शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

प्रेशर आणि अपेक्षा यांचा मेळ जमायला हवा!

By admin | Updated: January 14, 2016 21:34 IST

आजवर किती गुणी मुलांचं कोचिंग मी करतो आहे.. मुलं हुशार असतात, त्यांना ‘गेम’ समजतो, ते मेहनतही घेतात

 - गोपाळ कोळी

सुप्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक
३० वर्षांहून अधिक काळ क्रिकेट कोचिंग, आईएस, 
व्ही. एन. सुळे गुरुजी शाळा, मुंबई
 
आजवर किती गुणी मुलांचं कोचिंग मी करतो आहे..
मुलं हुशार असतात, त्यांना ‘गेम’ समजतो, ते मेहनतही घेतात. पण म्हणून शालेय स्तरावर चमकलेले सगळेच काही देशाच्या संघात किंवा अगदी रणजी सामन्यातही स्थान मिळवू शकत नाहीत, असं का होतं?
जरा यश मिळालं की या मुलांचा फोकस हलतो असं म्हणत त्यांना दोष देणं सोपं आहे. पण हेच एकमेव सत्य नाही.
त्यासाठी आपण काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात.
शालेय स्तरावर क्रिकेट खेळणारी मुलं ‘फक्त क्रिकेट’ खेळत नसतात. त्यांना इतर मुलांसारखा अभ्यास असतो, परीक्षा असतात. त्यातही जी मुलं क्रिकेटही उत्तम खेळतात आणि अभ्यासातही हुशार असतात ती दहावीनंतर सायन्सला जातात. करिअरची एक वाट निवडतात. कारण फक्त क्रिकेट खेळणं, त्यासाठी शिक्षण सोडणं हे अनेक पालकांनाही मान्य नसतं, मुलांनाही आणि ते प्रॅक्टिकलही नसतं.
त्यामुळे जी हुशार मुलं असतात ती सायन्सला जातात. तिथं प्रचंड अभ्यास असतो. त्यानंतर बारावी, तो अभ्यास, त्याच्यापुढच्या प्रवेश परीक्षा, त्यासाठीची तयारी या साऱ्यात ते क्रिकेटमधे ब्रेक घेतात किंवा क्रिकेट मागे पडतं. त्यामुळे शालेय स्तरावर खूप रन्स केलेत, पण पुढे तसा तो मुलगा खेळला नाही तर त्याचा दोष लगेच त्याला देता येत नाही.
दुसरीकडे आईवडील. काहीजण प्रोत्साहन देतात. खेळ म्हणतात क्रिकेट. पण नुस्तं प्रोत्साहन देऊन खेळण्याचा आनंद घेऊ देणारे पालकही कमी असतात. काहींना वाटतं, आपल्या मुलानं लगेच पुढच्या टप्प्यात जावं. स्पर्धा, वय, या साऱ्यात ते सगळ्याच मुलांना चटकन कसं जमणार?
काही आईवडील मात्र एकदम त्याउलट. ते म्हणतात, आता पुरे. बंद कर क्रिकेट. करिअरवर लक्ष दे, अभ्यास कर! त्यामुळेही अनेक गुणी मुलांचं क्रिकेट बंद होतं.
मुख्य म्हणजे या साऱ्याचा परिणाम त्या मुलांवर होतो. त्यांच्यावर प्रेशर, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा यांचा दबाव वाढतो. आणि वय वाढत असतं तशा संधी कमी होताना दिसतात, त्याचंही मग टेन्शन येतं!
त्यामुळे शालेय स्तरावर उत्तम खेळला, मोठा विक्रमही केला, सतत शतकं ठोकली तरी पालकांसह इतरांनीही त्या मुलाकडून अती आणि अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत.
प्रत्येक लेव्हलचं क्रिकेट वेगळं असतं. शालेय स्तरावरचं वेगळं आणि व्यावसायिक स्तरावरचंही. आपला खेळ पुढच्या टप्प्यात नेता येणं हे सोपं नसतं. त्यासाठी प्रयत्न आणि परिश्रम अनेक मुलं करतात पण तरीही ते सोपं नसतं.
ज्यांना ते करणं जमतं ते पुढे सरकतात, बाकीचे अडकतात त्याच टप्प्यात!
आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे यशस्वी, गुणवान मुलांना मिळणारं मीडिया अटेन्शन. ते चांगलंही असतं. त्यातून या मुलांना सुविधा मिळतात, नाव झाल्यानं आत्मविश्वास बळावतो.
पण अतीच झालं कौतुक किंवा इतका अतिरेक करतात अनेकदा माध्यमं, की ते सारं कौतुक, ती प्रसिद्धी आणि त्यातून येणारं प्रेशरही अनेक मुलं हॅण्डल करू शकत नाहीत. त्यामुळेही अनेकांचा फोकस हलतो. खेळ मागे सरकतो. आणि आधी कमावलेल्या यशाचंही ओझंच होतं.
तेव्हा लक्षात हे ठेवायला हवं की, अनेक गोष्टी पूरक आणि मारक ठरतात. प्रत्येक टप्प्यावर परीक्षा वेगळ्या असतात आणि गेमही!
ज्यांना आपलं ध्येय गाठायचं, त्यांनी या साऱ्या परीक्षांवर स्वत:ला सिद्ध करत पुढे जाणं आणि आपला खेळ जपणं, ही या काळाची अपरिहार्यता आहे.
 
