शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
5
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
6
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
7
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
8
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
9
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
10
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
11
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
12
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
13
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
15
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
16
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
17
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
18
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
19
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
20
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

प्राउड मराठी मॅजिक

By admin | Updated: April 7, 2016 12:44 IST

गुढीपाडव्याच्या शोभायात्रा जे आयोजित करतात, ते तरुण मुलं. काही मुंबईतल्या गिरगावातले, काही डोंबिवलीचे. मुंबईच्या वेगात धावताना मराठी नववर्षाचं स्वागत म्हणून या शोभायात्र काढतात. टिपिकल ‘मराठी’ बनून त्या शोभायात्रेत बुलेटवर, घोडय़ावर बसून मिरवतात. या सा:यातली गंमत आहे काय?

गुढीपाडवा शोभायात्र आयोजित करणा:या  गिरगाव आणि डोंबिवलीच्या तरुण दोस्तांच्या कट्टय़ावरून एक लाइव्ह रिपोर्ट
 
आज गुढीपाडवा.
नवीन वर्ष स्वागताच्या शोभायात्रा हे सध्या या पाडव्याचं एक अत्यंत महत्त्वाचं आकर्षण बनलं आहे. एरवी जीन्स-टीशर्टमध्ये फिरणारी नी पलाझो नी श्रग्ज वापरणारी जनता पाडव्याच्या शोभायात्रेत मात्र एकदम ‘प्राउड मराठी’ होत सहभागी होते. धोतर-टोपी, पगडी, भीकबाळी, नऊवारी साडय़ा, नाकात नथ, मोग:याचे गजरे, खोपे नी घोडे-बुलेटी असं हे एक अत्यंत देखणं कॉम्बिनेशन अनेक मोठय़ा शहरांच्या रस्त्यांवर आज दिसतं!
नववर्ष स्वागत यात्र हा सध्या मराठी तरुण मुलामुलींसाठीचा वर्षभरातला एक एकदम हॅपनिंग आणि हटके इव्हेण्ट ठरतो आहे. त्यातही मुंबईसारख्या कॉस्मोपोलिटन शहरात मराठीची गुढी अभिमानानं उंचावण्याचा आणि मराठी बाणा दाखवण्याचाच हा एक दिवस. 
आता या शोभायात्र राज्यभरात निघत असल्या, तरी गुढीपाडवा शोभायात्र म्हणजे गिरगाव हे एक समीकरण आहेच. अख्ख्या मुंबईचं लक्ष या शोभायात्रेकडे असतं. मराठी नववर्ष स्वागतासाठी या शोभायात्रेचं प्लॅनिंग करण्यासाठी मग सगळी तरुण एनर्जी एकवटते. गुढीपाडव्यापूर्वी महिनाभर आधी गिरगावातलं वातावरण पालटतं. 
पूर्वी विल्सन जिमखान्यावर शोभायात्रेच्या ढोलपथकाचा, ध्वजपथकाचा सराव चालायचा. मात्र आता गिरगावातल्या जुन्या वाडय़ांच्या नाक्यावर हा सराव चालतो. झावबाची वाडी, कोळीवाडी, गायवाडी, फणसवाडी, खोताची वाडी या वाडय़ांत ही तालीम चालते.
आणि यात सहभागी होण्यासाठी आसुसलेली गिरगावातले तरुण दिवसभर कॉर्पोरेट-प्रायव्हेट कंपन्यांमध्ये राबतात. आणि रात्री उशीरार्पयत वेगवेगळ्या वाडय़ांमध्ये या शोभायात्रंच्या प्लॅनिंगच्या बैठका रंगतात.  म्हणून मग एरव्ही दिवसभर टाय लावून  फिरणारी तरुणाई गिरगावच्या रस्त्यांवर गुढीपाडव्याला सदरा, लेंगा, रुद्राक्षांच्या माळा आणि कपाळावर चंद्रकोर रेखाटून मराठीचा बाणा अभिमानाने मिरवताना दिसते. गुढीपाडव्याच्या दिवशी नऊवार नेसून नाकी नथ आणि फेटा घालून मिरवणा:या मुली महिनाभराआधी ‘डबल शिफ्ट’मध्ये काम करतात. म्हणजेच, घरचं काम, ऑफिस आणि मग शोभायात्रेची धडपड अशी तारेवरची कसरत सुरूच असते. मात्र त्यासाठी प्लॅनिंग करायचं, एकेक गोष्ट जमवायची म्हणून रात्रीचा दिवस केला जातो. वडीलधारी पिढी खंबीरपणो आयोजक तरुणांना मार्गदर्शन करीत असतेच.  
