शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
5
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
6
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
7
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
8
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
9
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
10
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
11
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
12
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
13
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
14
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
15
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
16
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

खमक्या पावलांत दम

By admin | Updated: August 6, 2015 17:08 IST

काहीजण आता अनवाणी नुस्ते पळत नाहीत, तर अनवाणी चालतातही. घरातही, घराबाहेरही! चप्पल-बूट न घालता चालणं हे त्यांनी आता आपल्या लाइफस्टाईलचा भाग बनवलंय! कशासाठी??

- सुनील डिंगणकर

 
मुंबईत दादरच्या भरवस्तीतल्या हॉटेलमध्ये दुपारी सव्वातीनच्या सुमारास तो भेटला.
त्यानं टी-शर्ट घातला होता, ट्रॅक पँट होती आणि पायात?
पायात काहीही नव्हतं. तो चक्क अनवाणी आला होता. त्याचं नाव सुमीत पाटील. 
तू असा अनवाणी कसा आलास हे त्याला विचारलं तर तो म्हणाला, ‘घराच्या जवळपास जायचं असेल तर मी अनवाणीच जातो. कशाला लागतात बूट?’
हा सुमीत पाटील पट्टीचा सायकलपटू आणि धावपटू आहे. धावण्याचा सराव तर तो अनवाणी करतोच, पण पूर्ण लांबीची म्हणजेच 42 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉनही तो अनवाणीच धावतो. बूटबिट ही भानगडच नाही.
त्याला विचारलं या अनवाणी चालण्या-धावण्याविषयी तर तो सांगतो, ‘‘माणसाच्या पायांची रचनाच अनवाणी धावण्यासाठी आहे. आपणच या पायांवर बुटाचे आवरण चढवून त्यांच्या क्षमतेवर मर्यादा आणतो.’’
आपला मुद्दा अधिक तपशिलात जाऊन सांगताना तो आपल्या पायाची रचनाच समजावतो. सांगतो, ‘‘आपला पाय लवचिक असतो. त्याची बोटं आपल्याला हलवता येतात. निसर्गानेच आपल्या पायांची अशी रचना केली आहे. आपण अनवाणी धावतो तेव्हा आपण पायाचा पुढचा भाग म्हणजेच टाच टेकवतो. पृष्ठभाग जसा असेल त्याप्रमाणो बरोबर आपला पाय पडतो. मेंदूला हे सगळे सिग्नल पायातल्या नसा व्यवस्थित पोहचवत असतात. रस्ता खडबडीत असेल किंवा पायाखाली दगड येत असतील तर मेंदूला ते कळताच आपले गुडघे शिथिल होतात आणि पाय हळुवार पडतो. त्यामुळे दगड-खडेगोटे आतमध्ये शिरत नाहीत. (अगदीच उभा खिळा वगैरे असेल तर तो पायात जातो, पण बूट असले तरीही तो जाऊ शकतोच.) 
जेव्हा आपण बूट घालून धावतो तेव्हा पायाखाली अजून एक आवरण असतं. सोल जाड असतं. असं करून आपण आपल्या पायांचं ‘खूर’ करतो. बूट घालून धावताना आपण टाचेच्या ऐवजी काही वेळा अंगठे टेकवून धावत असतो, जे चुकीचं आहे. त्याचप्रमाणो धावताना एक पाय जमिनीला टेकलेला आणि एक अधांतरी अशी अवस्था असते. पण पाय टेकला आहे याची मेंदूला खात्री हवी असते, तेव्हाच तो दुसरा पाय उचलण्याचे आदेश देतो. पण बूट असल्यामुळे पाय टेकलाय हा संदेश मेंदूर्पयत पोहोचविण्यासाठी आपल्याला पाय जोरात जमिनीवर आपटावा लागतो. असे करताना पोटरीतील स्नायूंवर आणि गुडघ्यातील सांध्यांवर ताण येतो. या उलट अनवाणी धावताना पाय टेकलाय हे मेंदूला सांगण्यासाठी वेगळे कष्ट घ्यायची गरज नसते. त्यामुळे स्नायू किंवा सांध्यांवर अधिक भार येत नाही.
आदिवासी भागातले कातकरी आजही भारे डोक्यावर घेऊन जंगलातून, पायवाटेवरून, मुख्य रस्त्यावर भरभर जाताना दिसतात. जगभरातसुद्धा अनवाणी धावण्याचा ट्रेंड आता वाढू लागला आहे.’’
सुमीत अनवाणी चालण्या-धावण्याचा तर्क समजावून सांगतो.
सुमीतसारखे अनेकजण आता असे अनवाणी धावत आहेत, मॅरेथॉनही अनेक रनर्स अनवाणीच धावू पाहत आहेत.
आणि पायात चपला बुटं न घालता चालणं अनेकांच्या नव्या लाइफस्टाईलचा भाग बनत आहे.
 
