शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

ना उम्र की सीमा हो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 07:00 IST

प्रियांका आणि निकचं लग्न ठरलं. तो तिच्यापेक्षा 11 वर्षे लहान. त्यावरून बरीच टीका झाली, पण वयातलं अंतर हा खरंच मोठा इश्यू होऊ शकतो.

ठळक मुद्देसंसार सुखी होण्यासाठी एकमेकांच्या मतांचा, परिस्थितीचा, कुटुंबाचा, विचारांचा, आवडी-निवडींचा आणि स्वातंत्र्याचा आदर करणं महत्त्वाचं.

- सारिका पूरकर-गुजराथी

देसी गर्ल प्रियांका चोप्राचा गेल्या आठवडय़ात ‘रोका’ समारंभ अर्थात साखरपुडा झाला. विदेशी निक जोनास बरोबर तिनं लग्न ठरवलं.  या दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा  रंगात होत्याच, मात्न भारतीय पारंपरिक पद्धतीने प्रियांकाने साखरपुडा उरकल्यावर नेटकर्‍यांना आयता विषयच मिळाला. मते-मतांतरं, ट्रोल करणं आणि खिल्ली उडवणं सुरू झालं. कारण काय तर दोघांच्या वयातील अंतर. निक प्रियांकापेक्षा अकरा वर्षानी लहान आहे. न उम्र की सीमा हो. न जन्म का हो बंधन. हे निक-प्रियांकाने प्रत्यक्षात करून दाखवलं. पण टीका झालीच, एवढी काय घाई होती प्रियांकाला, थोडे दिवस थांबून करिनाच्या तैमुरशीच केलं असतं की लग्न ही शेरेबाजीही काहींनी पातळी सोडून केली. लग्न करताना मुलगा मुलीपेक्षा मोठाच असला पाहिजे हा आपल्याकडचा पायंडा. यापूर्वीही बॉलिवूडमध्ये प्रियांका-निकसारखी अनेक जोडपी विवाहबद्ध झाली आहेत, सैफ-अमृता, ऐश्वर्या-अभिषेक, मेहेर-अर्जुन. यातील दोन लग्न जरी मोडली असली तरी त्यामागची कारणं मुलगा मुलीपेक्षा लहान होता, हे नक्कीच नव्हतं. मुलगी मुलापेक्षा मोठी असली तरी प्रॉब्लेम आणि मुलगा मुलीपेक्षा दुपटीने मोठा असेल तरीही. मिलिंद सोमणचं उदाहरण आहेच की ताजं. आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीशी त्यानं लग्न केलं. पूर्वीही अशी लग्न होतं. दिलीप कुमार व सायरा बानो यांच्यातही अंतर होतंच. दिलीप कुमार तेव्हा 44  वर्षाचे होते व सायरा जेमतेम 22. पण आजही त्यांचा संसार उत्तम चाललाय. बॉलिवूड जाऊ द्या. आपल्या आवतीभोवती अल्पसंख्येने का होईना पण अशी लग्नं झाली आहेत, होत आहेत.म्हणूनच पीसीच्या या निर्णयाला पाठिंबा देतानाच या चौकटीबाहेरच्या लग्नांचं यश किंवा अपयश वयांवर अवलंबून नसतं, एवढं तरी लक्षात ठेवलेलं बरं.दुसरा मुद्दा म्हणजे लग्न करताना मुलगाच मोठा पाहिजे या भूमिकेमागे नेमकी कोणती मानसिकता आहे आपल्या समाजाची? तर मुलगा लहान असेल तर अशी लग्न टिकत नाहीत, दोघांमध्ये ताळमेळ राहत नाही. दोघांचे विचार जुळत नाहीत. सर्वात मुख्य म्हणजे विवाहसौख्य (अर्थात शारीरिक सुख) मिळत नाही, अशा कल्पना आहेत. मात्र लग्न ही इतकी व्यक्तिगत गोष्ट आहे की ते नातं टिकतं किंवा तुटतं ते त्या दोघांमुळेच. समाजाच्या कल्पित नियमांमुळे नव्हे.खरं तर कोणत्याही लग्नात शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती जरूरीच असते. मात्न चौकटीबाहेरचे लग्न करताना त्याचा खरा कस लागत असतो. वयाची बंधनं झुगारणारे लग्न  प्रेमविवाह व जर आंतरजातीय असेल तर (अर्थात अशी लग्न प्रेमविवाहच असतात)  ही तंदुरूस्ती महत्त्वपूर्ण ठरते. दोघांच्या विचारांची जडणघडण, कौटुंबिक पाश्र्वभूमी भिन्न असल्यामुळे परिवारांतील मतभेदांचे रूपांतर मनभेदात होऊ शकतं. अशावेळी ही तंदुरुस्तीच तुम्हाला संयमी भूमिका घेण्यासाठी मदतीस धावून येते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोघांमधील संवाद. लग्न करण्याच्या निर्णयार्पयत येतानाच मुला-मुलीतील संवादाची दोरी मजबूत व्हायला हवी असते. एका पिढीचे अंतर जरी दोघांमध्ये असले तरी त्यांच्या विचार करण्याच्या प्रक्रि येत ते अंतर नसेल तर मग संवादात अडथळे येतच नाहीत. उदाहरण द्यायचे झालं तर प्रियांकाने निकला समजा उद्या असे सांगितले, की निक हे बघ, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे, मला याबाबतीत जास्त माहिती आहे. तर या गोष्टीचा इगो धरून न ठेवता (ही स्वतर्‍ला जास्त शहाणी समजते असे न मानता) निकने त्यादृष्टीने विचार करायला सुरुवात केली तर वाद अथवा मतभेदाची ठिणगी पडण्याची शक्यता कमी होते. तसेच प्रियांकानेही निक लहान म्हणून  याला काहीच समजत नाही, बाळच आहे अजून असं लावून धरलं तर ते योग्य ठरणार नाही.  संसार सुखी होण्यासाठी एकमेकांच्या मतांचा, परिस्थितीचा, कुटुंबाचा, विचारांचा, आवडी-निवडींचा आणि स्वातंत्र्याचा आदर करणं महत्त्वाचं.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचा कानमंत्न जर कायम लक्षात ठेवला तर चौकटीबाहेरचे व चौकटीतील लग्नंही यशस्वी होऊ शकतात. ते सांगतात, आपल्यातील असा अवगुण, वाईट सवय जी आपल्या जोडीदाराला आवडत नसते, त्याच्यासाठी ती त्नासदायक ठरत असेल तर ती आपण त्यागली पाहिजे. सुनंदा आणि मी आमच्या लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त हा प्रयोग करत असू. दरवर्षी एक वाईट सवय सोडत असू.  (तो अवगुण, सवय दोघांच्याही दृष्टीने वाईट असायला हवी हे मात्न नक्की.)