शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सांगा कसं जगायचंय? कण्हत कण्हत की गाणं म्हणत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 06:45 IST

सतत रडत राहिलं तर करिअरचं गाडंही सायडिंगलाच लागेल मग ठरवा, फायद्याचं काय ते?

ठळक मुद्देपॉझिटिव्ह थिंकिंग तसा हा शब्द आपल्याला माहिती आहे; पण त्याचा हात धरला तर आपलं करिअरही फळफळेल हे कुठं माहिती आहे.

- डॉ. भूषण केळकर

माझा एक मित्र ! मूर्तिमंत उत्साहाचा झरा ! व्यवसायात सुरुवातीला खूप अवघड परिस्थिती. ती अवघड स्थिती जवळ जवळ 4-5 वर्षे राहूनसुद्धा - आम्हा मित्रांना कळू-जाणवूसुद्धा दिली नाही. आता अत्यंत यशस्वी उद्योजक आहे. 50 अर्धशिक्षित लोकांना रोजगार दिलाय. उत्कृष्ट वस्तू त्यांच्याकडून बनवून घेऊन तो युरोप ऑस्ट्रेलियात निर्यात करतोय. कॉलेजपासूनचे त्याचे मला आवडलेले वाक्य  "Rest of my life begins now !" माझ्या उरलेल्या आयुष्याची सुरुवात आत्तापासून!मी माझ्या बायकोला सांगूनच ठेवलंय. कधी जीवनात निगेटिव्ह काळ आला, उदास वाटलं तर मी त्याच्याकडे आठवणीने जाईन आणि ऊर्जा घेऊन येईन. त्याला भेटलं की मला जाणवतं की माझं मन उत्साहानं भरून जातं. कृतीप्रवण होत. हे सगळं मित्रपुराण सांगण्याचं कारण काय तर हे पॉझिटिव्ह थिंकिंग हा सॉफ्ट स्किल्सचा अजून एक अविभाज्य घटक!थॉमस एडिसनला असंख्य वेळा अपयश आलं. दिवा तयार करण्याच्या त्याच्या प्रयत्नांमध्ये काचा फुटणे, जाळपोळ होणं, धूर होणं हे सर्व अनेक वेळा होऊन तो कुटुंबीय, मित्र, गावकरी यांच्या कुचेष्टेचा धनी झाला. हे सारं होऊनही जेव्हा तो यशस्वी झाला तेव्हा तो म्हणतो की- "I have not failed, I have just found 10,000 ways of how it will not work !" ! (म्हणजे - ‘मला अपयश आलेले नाही, उलट मी अशा 10,000 पद्धती शोधल्या आहेत जे अपेक्षित परिणाम देत नाहीत.) आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग  लगेच कळतं ते इथं.मी लहानपणी ‘‘कधी पाहतो’’ ही कविता वाचली होती. आपल्यामध्येच एक सकारात्मक आणि एक नकारात्मक अशी दोन रूपं असतातच हे विशद करणारी ती कविता. त्याचे अलीकडचे उत्तम सादरीकरण मला भावले ते माझ्या अत्यंत आवडत्या अशा कवीच्या - संदीप खरेच्या कवितेत. तो म्हणतो.मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो।तो कट्टय़ावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो।मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो।तो त्याच घेऊन नक्षी मांडून बसतो!संदीप खरे. ज्याचा मी कधीही एक्झॉस्ट न होणारा ‘‘एक्झॉस्ट फॅन’’ आहे. त्यानं पॉझिटिव्ह थिंकिंग या कवितेतूनच शिकवलंय असं मला वाटतं.तुम्हाला ती दोन विक्रेत्यांची गोष्ट माहिती आहे का? (अचानक ‘अरेबियन नाइप्स’ची आठवण झाली ना?)युरोप मधल्या एका बुट-चपलांच्या प्रख्यात कंपनीचे दोन तज्ज्ञ विक्रेते आफ्रिकेमध्ये येतात. कंपनीच्या पादत्राणांची विक्री आफ्रिकेत वाढवणं व त्यासाठी अंदाज देण्यासाठी त्यांना पाठवलेलं असतं. तिथे आल्यानंतर दोघांना एक आश्चर्यजनक चित्र दिसतं की, आफ्रिकेत सगळेजण अनवाणीच चालत असतात; कोणाच्याच पायात ना वहाण ना बूट!एक विक्रेता कंपनीला कळवतो, मी तत्काळ परत येतोय; इथे बाजारपेठ नाही कारण सगळेच अनवाणी आहेत.दुसरा विक्रेता कंपनीला कळवतो- एकच्या ऐवजी दोन जहाजे भरून वहाणा पाठवा कारण इथे सगळेच अनवाणी आहेत !! सगळा आफ्रिका आपली बाजारपेठ आहे!!म्हणून पाडगावकरांनी म्हटलंय-‘‘सांगा कसं जगायचं?कण्हत कण्हत की गाणं म्हणत’’? ठरवा तुम्हीच!