शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

पोलंडमध्ये राहताना कोविड काळात जगणं कसं बदललं याची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 18:24 IST

पोलंडच्या पोझनान शहरात राहताना कोरोनाचा संसर्ग त्यालाही झाला. मात्र त्यामुळे दूरदेशी राहताना कोविड काळात जगणं कसं बदललं याची कहाणी तो सांगतोय.

ठळक मुद्देपोलंड, सायकल आणि स्वयंपाक

अंकुर गाडगीळ

फेब्रुवारीच्या मध्यापासून युरोपात कोविडच्या बातम्यांनी जोर धरला होता. बाकीचे देश हळूहळू लॉकडाऊनबद्दल बोलायला लागले होते. पण सुदैवाने पोलंडमध्ये तोवर तरी कोणी रुग्ण नसल्याने सगळं सुरळीत सुरू होतं. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात पोझनान (मी सध्या ज्या शहरात आहे तिथेच) शहरात पहिला रु ग्ण आढळला. एकच धावपळ सुरू झाली. 12 मार्चपासून इथे लगेच लॉकडाऊनची सुरुवात झाली. आमचे विद्यापीठही बंद केले. माङो संशोधन मेंदूसंबंधित असल्याकारणाने मेंदूच्या पेशी मी प्रयोगशाळेत वाढवतो. त्यात खर्च आणि वेळेची खूप गुंतवणूक असल्याकारणाने सुरू असलेला प्रयोग मध्येच गुंडाळणो शक्य नव्हते. त्यामुळे विद्यापीठाची परवानगी काढून काम सुरूच होते. प्रवास सार्वजनिक वाहनांनी होत असल्यामुळे बहुतेक विषाणूच्या संपर्कात आलो. योगायोगाने काम पूर्ण झाले अगदी त्याच संध्याकाळी आजारी पडलो. मार्च महिन्याचा उत्तरार्ध आजारपणात गेला. बाहेरच्या देशात राहताना आजारी पडणो यासारखा कठीण काळ नाही. आजारपणात हलके जेवण बरे याकारणाने स्वत:च स्वयंपाक करून खाण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच बाहेर जाणं म्हणजे आजार पसरवणं म्हणून घरातच एकटं राहणं हाच एकमेव मार्ग. मी ज्या वसतिगृहात राहतो तिथे आणखी 8 जण भारतातले आहेत. पीएचडी करीत आहेत.  सगळे मदतीसाठी तत्पर होते. परक्या देशात या मैत्नीचा आधार नक्कीच सुखावणारा असतो.आपल्याकडे सर्वसाधारण एक समाज असतो की पश्चिमी देशांत सगळेच किती शिस्तीने वागतात, नियम पाळतात. इथल्या बातम्या, इतर देशातील मित्नांकडून समजलेली माहिती, आणि पोलंडमधील स्वत:चे निरीक्षण यावरून पोलंडबद्दल तरी नक्कीच सांगू शकतो की, सगळीकडे माणसं ही सारखीच. इथे लॉकडाऊन होणार असं समजताच लोकांनी दुकानांमध्ये झुंबड केली होती. तांदूळ, पास्ता, कांदे-बटाटे, दूध, अंडी अक्षरश: गायब झाली होती. सर्वात अवाक् करणारी गोष्ट म्हणजे टॉयलेट पेपरसारख्या गोष्टीची लोकांनी दोन-तीन महिने पुरेल इतकी साठेबाजी करून ठेवली होती. इथे एक बातमी खूप प्रसिद्ध झाली होती ती म्हणजे या सगळ्या साठेबाजेवार सरकार नियंत्नण आणण्याचा प्रयत्न करत होते आणि संशय आल्यास तपास करत होते. एका तपासणीत असे आढळून आले की, एका व्यक्तीने त्याच्या घराची एक संपूर्ण खोली टॉयलेट पेपर रोलनी भरून ठेवली होती. गरजेच्या वस्तूंव्यतिरिक्त बाकीची दुकानं बंदच होती, घराबाहेर योग्य कारणाशिवाय बाहेर पडल्यास दंड भरावा लागत होता. दोन व्यक्तींपेक्षा जास्त जणांना जमायला बंदी होती. एप्रिल उजाडला. नवीन उत्साह सोबत घेऊन आला. तब्येत पूर्वपदावर आली होती. पाककलेचा परीघ रुंदावायला सुरु वात झाली. या लॉकडाऊनमध्ये हे नवीन शिकल्याचा नक्कीच आनंद झाला. पूर्वी मी इथल्या कुटुंबाकडे जाऊन आम्ही भारतीय जेवणाचा बेत करत असू, पण या काळात ते कठीण झाल्याने आम्ही त्यावर एक तोडगा काढला. आठवडय़ातून एकदा जेवण बनवून त्यांना डबा देत होतो, आणि बदल्यात उत्तम मेजवानी मिळायची. एकदा वाटलं मुंबईचा डबेवाला इथेसुद्धा पोचायला पाहिजे. (खरंच आपण या अशा अनेक बाजारपेठा काबीज करायला पाहिजेत). सार्वजनिक प्रवास वाहनं वापरणं टाळायचं म्हणून मग सायकल घेतली. सोबतच पोझनान भ्रमंतीची कक्षा वाढली, एक चांगली गोष्ट घडली या लॉकडाऊनमुळे. मे महिना उजाडला आणि हळूहळू कामावर परतण्याचे वेध सुरू झाले. त्यातच मुंबईच्या के. सी. महाविद्यालयातून अतिथी वक्ता म्हणून आमंत्नण आले. ऑनलाइन स्वरूपात सादरीकरण झाले आणि छान सकारात्मक प्रतिसाद मिळाला.कामाचा हुरूप वाढला.

आता जूनमध्ये सध्या पोलंडमध्ये अगदीच मोजके रुग्ण आहेत. 28 जूनला इथे राष्ट्रपतिपदासाठी निवडणुका आहेत आणि स्थानिक लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, निवडणुकांनंतर खरी परिस्थिती समजेल. सत्य काय आहे ते लवकरच समजेल. कोविडमुळे आपल्याला आत्मपरीक्षणाची संधी मिळाली आहे हे मात्न तेवढेच खरे आहे. विज्ञान, संशोधन आणि विकास, पर्यावरण यांना आपण कुठल्या स्थानावर ठेवायला हवं हे लक्षात आलं.आणि पोलंडच्या या कोविड काळातल्या वास्तव्यात मीही बरंच काही शिकलो, दोस्तांशी बोललो.त्याविषयी पुढच्या अंकात.

( अंकुर सध्या पोलंड येथे पीएचडी करतो आहे.)