शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आयटीच्या मुलांचं कॉलेजसाठी पोर्टल

By admin | Updated: April 14, 2016 17:55 IST

इंजिनिअरिंगचे विद्यार्थी. पुस्तकात पोर्टल कसं बनवायचं हे शिकत होतेच; पण मग त्यांनी खरंखुरं एक पोर्टल बनवलं, जे आता रोजच्या कामासाठी त्यांचं विद्यापीठ वापरणार आहे.

कोल्हापूरच्या केआयटी कॉलेजची भन्नाट कल्पना
 
प्राध्यापकांनी एक कल्पना सुचवली, आणि त्या कल्पनेवर काम करत करत विद्याथ्र्यानी एक भन्नाट गोष्ट साकारली. इतकी भन्नाट की विद्यापीठानं तर त्याची दखल घेतलीच; पण कॉलेजातही एक नवीन उपक्रम सुरू झाला.
कोल्हापुरातील केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिग्ांच्या दहा विद्याथ्र्यानी बनवलेल्या वेब पोर्टलची ही एक भन्नाट गोष्ट. कॉलेजातले विद्यार्थीच पोर्टल बनवतात आणि फक्त कॉलेजच नाही तर थेट विद्यापीठ ते पोर्टल स्वीकारत आपल्या रोजच्या व्यवहारात त्याचा उपयोग करायचं ठरवतं, ही गोष्टच किती वेगळी वाटते. पण तसं घडलंय ते कोल्हापुरात. कोल्हापूच्या केआयटी इंजिनिअर कॉलेजच्या विद्याथ्र्यानी आपला प्रोजेक्ट म्हणून जे पोर्टल बनवलं ते कोल्हापूरच्याच शिवाजी विद्यापीठांतर्गत 25क् कॉलेजेसना आता जोडण्यात येणार आहे. आणि संपर्क कारभार पेपरलेस करण्यावर भरही देण्यात येणार आहे.
एनएसएस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग ऑनलाइन नेण्याच्या कल्पनेतून हा प्रोजेक्ट सुरू झाला. मात्र दहा हुशार डोक्यांनी तयार केलेला हा प्लॅटफॉर्म अव्युक्त ( as clear as crystal’) या नावानं पोर्टल म्हणून आकारास आला.
केआयटीचे प्रा. अमित वैद्य एनएसएस विभागात तीन वर्षे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या विभागाला ऑनलाइन स्वरूप देणं गरजेचं आहे असं त्यांना प्रत्यक्ष कामकाज करताना जाणवलं. त्यांनी ही कल्पना प्रा. राजेश गाडे यांना सांगितली. विद्यार्थी समन्वयानंतर दहा विद्याथ्र्यानी हे पोर्टल तयार करण्याचं आव्हान स्वीकारलं. हे सहा विद्यार्थी आणि चार विद्यार्थिनी केआयटीमध्येच माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागात तिस:या वर्षात शिकतात. शिकता शिकता काहीतरी वेगळं करायला मिळालं तर उत्तम अनुभवपण मिळेल, काम करण्याची मजा येईल असं वाटून या दोस्तांनी प्रा. गाडे व प्रा. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली. प्रथम त्यांनी शिवाजी विद्यापीठातील एनएसएस विभागाशी संपर्क साधून तेथील विभागप्रमुखांच्या संमतीने विभागाची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर वेब पोर्टलवर काम सुरू झालं. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत या प्रोजेक्टवर काम करणा:या प्रत्येकानं आपापली आयडिया वापरून पोर्टल डेव्हलप करायला सुरुवात केली. विद्यापीठ व त्याअंतर्गत येणा:या 25क् कॉलेजच्या एनएसएस विभागांना संपूर्णपणो ऑनलाइन जोडण्याचं काम सुरू झालं. एनएसएसमध्ये सहभागी विभाग, त्यांचं काम, या योजनेत सहभागी मुलं, त्या प्रत्येक विद्याथ्र्याचा डेटा भरणं, विद्यापीठाच्या सूचना, मार्गदर्शन, पत्रव्यवहार, सर्व कॉलेजमार्फत होणारी शिबिरं, चर्चासत्रं, छायाचित्रं हे सारं अपलोड करण्याची सुविधा यात तयार करण्यात आली.
पण अर्थातच काम सोपं नव्हतं. सकाळी 9 ते सायंकाळी 5 कॉलेजमधील तास करून त्यानंतर रात्री उशिरार्पयत या पोर्टलवर काम केलं जायचं. कॉलेजनेही या मुलांना लॅबबरोबरच 2क् संगणकांसह इंटरनेटची सुविधा दिली होती. त्यामुळे अडीच महिन्यांत या सॉफ्टवेअरला ब:यापैकी मूर्त स्वरूप आलं. शिवाजी विद्यापीठाच्या एनएसएस विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, एस.व्ही. शिखरे यांच्यासमोर 14 मार्चला प्रथम सादर केलेल्या डेमोचं त्यांनी कौतुक केलं. आणि हे सॉफ्टवेअर प्रत्यक्षात वापरण्याविषयी संमती दर्शविली. त्यानंतर विद्यापीठात कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, बीसीयूडी संचालक डॉ.डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव व्ही.एन. शिंदे तसेच काही कॉलेजचे प्राचार्य यांच्यासमोर ग्रुपमधील दीपक पेडणोकर व अनुराधा पोवार या विद्याथ्र्यानी ‘अव्युक्त’चं डिजिटल प्रेङोंटेशन केलं. ही भन्नाट कल्पना कुलगुरुंनाही आवडली. त्यांनी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे कौतुक केलंच, शिवाय या पोर्टलद्वारेच केंद्र शासनाला या विभागाचा अहवाल एका क्लिकवर मिळावा, विद्यापीठ व त्याअंतर्गत येणा:या कॉलेजच्या परिसरातील आव्हानं प्रकल्पाच्या स्वरूपात सर्व कॉलेजना कळावीत, विभागाशी संबंधित माहितीची देवाण-घेवाण व्हावी, शासकीय रुग्णालयं व रक्तपेढींना रक्तदात्यांची माहिती ऑनलाइन मिळावी, अवयवदानाचा प्रचार व प्रसार या साइटमार्फत व्हावा अशाही काही सूचना कुलगुरुंनी केल्या.
या सूचना स्वीकारून हे विद्यार्थी आता पोर्टलवर अधिक काम करत आहे. संपूर्ण अपटेडेट सॉफ्टवेअर एप्रिलअखेर विद्यापीठाला प्रत्यक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी केआयटी व विद्यापीठाचा करार होण्यास पत्रद्वारे संमतीही दिली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ हे सॉफ्टवेअर वापरणार आहे. केआयटीचे विभागप्रमुख तानाजी पाटील, प्राचार्य डॉ. व्ही.व्ही. काजिर्णो, संचालक या सा:यांच्या मदतीनं एक वेगळा आणि प्रत्यक्ष व्यवहारात उपयुक्त असा उपक्रम या मुलांनी आकारास आणला, याचाच त्यांना जास्त आनंद आहे.
ही एक नवीन सुरुवात आहे, तंत्रज्ञान विकसित करून आपलं आपण वापरण्याची, अशी या मुलांची भावना म्हणूनच महत्त्वाची आहे.
 
