शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

पबजी खेळताय? या 5 गोष्टी माहिती आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 15:09 IST

तंत्रज्ञान अभ्यासक म्हणतात, गेमिंग इंडस्ट्रीची समीकरणंच बदलली तिथं सामान्य गेमरला कोण विचारतं?

ठळक मुद्दे गेमिंग हे फक्त हार्डकोर गेमर्सर्पयत मर्यादित होतं, ते हौशी गेमरसाठी खुलं झालं. वेळ मिळेल तेव्हा, हवं तेव्हा, हवं तिथं खेळता येऊ लागलं.

- अमृता दुर्वे

पबजीवाला है क्या?असा प्रश्न 68 वर्षाच्या पंतप्रधानांनी  विचारला, त्यावर बरीच चर्चा झाली, मात्र त्यातून या गेमची लोकप्रियता किती आहे ते जाहीर झालं. गुजरात, जम्मू आणि काश्मीरसारख्या राज्यांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही गेमिंग ही डिसऑर्डर असू शकते असं म्हटलं आहे. अर्थात लोकप्रिय आहे म्हणून बंदी आणि बंदीनं सवय सुटणं हे समीकरण किती फलदायी होइल हे सांगता येणं कठीण असलं, तरी या पबजीनं मोबाइल गेमिंग इंडस्ट्री बदलली हे मात्न नक्की !गेम्सच्या लाटा येणं-जाणं, त्यांची चर्चा होणं, त्यापायीची दिवानगी हे सारं काही नवीन नाही. आतार्पयत बॅटल ग्राउण्ड असलेले पबजीसारखेही इतके गेम्स आले-गेले. मग हा पबजी इतका का लोकप्रिय झाला? त्याची उत्तरं शोधण्याचा जरा प्रय} करू. कारण त्या उत्तरांतच या गेमची दिवानगी दिसू शकते. 1. एकतर या गेमचं कथानक अगदी सोपं आहे. तुम्ही एका प्रदेशात उतरता जिथं तुमच्याकडे काहीच नाहीये. मग तिथं टिकून राहण्यासाठी तुम्हाला जे जे लागेल ते ते सगळं करायचं आहे. शस्रं शोधायची आहेत. टिच्चून राहायचं आहे. तुम्हालाच नाही तर तिथं त्या प्रदेशात असणार्‍या  सगळ्यांच्या समोर हे एकच ध्येय आहे. मग तुम्ही एकटं खेळू शकता, दोघं खेळू शकता किंवा मग चार जणांची टीम करूनपण खेळू शकता. पण या गेमची लोकप्रियता इतकी आहे, की तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळात खेळायला सुरुवात केली तरी तुम्हाला टक्कर द्यायला तिथं लोकं असतातच, अगदी मध्यरात्नीही. त्यामुळे गेम म्हटलं तर एकटा खेळायचा असतो, म्हटलं तर तिथं लोक असतात तुमच्याशी खेळायला. मग गुंतून जाणं सहज होतं.2. हा खेळ लोकप्रिय करण्यासाठी निर्मात्यांना कधी फार प्रसिद्धी करावी लागलीच नाही. याच्या डेस्कटॉप व्हर्जनचं अनेक यू-टय़ूबर्सनी स्ट्रीमिंग सुरू केलं, आणि अल्पावधीत हा गेम जगभर पोहचला. हा गेम दिसायला चांगला होता आणि तासन्तास खेळता येण्याजोगा होता. 3. पण पबजीने सगळ्यात जास्त बाजी मारली ती मोबाइल गेमिंगमध्ये. आणि हीच गोष्ट गेमचेंजर ठरली. आतार्पयत गेमिंगसाठी तुमच्याकडे हाय एण्ड गॅजेट असणं गरजेचं होतं. स्ट्राँग प्रोसेसर असणारा लॅपटॉप किंवा मग हाय एण्ड फोन. पण पबजीने ही गोष्ट बदलली. आतार्पयत प्ले स्टेशन, एक्स बॉक्स आणि महागडय़ा लॅपटॉपवाल्यांसाठी असणारं गेमिंग अचानक सर्वासाठी खुलं झालं. बजेट रेंज मधल्या फोनवर गेमिंग करता येऊ लागलं. शिवाय गेम फ्री असल्याने गेमिंगसाठी पैसे मोजावे लागले नाहीत. त्यामुळे आतार्पयत जे गेमिंग हे फक्त हार्डकोर गेमर्सर्पयत मर्यादित होतं, ते हौशी गेमरसाठी खुलं झालं. वेळ मिळेल तेव्हा, हवं तेव्हा, हवं तिथं खेळता येऊ लागलं.4. तरुणांच्या आसपासचे सगळेच हा गेम खेळत असल्याने एक वेगळीच स्पर्धा यात निर्माण झाली. बाजारात आलेले अनेक ब्रॅण्ड्स, स्वस्त झालेले फोन्स आणि मोबाइल सेवा देणार्‍या  कंपन्यांच्या युद्धात स्वस्त झालेला इंटरनेट डेटा, हे सगळंच गेमच्या लोकप्रियतेसाठी पूरक ठरलं.5. पबजीच्या निर्मात्यांनीपण मग आपल्या गेमर्सना खूश ठेवण्याची बरोबर काळजी घेतली. वेळोवेळी येणारे अपडेट्स, नवीन मोड्स या सगळ्यांनी खेळातली रंजकता कायम ठेवली आहे.

(स्वतंत्र पत्रकार आण तंत्रज्ञान अभ्यासक)