शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्लेइंग इट माय वे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 08:32 IST

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, धनराज पिल्ले.. यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंची फर्स्ट हॅण्ड आणि आॅथराइज्ड माहिती आपल्याला कुठे मिळणार?

-प्रज्ञा शिदोरे

अती प्रसिद्ध व्यक्तींना एक पेच कायम सतावत असतो, तो म्हणजे आपल्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्य यात फरक तो काय? हा पेच अर्थातच त्यांच्यावर नाटक, सिनेमा किंवा पुस्तक लिहायचे झाले तर पडू शकतो. काहीजण त्यावर सोपं उत्तरं शोधतात, आत्मचरित्र वगैरे लिहायच्या भानगडीतच पडत नाहीत. सचिन तेंडुलकर सारखे लोक त्यावर मध्यमार्ग काढतात आणि ‘प्लेइंग इट माय वे’सारखं पुस्तक प्रकाशित करतात.

या पुस्तकात सचिनने त्याच्या आयुष्यात आलेल्या महत्वाच्या प्रसंगांना तो कसा सामोरं गेला, काही अवघड निणर्यांमागची पाश्वर्भूमी काय होती याविषयीची मांडणी केली आहे. यामध्ये क्रिकेटप्रेमी ज्याला ‘गॉड’चा दर्जा देतात तो माणूस म्हणून कसा आहे ते आपल्याला लक्षात येतं. लहानपणी त्याने खेळावर घेतलेले कष्ट, सर्वोत्तम ठरण्यासाठीची त्याची जिद्द, अतिशय क्लेशदायक शारीरिक व्याधींमधून बाहेर येण्यासाठी, खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि मानसिक ताकद, यामुळे सचिन माणूस म्हणून कसा घडला हे आपल्याला लक्षात येतं.

अति-लोकप्रिय व्यक्तींकडून शिकण्यासारखे काय तर हेच!भारतात खेळाविषयीचे साहित्य तसे थोडेच. पण यामध्ये मोलाची भर घालणारी दोन पुस्तके म्हणजे राहुल द्रविड बद्दलचे ईएसपीएनने प्रकाशित केलेले चरित्र - टाइमलेस स्टील आणि हॉकीपटू धनराज पिल्लेचे चरित्र - फर्गिव्ह मी अम्मा. खासकरून आपल्यासारख्या क्रिकेटवेड्या देशाला संदीप मिश्रा यांनी लिहिलेल्या ‘फर्गिव्ह मी अम्मा’मधून बरेच शिकण्यासारखे आहे! या पुस्तकामध्ये एकूणच खेळांकडे बघायची भारतीयांची वृत्ती आणि त्यातून धनराज पिल्ले सारख्या अभूतपूर्व हॉकीपटूला आलेली निराशा यावर उत्तम भाष्य केले आहे. ३ आॅलिम्पिक खेळ होऊनही भारताला सुवर्णपदक मिळवता आले नाही, यावर या कादंबरीचे नाव आधारित आहे.

सचिन आणि द्रविडची चरित्रे वाचाच, पण त्यामुळे धनराज पिल्ले यांच्यावरचे हे चरित्र मागे पडून देऊ नका!सचिन च्या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमिताने, हर्षा भोगले याने - राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि लक्ष्मण यांची मुलाखत घेतली. हा व्हिडीओ युट्युबवर न विसरता पहा. यामध्ये आपल्याला असे खेळाडू कसे घडतात याची उत्तरं मिळतील.