पोर्टल कशासाठी?
विद्यापीठाचा एनएसएस विभाग व विभागाशी संबंधित प्रत्येक विद्याथ्र्याची संपूर्ण माहिती या पोर्टलमध्ये भरण्याची सुविधा आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठ, संबंधित कॉलेजचे समन्वयक व विभागाचे विद्यार्थी यांच्यासाठी यूजर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या सूचना, पत्रव्यवहार तसेच चर्चासत्रे, छायाचित्रे, सूचना संगणकात स्टोअर होणार आहेत. हा विभाग पेपरलेस होणार असून, लाखो कागद, पैसे तसेच वेळेचीही बचत होणार आहे. 
 
टीम ‘अव्युक्त’
दीपक पेडणोकर, शाहीन बागवान, अनुराधा पोवार, अनुजा घोरपडे, आकाश डांगी, ऐश्वर्या नलवडे, ओंकार रसाळ, राजदीप पाटील, तेजप्रकाश कुमावत, शंतनू कबनूरकर.
 
 
मुळात वेब पोर्टलसाठी लागणारी माहिती ही आमच्या अभ्यासक्रमातील बेसिक माहिती होती. मात्र, तरी प्रत्यक्ष काम सोपं नव्हतं. प्रत्येक अडचणीला गाडे सरांचं मार्गदर्शन मिळत गेलं. प्रश्नातून उत्तर सापडत गेलं आणि किचकट वाटणारी प्रक्रिया सोपी होत गेली. या प्रक्रियेतून आम्हाला सध्याच्या अभ्यासक्रमापेक्षा खूपच जास्त ज्ञानही मिळालं.
-  अनुजा घोरपडे, विद्यार्थिनी
 
- भरत बुटाले
( लेखक ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक  आहेत.)