शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

पबजीवाला है क्या?-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 15:03 IST

पबजी-एबल म्हणजे पबजी खेळता येईल, असा मोबाइल पालक फोन घेऊन देत नाहीत म्हणून मुंबईत कुर्ला-नेहरूनगर भागात राहणार्‍या तरुणानं चिडून आत्महत्या केली. दुसरीकडे अहाद नावाच्या एका 11 वर्षाच्या मुलानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवलं की, पबजीवर बंदी घाला. त्यातून तरुणांमध्ये खून करण्याची खुमखुमी-आक्रमकता-गेमिंगचं व्यसन आणि सायबर बुलिंग असे प्रकार वाढीस लागले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका करण्याचंही तो ठरवतो आहे. इतकंच कशाला, पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातही या गेमविषयी प्रश्न विचारले जातात आणि शहरांतच नाही तर खेडय़ापाडय़ात तरुण मुलं पबजीचे दिवाने झालेले दिसतात. या मोबाइल गेमचं नेमकं वास्तव काय आहे?

ठळक मुद्देतरुण जगात कुणाचा गेम होतोय आणि कोण जिंकतोय याची ही विशेष चर्चा.

-मनीषा म्हात्रे 

रात्री दोनची वेळ. सगळे गाढ झोपेत असताना, अचानक. ‘अरे तो बघ लपलाय तिथं. मार त्याला.. अरे मारना यार.’ असे शब्द कानावर पडतात. घरातली माणसं दचकतात. झोपून उठत इकडे-तिकडे पाहतात. आईला वाटतं, चोर शिरला, ती  ‘चोर चोर’ असं ओरडू लागते. घरातले सगळेच खूप भांबावतात. तेवढय़ात लाइट लावले तर दिसतात समोर सोफ्यावर बसून हातातल्या मोबाइलमध्ये पबजी खेळात दंग असलेल्या धाकटय़ा बहिणाबाई.घरातली माणसं उठली आहेत, दिवे लागलेत, सर्वाचा गोंधळ उडाला आहे. याचं भान तिला नव्हतंच. कानात हेडफोन असल्यानं इतरांचा आवाज तिच्यार्पयत पोहचला नाही. एक फटका मारत तिला भानावर आणलं तर ती शांतपणे सांगते, पबजीतल्या प्लेअर्सला मारण्यासाठी मी ओरडत होते, तुम्ही काय असे जागे होऊन पळापळ करताय. हे म्हणतानाही नाकावर राग दिसतो, तो आपल्याला डिस्टर्ब केल्याचा.घरातले सगळेच कपाटाळावर हात मारून घेतात. आणि रोजचंच आहे म्हणत झोपायला जातात.****मॉर्निग शिफ्टवरून घरी पोहचत बेल दाबावी तोच आतून आवाज येतो.  ओ शीट अ‍ॅक्सिडेण्ट झाला. अरे यार, आता कसं होणार..ते ऐकून घरकामात बुडालेल्या आईच्या तर काळजाचाच ठेका चुकतो. तिला वाटतं मोठय़ा लेकीचा झाला अपघात. ती घाबरते, विचारते कुणाचा अपघात झाला? कसा झाला? तेवढय़ात या बहिणाबाई हसत म्हणतात,  अगं गेम खेळतेय मी. त्यात अपघात झाला ! आई क्षणभर सुटकेचा निर्‍श्वास टाकते मग मात्र भयंकर चिडते. संतापते. माणसांना अवतीभोवती त्रास होतोय याचा हे कळत नाही का असं चिडून विचारते.  हे सारं पाहून प्रश्न पडतो की अगदी आपला भवताल, आपली माणसं, दिवसरात्र, आपलं अस्तित्व, इतरांचं जगणंही विसरून जावं, असं काय आहे या खेळात? नियमित पबजी खेळणार्‍या मानसीला विचारलं तर ती सांगते, पबजी म्हणजे सुकून की जिंदगी. हॅप्पीवाली लाईफ. आयुष्यात बाकी काहीच नको. कॉलेजमध्ये ब्रेक टाइमला कॅण्टीनमध्ये मित्रांच्या  मोबाइलमध्ये रंगलेल्या पबजीचा थरार पाहून मलाही खेळावंसं वाटलं. खूप खटाटोप करत गेम डाउनलोड केला. आणि मीही त्यांच्या ग्रुपमध्ये कधी जाऊन बसले मलाच कळलं नाही. हा गेम तुम्हाला अ‍ॅक्शन देतो, आपण काहीतरी करतोय बिनधास्त ही भावना देतो. आता हेच पहा, गेमच्या सुरुवातीला प्लेनने मला आणि मित्राला गेमच्या लॉबीत सोडलं. म्हणजे अर्थातच आभासी सोडलं; पण मनानं तर आम्ही तिथंच होतो. तिथून अंगावर ज्ॉकेट, हातात गन्स घेत मीही उतरले. आणि मग काय, गोळ्यांचा आवाज. लपाछपी. स्वतर्‍चा जीव वाचविण्याची धडपड, तिथला थरार हे सारं हवंहवंसं वाटलं. सुरुवातीला मित्रासोबत डय़ूयोमध्ये खेळले. मित्र युद्धाची रणनिती समजावत होता. खेळता खेळता 10 मिनिटाचे 12 तास कसे झाले हे समजलंच नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेर्पयत पबजी आयुष्याचा भाग बनला.त्याच्यातली प्रत्येक स्टेप, थ्रील आपलंसं वाटू लागलं. स्वप्नातही पबजीच सुरू असे. आजूबाजूला काय चाललं आहे याच्याशी संबंध नव्हता. खेळताना कुणाचा कॉल अथवा मेसेज आला तर हातातल्या बंदुकीने त्याला उडवून टाकू, अशी भावना मनात यायची. मग तो कॉल करणारा, मेसेज धाडणारा कुणीही असो. पण आता कुठंतरी वाटू लागलंय की, आता बास ! नवीन वर्षाच्या निमित्ताने काय संकल्प करायचा म्हणून पबजी न खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र  अजूनही मोबाइलमधला गेम डिलीट मारण्याची इच्छा होत नाही. पण एक लक्षात आलंय की, या सार्‍या नादानं मी खरचं खूप चिडचिडी झालेय. अभ्यासात लक्ष लागत नाही. आजही मित्र-मैत्रिणी गेम खेळायला बोलावतात. पण आता वाटतं, आता पुरे. नको आता. त्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष देऊ!- मानसी जी स्वतर्‍ची गोष्ट सांगते ती या गेममध्ये अडकणार्‍या अनेकांची आहे. मानसीनं वेळीच स्वतर्‍ला सावरलं आहे.म्हणतात ना चुकण्याच्या वेळा हजारदा येतात, सावरण्याची एकदाच.आपलाच गेम होण्यापूर्वी सावरलेलं बरं! 

