शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

रेझ्युमेत अतिपर्सनल माहिती देताय?- आवरा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 07:25 IST

रेझ्युमेत जन्मतारीख, जात-धर्म, पत्ता हे सारं लिहायला ती काही लग्नाची कुंडली आहे का?

ठळक मुद्देरेझ्युमेत अतिपर्सनल माहिती देताय?- आवरा.

डॉ. भूषण केळकर

रेझ्युमे कसा नीट लिहावा याचे विवेचन करणारा हा तिसरा आणि या विषयावरील शेवटचा लेख. आपण रेझ्युमे लिहितानाचे तीन मूलभूत नियम बघितले आणि त्याचबरोबर मागील लेखात काही यम-नियमपण.आजच्या संवादात मला भारतीयांच्या रेझ्युमेमध्ये न आढळणारा आणि जगभरात मान्यता पावलेल्या महत्त्वाच्या घटकांविषयी सांगायचं आहे.त्याचबरोबर मला तुम्हाला याचीपण जाणीव करून द्यायची आहे की, रेझ्युमे लिहिणे हे प्रकरण तुम्ही समजत असाल तेवढे सोपं नाही. व्यावसायिकरीत्या तुम्ही जर तुमचा रेझ्युमे कोणा तज्ज्ञाकडून व कंपनीकडून करून घेतलात तर भारतामध्ये त्याची किंमत सहजगत्या  पाच हजार रुपयांर्पयत जाईल आणि ही किंमत आहे ती अगदी प्राथमिक पातळीच्या रेझ्युमेबाबत आहे. जरा अनुभव असणार्‍या वा मॅनेजमेंट पातळीवर असणार्‍या लोकांचे रेझ्युमे लिहिण्याची किंमत 10-15-20 हजारांर्पयत सहज जाते. अमेरिकेत जर बघितलं तर हीच किंमत प्राथमिक पातळीला 500 डॉलर्स (रु. 30-35 हजार)र्पयत आहे आणि लक्षात घ्या की ही फक्त रेझ्युमे लिहिण्याची किंमत आहे. नंतर जॉब, इंटरव्ह्यूचा कॉल येईल याची काही खात्री नाही, बरं का!दुसरं म्हणजे रेझ्युमेमध्ये जे वेगवेगळे उपविभाग आहेत, त्यात वैयक्तिक माहिती, उद्दिष्ट, गोषवारा, शैक्षणिक माहिती, व्यावसायिक प्रत्यक्षानुभव, प्रकल्प, छंद इ. येतात. यातील सर्वात कमी महत्त्वाचा व ज्याकडे कंपन्या जवळजवळ दुर्लक्षच करतात तो म्हणजे ‘वैयक्तिक माहिती’. þगंमत म्हणजे भारतीय रेझ्युमेमध्ये खूपसा भर हा वैयक्तिक माहितीवर दिलेला आढळतो. उदाहरणार्थ बहुतांशी भारतीयांच्या रेझ्युमेमध्ये संपूर्ण पत्ता, जन्म तारीख, कुटुंबीयांची माहिती, पासपोर्टचा तपशील, जात-धर्म इ. ची अनावश्यक माहिती असते. हे सारे जणू कमी म्हणून की काय पण भारतीय रेझ्युमेमध्ये कृष्णधवल/रंगीत फोटोपण असतो! मी तर विनोदाने म्हणतो की हुंडा घेणार नाही व पत्रिकेत मंगळ नाही एवढेच फक्त त्यात लिहिले तर तो रेझ्युमे कंपनीला पाठवण्यापेक्षा वधू-वर सूचक मंडळाकडे पाठवायला योग्य होईल!खरं तर रेझ्युमेमध्ये नक्की पाहिजे अशा गोष्टी म्हणजे ऑबजेक्टिव्ह व त्याचबरोबर समरी (उद्दिष्ट). यामध्ये तुम्ही हे एका वाक्यात लिहिणं अपेक्षित आहे की जर तुम्ही मागताय तो जॉब तुम्हाला मिळाला तर तुम्ही काय करू इच्छिता.समरी (गोषवारा/ संक्षिप्त माहिती) या भागात तुम्ही हे 3-4 ओळीत/वाक्यात सांगणं अपेक्षित आहे की उद्दिष्टामध्ये तुम्ही जे करू इच्छिता ते नीट करण्यासाठी तुम्ही कसे सुयोग्य आहात.तुमचं नाव, त्याखाली ई-मेल व सेलफोन आणि असेल तर वेबपेज/ ब्लॉग किंवा लिंकडिन अकाउण्टची लिंक देऊन पुढे ऑबजेक्टिव्ह आणि समरी लिहा. याने फापट पसारा कमी होऊन तुम्हाला जी नेमकी बलस्थानं सांगायची आहेत ती नीट मांडता येतील. छान कव्हर लेटरसकट जर असा प्रभावी रेझ्युमे तुम्ही पाठवलात तर इंटरव्ह्यू कॉल येण्याची शक्यता खूपच वाढेल.सर्वाना शुभेच्छा!