कोणाच्या विरुद्ध किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये धावा केल्या हे महत्त्वाचे नसून किती वेळ एकाग्रतेने धावा केल्या हे महत्त्वाचं असतं. आणि एकदा किती धावा केल्या यापेक्षाही महत्त्वाचं असतं की, त्या कामगिरीत पुढे कशाप्रकारे सातत्य राखलं. प्रत्येक वेळी शतक किंवा द्विशतकाची अपेक्षा कुणाही खेळाडूकडून करणं चूकच. मात्र या अशा प्रकारच्या दबावाला बळी न पडता आपल्या खेळावर पूर्ण लक्ष एकवटणं हे खरं तर या मुलांपुढचं आव्हान असतं. आपण खूप चांगलं खेळतो किंवा एखादा विक्रम केला हे विसरून नव्यानं आपली सुरुवात केली पाहिजे. त्याचबरोबर योग्य मार्गदर्शनदेखील तितकंच महत्त्वाचं असतं. हे सारं ज्यांना जमतं किंवा मिळतं, ते मुलं क्रिकेट खेळत राहतात, आपला खेळ अधिक उंचावण्याचा प्रयत्न करतात.
 
- राजू पाठक
रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेचे प्रशिक्षक
गेल्या काही वर्षांत ज्या मुलांनी रेकॉर्ड केले, 
त्या अरमान, पृथ्वी यांचे ते प्रशिक्षक आहेत.
क्रिके टर म्हणून बँकेत नोकरी मिळाली. लहानपणापासून क्रि केट खेळाविषयी आस्था तर आहेच; पण त्या खेळात मिळवलेलं कौशल्य मुलांना द्यावं म्हणून मी गेली २५ वर्षे प्रशिक्षणाचं काम करतो आहे. आतापर्यंत १६ आणि १९ वर्षांखालील अनेक रणजी खेळाडू शिकत-शिकवत पुढे गेले. मात्र माझ्याही २५ वर्षांच्या मेहनतीचं सार्थक प्रणवच्या विक्रमानं झालं. आजच्या घडीला प्रणवसारखे असे अनेक होतकरू खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत; परंतु सोयी-सुविधांअभावी त्यांची जी परवड होतेय त्याबाबत खंत वाटते. गुणी मुलांना सर्वदूर उत्तम सुविधा, मार्गदर्शन मिळालं तर त्यांच्यातूनही चांगले खेळाडू घडतील, असा मला विश्वास वाटतो. 
- मोबिन शेख
विक्रमवीर प्रणव धनावडेचे प्रशिक्षक