अनोळखी भेट ठरू शकते घातक पबजीच्या माध्यमांतून अनोळखी व्यक्तींशी संपर्क वाढतोय. अनेकजण अनोळखी ग्रुपसोबत खेळण्यासाठी रात्री - अपरात्री बाहेर पडत असल्याची प्रकरणंदेखील समोर आली. मात्र ही अनोळखी भेट घातक ठरू शकते. यातून आपली फसवणूक होऊ शकते. .........

अडीच कोटींचा एक प्रश्न

पबजीने त्यांचा इन्स्टाग्राम ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये अडीच कोटी लोक जोडले गेले आहेत. त्या प्रोफाइलवर अलीकडेच एक प्रश्न विचारण्यात आला, पबजी म्हणजे..?उत्तरादाखल गाळलेल्या जागा गट सदस्यांनी भरायच्या होत्या. पबजी म्हणजे आयुष्य. हे उत्तर 50 टक्केहून अधिक मुलांनी दिलं, तर काहींनी प्रेयसीपेक्षा पबजी बरा, करिअर बरबाद, वल्र्ड, स्वर्ग, फॉर सिग्नल्स, बेस्ट असंही उत्तरादाखल लिहिलं!

गेमर मानसी, ती सांगतेबंदुका हातात येण्याची गोष्ट!