आणि म्हणूनच हा ‘मेकिंग ऑफ शोभायात्र’ नावाचा प्रवास शोभायात्रेइतकाच भन्नाट आहे. कल्पना सुचणं ते मॅनेजमेंट, शिस्त, एकता, उत्साह, वेळेचं गणित, गर्दीचं नियोजन अशा एक ना अनेक गोष्टींचा यात विचार केला जातो. 
सगळ्यात महत्त्वाचं असतं ते या शोभायात्रेसाठीचं थीम प्लॅनिंग.
नुस्ते बसलेत घोडय़ावर, बुलेटवर नटून थटून, वाजताहेत ढोल नी काढताहेत मिरवणूक इतकं हे प्रकरण सोपं नसतं.
त्यासाठी अनेक दिवस चर्चा करून, विषयांचा पुरता कीस पाडून, एकेक विषय समजून घेऊन फायनली शोभायात्रेसाठी थीम ठरवली जाते. त्या त्या वर्षी अवतीभोवती जो विषय महत्त्वाचा असेल, ज्या विषयावर जनजागृतीची गरज असेल, चर्चा होणं आवश्यक असेल त्या विषयावर शोभायात्रेची थीम ठरते. त्यासाठी मग पोस्टर्स बनवले जातात, फलक लिहिले जातात, काही ठिकाणी इन्स्टॉलेशन्स, भव्य शिल्प मांडणीही केली जाते. 
इथल्या स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणाईला सोबत घेत शोभायात्रेचं आयोजन होतं. यंदा शोभायात्रेचं हे चौदावं वर्ष आहे. आणि या वर्षात तरुण झालेली मुलं आता बुलेट्स राइड, बाइक्स राइड, ढोलपथकं, पथनाटय़  या सा:याचं नियोजन स्वत: करतात आणि त्यात आनंदानं सहभागीही होतात.
तो उत्साह गुढीपाडवा येता येता शिगेला पोहचतो आणि मराठी रंगरूपात सजूनधजून भल्या पहाटे नवीन वर्षाच्या स्वागताला ही यात्र सज्ज होते.
गिरगावातील शोभायात्रेमधल्या विविध सामाजिक विषयांच्या मांडणीचं खूप कौतुक होतं. इथलं तारुण्य उत्साहातही संवेदनशीलपणो व्यक्त होतं. त्यासाठी मुंबई, महाराष्ट्रच नाही, तर जगभरातून या तरुण-तरुणींना कौतुकाची थाप मिळते. तेव्हा काहीतरी अचिव्ह केल्याचं समाधान मोठं असतं, असं शोभायात्रेत सहभागी होणारे तरुण-तरुणी सांगतात. पुढचे कित्येक आठवडे या कौतुकाचा हँगओव्हर पुरतो. आता तर या शोभायात्रंना ‘ग्लॅमर’ही प्राप्त झालंय. म्हणजे यात नेते, सेलिब्रिटीज असे सगळेच सहभागी होतात. त्यामुळे शोभायात्र जास्त ग्लॅमरस होऊ लागल्या आहेत.
***
सगळ्यात दणक्यात शोभायात्र असते ती डोंबिवलीतली. तिला ‘टफ फाइट’ द्यायची म्हणून गिरगावात शोभायात्रा तरुण आयोजक किती प्रयत्न करतात. अर्थात ही काही स्पर्धा नव्हे. पण तरी डोंबिवलीची शोभायात्रा ही अत्यंत भव्य असते. दरवर्षी गुढीपाडवा जवळ आला की एक नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समिती निवडली जाते.
मग ती समिती त्या वर्षीची स्वागतयात्रेची थीम ठरवते. सगळं नियोजन करते. विविध स्पर्धा घेते. म्हणजेच पोस्टर्स, फलक स्पर्धा होतात. माहोल बनत राहतो या शोभायात्रेचा. आणि मग गुढीपाडव्याला डोंबिवलीकर तरुण ‘मराठी बाण्यासह’ रस्त्यावर दिमाखदार परेड करतात.
एरवी डोंबिवली-मुंबई धावणारं हे तारुण्य दमूनभागून घरी आल्यावरही कित्येक दिवस या शोभायात्रेची तयारी करत राहतं. व्यक्तिगत थकवा, कामाचे प्रेशर, दुस:या दिवशी पकडायची पहाटेची गाडी हे सारं बाजूला ठेवून एका महाउत्सवाची तयारी सुरू होते.
आता शोभायात्र हा नवीन वर्ष उत्सव तर आहेच, पण आपण शोभायात्रेत भाग घेतोय हे एक स्टेटस सिंबल बनत चाललंय!
आणि म्हणून त्या उत्सवासाठी पूर्ण पारंपरिक वेशभूषा करून, नटूनथटून आणि मराठीचा ङोंडा हातात धरून एका नव्या उत्साही वर्षाची स्वागतयात्र संपन्न होते.
इव्हेण्ट सरतो, पण वर्षभर त्यातून मिळालेली कमाई उत्साहाची, आनंदाची याद देत राहतो ! व्हॉट्सअॅप ग्रुपवर आता तोच डिस्प्ले पिर होतो, आणि ही यात्र निरंतर नंतरही सुरूच राहते..
 
