शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

पुणेकर फिजिओ तरुणीची काश्मिरमध्ये मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 06:45 IST

ती फिजिओथेरपिस्ट. मात्र आता ती काश्मीरला जाऊन तेथील रुग्णांना विनामोबदला सेवा देते आहे.

- दीपक कुलकर्णी 

काश्मीर म्हटलं की, सर्वसामान्य लोकांच्या दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात. एक म्हणजे निसर्गसौंदर्य आणि दुसरं म्हणजे दहशतवाद. रोज आपण वाचतो त्या दहशतीच्या बातम्या आणि अस्वस्थ वर्तमान. मात्र त्या भागात जाऊन काम करावं, आपल्या जमेल तेवढं करावं असं वाटून कुणी तिथं काम करायला जातं का? पर्यटनापलीकडे तिथल्या माणसांचा विचार करतं का?- करतंही. पण तसं करणारे फार थोडे. त्यातलीच एक  फिजिओथेरपिस्ट डॉ. मानसी पवार. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर काही वर्ष पुण्यातील औंध येथील एका खासगी रुग्णालयात ती कार्यरत आहे. आपल्या कामासोबतच ती छोटय़ा छोटय़ा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचा प्रय} करते.  मागच्या वर्षी एका संस्थेच्या माध्यमातून तिला श्रीनगरमधून एका व्यक्तीचा फोन आला. त्याच्याकडून श्रीनगरमध्ये येण्याचं आमंत्नण मिळालं. पण फोनवरील व्यक्तीच्या संवादावर विश्वास ठेवून तिथं कामासाठी कसं जाणार असं मानसीलाही वाटलं. मात्र त्या व्यक्तीने सातत्याने तिच्याशी संपर्क करत तिला श्रीनगरला येण्याविषयी विचारणा सुरू ठेवली. शेवटच्या टप्प्यावर तर त्याने तिच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी मुंबई, पुणे याठिकाणच्या काही मोठय़ा संस्था, व्यक्तींचे नंबर शेअर केले. मानसीने चौकशी केल्यावर त्यांचा बोलावण्यामागचा उत्तम हेतू लक्षात आला. रुग्णांची गरज समजली. श्रीनगर येथे ओपीडी सुरू करा असं त्यांनी सुचवलं. शांतपणे विचार केल्यावर एकदा श्रीनगरला जाऊन त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून तिथल्या परिस्थितीचा हालहवाल जाणून घ्यावा असं तिला मनोमन वाटले. तिने घरच्यांना हा विचार सांगितला. मात्र कुणी चटकन पाठिंबा देईना. पण तिच्या मनातून श्रीनगरला जाण्याचा विचार काही केल्या जात नव्हता. अखेर तिचं ठरलं.! सगळ्या प्रश्नांच्या, स्वतर्‍च्या हिमतीवर विश्वास ठेवत तिने श्रीनगरला जाण्याचा निश्चय केला. शेवटी मुलगी काश्मीरचा हट्ट सोडत नाही म्हटल्यावर वडिलांना सोबत घेऊन मानसीला श्रीनगरला पाठवण्याचा मार्ग मोकळा झाला. एक मित्न, वडील यांच्यासोबत ती काश्मीरला गेली. दुसर्‍या दिवशी ती गेले काही दिवसांपासून सातत्याने संपर्कात असलेल्या व्यक्तीला भेटली. खरं तर त्यांनी मानसी मुंबईहून निघाल्यावर फेसबुकवर लिहिलेली वेलकम पोस्ट ते श्रीनगरच्या विमानतळापर्यंत केलेली विचारपूस त्यांची आत्मीयता दाखवून गेली. प्रत्यक्ष भेटीत त्यांनी मानसीसमोर श्रीनगर वगळता परिसरातील दुर्गम खोर्‍यातल्या लोकांच्या आरोग्याची दयनीय परिस्थितीचे वास्तव मांडले. तसेच श्रीनगर येथे त्यांच्या साहाय्याने ओपीडी सुरू करून तेथील नागरिकांसाठी वैद्यकीय सेवेची पायाभरणी करण्याचं निमंत्नण दिले. या प्रवासाबद्दल मानसी सांगते, माझ्या मनात काश्मीरविषयी प्रचंड कुतूहल होते. त्यातूनच काश्मीरमध्ये काम करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांशी माझा जवळून संबंध आला. प्रत्यक्ष तिथे जाऊन काम करण्याची इच्छा निर्माण झाली.  श्रीनगरला जाते, असं घरी जेव्हा सांगितलं तेव्हा ते खूप चिंतेत पडले होते. माझ्याही मनात थोडी धाकधूक होतीच. पण तिथे गेल्यावर संवादातून काश्मिरी लोकांच्या मनातदेखील परप्रांतीयांबद्दल आत्मीयता असल्याचे जाणवले. आपल्या मनात काश्मिरींविषयी जी भीती निर्माण केली गेली ती निर्थक असल्याचेही समजले. माझा तिथे काम करण्याचा अनुभव खूपच समाधानकारक, आनंददायी आहे.’आत्तार्पयत वैद्यकीय सेवेसाठी श्रीनगरला तिच्या दोन फेर्‍या झाल्या आहेत. काही समस्या असेल तर तिथले रुग्ण तिच्याशी फोनवरून संपर्क साधतात. विनामोबदला सेवा सध्या ती देते आहे. ती सांगते, श्रीनगर परिसरातील नागरिकांना फिजिओथेरपिस्ट म्हणजे काय हेदेखील माहिती नाही. अशा परिस्थितीत तिथल्या लोकांशी संवाद वाढवून काम करणार आहे. तेथील डॉक्टरांशी बोलून मी फिजिओथेरपिस्टतून स्थानिक रुग्णांवर उपाय करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी श्रीनगरमधील एका क्लिनिकमध्ये मी महिन्यातले काही दिवस फिजिओथेरपी विभाग चालवणार आहे. प्राथमिक स्तरावर हे काम विनाशुल्क आहे. एक आशादायी पाऊल पुढं टाकत केलेली ही पहल नक्कीच चांगली आहे.