅक करण्यासाठी ब्रेक घेण्याशिवाय पर्याय नव्हता. दुखापतीमध्ये तिला अनेक स्पर्धाना मुकावे लागले. बर्‍याच जणांना असे वाटले तिचे करिअर संपले; पण नाही, तिची तयारी चालू होती 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धासाठी फीट होण्यासाठी. बर्‍याच वेळेला तिला उपचारांसाठी मुंबईला राहावं लागायचं. काही महिने तिला पिस्तूलला हातपण लावायला नाही सांगितलं. कमबॅक करण्यासाठी तिला हळूहळू सराव सुरू करायला लावला. राहीला असा एक प्रशिक्षक हवा होता जो तिला प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, जागतिक स्पर्धेत जिंकायचे कसे याबाबत योग्य मार्गदर्शन करू शकेल. तांत्रिक बाबतीत तिला खूप आत्मविश्वास होता; पण तोच आत्मविश्वास, मोठय़ा स्पर्धामध्ये कसा टिकवायचा, हेदेखील महत्त्वाचे असते. कारण जागतिक स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, ऑलिम्पिक गेम्स म्हटले की देशाच्या, पर्यायाने स्वतर्‍च्या अपेक्षा खूप वाढतात. मग कामगिरी करत असताना त्याचे खूप दडपण येते. खेळाडूचा आत्मविश्वास वाढवणं, मेंटल अ‍ॅटिटय़ूड, ट्रेनिंग शेटय़ूल, कुठल्या स्पर्धा खेळायच्या, विश्रांती कशी व कधी घ्यायची. यासाठी चांगल्या प्रशिक्षकाची गरज असते.प्रशिक्षकाशी चांगले सूर जमणे खूप महत्त्वाचे असते. राहीने मुखबेर या जर्मन प्रशिक्षिकेची आता निवड केलेली आहे. ती स्वतर्‍ दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज आहे.यंदाच्या आशियाई स्पर्धेत 25 मि. नेमबाजीमधील ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून राहीने जगाला जणू दाखवूनच दिले आहे. टायगर अभी जिंदा है ! आपल्या दुखपतीवर मात करून राहीने परत जागतिक नेमबाजी स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे.सप्टेंबरमध्ये कोरिया येथे होणार्‍या वल्र्ड चॅम्पिअन स्पर्धेसाठी ती आता रवाना होणार आहे. ऑलिम्पिकची पहिली पात्नता येथून सुरू होणार आहे. पुढील वाटचालीसाठी राहीला अनेक शुभेच्छा !(लेखिका भारतीय नेमबाजी संघाच्या प्रशिक्षक आहेत.)