 
 
यंदा डोंबिवलीच्या स्वागतयात्रेचं हे अठरावं वर्ष आहे. डोंबिवलीच्या स्वागतयात्रेपासून प्रेरणा घेत देशभरात जवळपास 100 यात्रा सुरू झाल्या. स्वागतयात्रेच्या तयारीसाठी डोंबिवलीकर तरुणाईही ब-याच जबाबदा-या पेलत असते. सगळ्यात आधी नववर्ष स्वागतयात्र संयोजन समितीची रचना केली जाते. त्याअंतर्गत विविध क्षेत्रतील मान्यवरांचा यात समावेश होतो. आणि मग त्यातून स्वागतयात्रेच्या कामाचा शुभारंभ होतो. यंदा ‘जलसाक्षरता’ आणि ‘स्वस्थ डोंबिवली, स्वच्छ डोंबिवली’ अशा संकल्पना राबविणार आहोत. ‘होश’ शाबूत ठेवून नवीन वर्षाचं स्वागत नम्रपणो करण्याची इथल्या तारुण्याची रीतच आहे.
 
- अजिंक्य नवरे, नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समिती, डोंबिवली
 
 
गिरगावातील शोभायात्रांचे वेगळेपण जपण्याचे प्रतिष्ठानचे प्रयत्न आहेतच. आता  सोशल मीडियाच्या माध्यमातून गिरगावात न राहणा:या तरुणाईलाही आम्ही यात सहभागी करून घेतलंय. नवनवीन माध्यमांचा वापर करून आम्ही या शोभायात्रंमध्ये बदल घडवून विस्तार करत असतो. यंदा ‘स्त्री अपरंपार’ अशी संकल्पना असून, स्त्रीशक्तीचे पैलू या माध्यमातून उलगडणार आहोत.
- पराग वेदक ,स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान
 
 
 
यात्रा मॅनेजमेण्ट उत्साहाची शिकवणीच!
 
या शोभायात्रेचं प्लॅनिंग करताना तुम्ही नक्की काय शिकता, असं अनेक उत्साही यात्रेकरूंना विचारलं तर ते ही भलीमोठी यादी देतात.
त्याचीच ही एक लिस्ट.
 
1) स्ट्रेस कमी होतो, नवीन विषय नवीन प्लॅनिंग, भरपूर उत्साह आणि दोस्त यातून रुटीनचा स्ट्रेस गायब होतो.
 
2) मस्त नटायमुरडायला तर मिळतंच, पण आपली भाषा, आपली बोली पण ‘खास’ आहे, आपली शान आहे हे लोकांना सांगता येतं, तसं स्वत:लाही!
 
3) गर्दीचं मॅनेजमेण्ट कसं करायचं, कामांची वाटणी, त्याची नीट अंमलबजावणी, कुणी न सांगता पटकन काम करायची सवय यातून शिकता येते.
 
4) नवीन ओळखी होतात, ‘कॉण्टॅक्ट्स’ तयार होतात.
 5) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, टाइम मॅनेजमेण्ट इतकं पक्कं होतं की, वर्षभर वेळा चुकत नाहीत!
 
 
- स्नेहा मोरे
(स्नेहा ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत 
वार्ताहर आहे.)
moresneha305@gmail.com