- 1960 साली रोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिकमधील मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा अबिबी बिकिला अनवाणी धावून जिंकला होता. 
 
- 1970 च्या दशकात भारतातील मॅरेथॉन धावपटू शिवनाथ सिंग हेसुद्धा धावताना पायाला केवळ पट्टय़ा बांधून धावत असत. 
 
- 1980 च्या सुमारास दक्षिण आफ्रिकेची धावपटू झोला बड हीसुद्धा स्पर्धामध्ये अनवाणी धावत असे. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलिट्स फेडरेशन्सतर्फे 1985 व 1986 च्या जागतिक क्रॉस कण्ट्री चॅम्पियनशिप स्पर्धामध्ये अनवाणी धावत तिने विजेतेपद पटकावले होते. 
 
- 21 व्या शतकात अनवाणी धावणा:यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात भर पडत आहे. याच संदर्भात 2009 साली प्रकाशित झालेल्या बॉर्न टू रन या पुस्तकामुळे अनेक जण प्रभावित झाले आहेत. 
 
- 2010 साली न्यूयॉर्कमध्ये आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत अनवाणी धावणा:यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली होती. 
 
- बेअरफूट रनर्स ऑफ इंडिया फाउंडेशनतर्फे नवी मुंबई येथील खारघरमध्ये अर्ध-मॅरेथॉन (21 किलोमीटर) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 366 स्पर्धक सहभागी झाले होते. 
 
- अनवाणी धावण्याकडे वाढता कल पाहून पादत्रणो तयार करणा:या काही नामांकित कंपन्यांनी पातळ सोल असलेले बूट, चपला तयार करण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी या बुटांमुळेसुद्धा पायाखाली एक पातळ का होई ना, पण सोल असते. त्याला पूर्ण अनवाणी धावण्याची सर नाही. तात्पर्य ‘आपलेच पाय, आपलेच स्नायू आणि आपलेच गुडघे’ त्यामुळे लेट्स गिव्ह इट अ ट्राय!
 
अनवाणी धावण्याची सुरुवात कशी कराल?
तुमचा रोजचा धावण्याचा सराव असेल आणि अगदी 10 किलोमीटर धावत असाल तरी अनवाणी धावण्याची सुरुवात करताना सुरुवातीला 400 मीटरच अनवाणी धावा. अनवाणी धावण्याने अधिक आनंद मिळतो. त्यामुळे कदाचित त्या उत्साहात जास्त धावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पण असे करणो टाळा. आठवडा, दहा दिवस 400 मीटर अनवाणी धावा. त्यानंतर हळूहळू हे अंतर वाढवत न्या. एकदा सवय झाली की मग मागे वळून पाहायची आवश्यकता नाही.
हेदेखील अवघड वाटत असेल तर सरळ आधी अनवाणी चालायला लागा. घरातल्या घरात अनवाणी चाला. (हो, आताशा अनेकजण घरातही चपलाच घालून फिरतात.)
मग बाहेर थोडं अंतर अनवाणी चालत जा.
त्यानंतर घराच्या पार्किगमधे एखाद्या आवारात अनवाणी पळा.
आणि मग रस्त्यावर पळा.
थोडं अंतर पळा. 
कधी गवत, कधी माती असा सराव करा.
त्यांनतर आपोआपच शरीराचं प्रशिक्षण होईल आणि अनवाणी पळताना स्पीड आणि अंतर दोन्हीही सांभाळत उत्तम पळता येईल.
 
पायांना काही झालं तर?
सुमीतचा एक मित्र त्याच्याकडून प्रेरणा घेऊन अनवाणी धावू लागला. त्याने पूर्ण मॅरेथॉनही पूर्ण केली. आपली ही अचिव्हमेंट त्याने फेसबुकवर शेअर केली. त्यावर त्यालाही असे न करण्याबद्दल आणि काळजी घेण्याबद्दल प्रतिक्रिया मिळाल्या. या प्रतिक्रियांना त्याचं उत्तर होतं. ‘‘बूट घालून पूर्ण मॅरेथॉन धावल्यावर आठवडाभर पोटरीचे स्नायू दुखतात, लंगडत चालावे लागते. पण अनवाणी धावल्याच्या दुस:या दिवशी सकाळी पुन्हा 10 किलोमीटर धावलो. यातच सगळं आलं.