या गेममध्ये सुरुवातीला आम्ही एका लॉबीमध्ये उतरतो. तिथे मुंबईच नाही तर देशासह वेगवेगळ्या देशांतील 100 गेमर एकत्र खेळत असतात. त्यांच्या देशाचा झेंडय़ावरून ते समजतंच की कोण कुठलं आहे. अर्धा तासाचा खेळ. सोलो, डय़ूयो आणि स्कॉड हे तीन प्रकार. मी डय़ूयो म्हणजे मित्रासोबत खेळायचे. स्क्वॉडमध्ये ग्रुपने खेळतात. या गेममध्ये वेगवेगळे टास्क देतात. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे समोर दिसेल त्याला फक्त मारत राहायचं आणि आपण टिकायचं. खेळत असताना आपण जणू तिथंच आहोत असा भास होतो. ते जग आपलंसं वाटतं. त्यात जिंकलोच तर एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो. त्यात विनरला चिकन डिनर मिळतं. ते शब्द ऐकण्यासाठी आम्ही बेभान होतो. आणि हारलो तर जिंकेर्पयत खेळत राहतो. अध्र्या अध्र्या तासानं ते गेम्स होत राहतात. यातून माझ्यासारख्यांचं बंदुकांचं नॉलेज भयंकर वाढलं. आम्हाला एकेएम, एमके - 24, एम- 762, एयूगी, एम- 16, एम 416, क्यूबीझेड, स्कार एल, एम 2 49, एमके 14, एसएलआरसारख्या वेगवेळ्या बंदुकींचे प्रकार समजले. ती बंदूक हातात घेऊन मैदानात उतरण्याची शानच काही और असते. याच्या ऑनलाइन स्पर्धाही भरतात. शिवाय काही कॉलेज तसेच खासगी कंपन्यांकडूनही स्पर्धाचे अपडेट गेम्स खेळताना मिळताच. अनेकदा त्याचे पैसेही मिळताच. अनेकजण पैशांसाठीही खेळतात. यात नवनवीन मित्र-मैत्रिणीही जोडले जातात. आमचा आता पबजीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच तयार झाला आहे. खेळायचं असले की थेट कॉल करून, अरे चल ऑनलाइन ये. एवढंच म्हटलं की जो तो हातातलं कामधाम सोडून लगेच खेळायला येतो! 

 

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात,मुलं हिंसक होत आहेत, जग विसरत चाललेत!

डॉ. युसुफ माचिसवाला ,मानसोपचार तज्ज्ञ 

दुरावत चाललेले नाते, संवाद, नैराश्य, तणाव, स्पर्धा यामधून स्वतर्‍ला बाहेर काढून काही तरी वेगळे करायचं म्हणून तरुण पब-जीच्या आभासी युद्धभूमीवर स्वतर्‍ला हरवून घेत आहेत. एकदा खेळायला सुरुवात केली की, त्यातून बाहेर पडणंच अवघड होऊन बसलं आहे. यामध्ये 7 ते 8 वर्षाची मुलं, कॉलेजात जाणारे आणि कॉर्पोरेटमध्ये काम करणारे तरुणही दिसतात. आता ड्रग्जपाठोपाठ किंवा त्या प्रकारची ओढ लावणारं हे पबजी गेमचं व्यसन तरुण मुलांमध्ये रुजत आहे. या गेममुळे मुलांचे विचार बदलत आहेत. आपण कुठे काय करतोय, कुठल्या वातावरणात आहोत हे त्यांना समजत नाही. झोप कमी झाली. चिडचिड वाढली. ते अधिक हिंसक होताना दिसतात.  कुटुंबीयांसोबत उरल्यासुरल्या संवादाची नाळदेखील तुटताना दिसते आहे. पालकांनी विरोध करताच तरुण अगदी टोकाला जाताना, मारणं-मरण्यार्पयत जाताना दिसतात. दुसरीकडे त्यांच्या आरोग्य समस्या वाढत आहेत. त्यांची स्मरणशक्ती, विचारशक्ती कमी होत आहे. पालकांनी मुलांच्या मोबाइलचं रेशनिंग करायची गरज आहे. दिवसाला तासाभरापेक्षा जास्त मोबाइलचा वापर करू नये असं सांगण्याची वेळ आली आहे.   एक उदाहरण सांगतो, पबजीला विरोध करत पालकांनी मुलाच्या हातातून मोबाइल हिसकावून घेतला म्हणून त्यानं स्वयंपाक घरातील चाकू घेतला. मात्र आईवडिलांना मारू नये इतपत भान जागं होतं, मग तरी त्यानं स्वतर्‍वर 10 ते 15 वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याच्यावर उपचार घेत त्याला थेट मानसोपचार तज्ज्ञांकडे आणलं. सध्या त्या मुलावार उपचार सुरू आहेत.हे असं टोक मुलांनी गाठण्यापूर्वी स्वतर्‍ला सावरायला हवं!