- अमृता दुर्वे
पबजीवाला है क्या?असा प्रश्न 68 वर्षाच्या पंतप्रधानांनी विचारला, त्यावर बरीच चर्चा झाली, मात्र त्यातून या गेमची लोकप्रियता किती आहे ते जाहीर झालं. गुजरात, जम्मू आणि काश्मीरसारख्या राज्यांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही गेमिंग ही डिसऑर्डर असू शकते असं म्हटलं आहे. अर्थात लोकप्रिय आहे म्हणून बंदी आणि बंदीनं सवय सुटणं हे समीकरण किती फलदायी होइल हे सांगता येणं कठीण असलं, तरी या पबजीनं मोबाइल गेमिंग इंडस्ट्री बदलली हे मात्न नक्की !गेम्सच्या लाटा येणं-जाणं, त्यांची चर्चा होणं, त्यापायीची दिवानगी हे सारं काही नवीन नाही. आतार्पयत बॅटल ग्राउण्ड असलेले पबजीसारखेही इतके गेम्स आले-गेले. मग हा पबजी इतका का लोकप्रिय झाला? त्याची उत्तरं शोधण्याचा जरा प्रय} करू. कारण त्या उत्तरांतच या गेमची दिवानगी दिसू शकते. 1. एकतर या गेमचं कथानक अगदी सोपं आहे. तुम्ही एका प्रदेशात उतरता जिथं तुमच्याकडे काहीच नाहीये. मग तिथं टिकून राहण्यासाठी तुम्हाला जे जे लागेल ते ते सगळं करायचं आहे. शस्रं शोधायची आहेत. टिच्चून राहायचं आहे. तुम्हालाच नाही तर तिथं त्या प्रदेशात असणार्या सगळ्यांच्या समोर हे एकच ध्येय आहे. मग तुम्ही एकटं खेळू शकता, दोघं खेळू शकता किंवा मग चार जणांची टीम करूनपण खेळू शकता. पण या गेमची लोकप्रियता इतकी आहे, की तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळात खेळायला सुरुवात केली तरी तुम्हाला टक्कर द्यायला तिथं लोकं असतातच, अगदी मध्यरात्नीही. त्यामुळे गेम म्हटलं तर एकटा खेळायचा असतो, म्हटलं तर तिथं लोक असतात तुमच्याशी खेळायला. मग गुंतून जाणं सहज होतं.2. हा खेळ लोकप्रिय करण्यासाठी निर्मात्यांना कधी फार प्रसिद्धी करावी लागलीच नाही. याच्या डेस्कटॉप व्हर्जनचं अनेक यू-टय़ूबर्सनी स्ट्रीमिंग सुरू केलं, आणि अल्पावधीत हा गेम जगभर पोहचला. हा गेम दिसायला चांगला होता आणि तासन्तास खेळता येण्याजोगा होता. 3. पण पबजीने सगळ्यात जास्त बाजी मारली ती मोबाइल गेमिंगमध्ये. आणि हीच गोष्ट गेमचेंजर ठरली. आतार्पयत गेमिंगसाठी तुमच्याकडे हाय एण्ड गॅजेट असणं गरजेचं होतं. स्ट्राँग प्रोसेसर असणारा लॅपटॉप किंवा मग हाय एण्ड फोन. पण पबजीने ही गोष्ट बदलली. आतार्पयत प्ले स्टेशन, एक्स बॉक्स आणि महागडय़ा लॅपटॉपवाल्यांसाठी असणारं गेमिंग अचानक सर्वासाठी खुलं झालं. बजेट रेंज मधल्या फोनवर गेमिंग करता येऊ लागलं. शिवाय गेम फ्री असल्याने गेमिंगसाठी पैसे मोजावे लागले नाहीत. त्यामुळे आतार्पयत जे गेमिंग हे फक्त हार्डकोर गेमर्सर्पयत मर्यादित होतं, ते हौशी गेमरसाठी खुलं झालं. वेळ मिळेल तेव्हा, हवं तेव्हा, हवं तिथं खेळता येऊ लागलं.4. तरुणांच्या आसपासचे सगळेच हा गेम खेळत असल्याने एक वेगळीच स्पर्धा यात निर्माण झाली. बाजारात आलेले अनेक ब्रॅण्ड्स, स्वस्त झालेले फोन्स आणि मोबाइल सेवा देणार्या कंपन्यांच्या युद्धात स्वस्त झालेला इंटरनेट डेटा, हे सगळंच गेमच्या लोकप्रियतेसाठी पूरक ठरलं.5. पबजीच्या निर्मात्यांनीपण मग आपल्या गेमर्सना खूश ठेवण्याची बरोबर काळजी घेतली. वेळोवेळी येणारे अपडेट्स, नवीन मोड्स या सगळ्यांनी खेळातली रंजकता कायम ठेवली आहे.
(स्वतंत्र पत्रकार आण तंत्रज्ञान अभ्यासक)