शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

चेहर्‍यावर पिंपल्स आलेत, चिडचिड होतेय, त्याचं हे कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 15:18 IST

गालावर पिंपल्स. पुटकुळ्या. मूड जातो. चिडचिड होते, आवाज बदलतो, ही सारी वाढीच्या वयात मोठं होण्याची लक्षण आहेत, या बदलांना घाबरू नका.

ठळक मुद्देपौगंडावस्थाचा काळ हा लहानपण व तारुण्य यातील संधीकालच होय. या अवस्थेत मुला-मुलींमध्ये शारीरिक आणि मानसिक असे आमूलाग्र बदल होत असतात. त्यामुळे या बदलांना घाबरू नका, फक्त आवश्यक तिथं मदत मागा, मोकळेपणानं बोला.

- डॉ. यशपाल गोगटे

वयात येतानाचा काळ. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये लैंगिक बदल घडवणारा हा काळ. निसर्ग नियमाप्रमाणे बालवयात सावकाश होणार्‍या बदलाला या अवस्थेत एकदम बुलेट ट्रेनप्रमाणे गती मिळते. उंची व लैंगिक बदलाबरोबर मानसिक व आकलनविषयक बदल या काळात घडत असतात. साधारणतर्‍ मुलींमध्ये बाराव्या वर्षी आणि मुलांमध्ये तेराव्या वर्षी हे अपेक्षित परिवर्तन घडत असतं.  या वयातील मुलांना अ‍ॅडोलेसन्ट अथवा टीन एजर्स असंही म्हणतात. या बदलाकरता जबाबदार असलेले  हार्मोन्स म्हणजे सेक्स हार्मोन्स. मानवी शरीरात तीन मुख्य सेक्स हार्मोन्स असतात - टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. हे हार्मोन्स पुरुषामध्ये वृषणात आणि स्त्रियांमध्ये बीजकोषात तयार होतात. पिटय़ुटरीमधील एफएसएच, एलएच व प्रोलॅक्टिन हार्मोन्स हे वृषण व बीजकोषातील हार्मोन्सवर नियंत्नण ठेवतात.शरीरामध्ये इतर संस्था जसे पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण आदी जन्मतर्‍ सक्रिय होतात. परंतु जननसंस्थेचे (रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम) चक्र  वेगळंच असतं. मुलींमध्ये आईच्या पोटात असताना कार्यरत असणारी ही संस्था जन्म झाल्यावर सुप्तावस्थेत जाते. मुलांमध्ये मात्न जननसंस्था जन्मानंतर सक्रिय होते व जवळ जवळ सहा महिन्यांर्पयत सक्रिय असते व त्यानंतर ती सुप्तावस्थेत जाते. याला मिनी पौगंडावस्था (मिनी प्युबरटी) असे म्हणतात. पुढे जाऊन एका विशिष्ट वयाला ही पुन्हा कार्यरत होते. हे बदल नक्की एका विशिष्ट वयातच का सुरू होतात याची कारणं अजून पूर्णपणे उलगडलेली नाही. शरीरशास्त्नाप्रमाणं बहुतेककरून योग्य वजन झाल्यावर हे बदल होण्यास सुरुवात होते. वजन वाढल्यामुळे चरबीतून एक संबंधित हार्मोन- लेप्टीन मेंदूतील हायपोथॅलॅमस या भागाला उत्तेजित करतो व पौगंडावस्थेला गती मिळते. हे काही प्रमाणात प्रत्येकात असणार्‍या जनुकांनी थोडंफार इकडे-तिकडे होऊ शकतं. हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुला-मुलींमध्ये चरबीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे ठरावीक टार्गेट वजन ही मुलं-मुली वयाआधीच प्राप्त करतात. बहुतेककरून लवकर वयात येण्याचं हे एक मुख्य कारण समोर आलं आहे. पौगंडावस्थेत होणारे हे बदल एका विशिष्ट वयोमर्यादेनुसार होत असतात. मुलींमध्ये स्तनांची, बीजकोषाची व गर्भाशयाची वाढ व विकास व मुलांमध्ये इंद्रियांची वाढ व विकास होत असतात. मिसरूड फुटणं, आवाज घोगरा होणं, शरीरावर केसांची वाढ होणं, घामाला विशिष्ट वास येणं हेदेखील सेक्स हार्मोन्समुळेच होत असतं. भावी काळात माता-पित्याची जबाबदारी घेण्यासाठीची ही पूर्वतयारी असते.पौगंडावस्थेत काही विशिष्ट आजार होत असतात. मुला-मुलींमध्ये आढळणारा आणि पौगंडावस्थेशी निगडित असा खास आजार म्हणजे तारुण्यपीटिका किंवा पिम्पल्स. हे बरेचवेळा आपोआपच बरे होत असतात. काहीवेळेस मात्न या आजाराकरता डॉक्टरी सल्ला व औषधं लागू शकतात. चष्मा लागणं, पाठीला कुबड येणं हे सुद्धा या वयात दिसणारे सामान्य आजार आहेत. पौगंडावस्थेत मुलींमध्ये अ‍ॅनिमिया म्हणजेच रक्त कमी होण्याची खूप जास्त शक्यता असते. अन्नातून योग्य प्रमाणात लोह न मिळाल्यास मुलींना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, उसळी- डाळी, धान्य वर्गातील घटक, मांस व काजू याचं योग्य प्रमाण असावं. पौगंडावस्थेत अनेक मानसिक बदलदेखील घडत असतात. त्यामुळे नैराश्य, चीड चीड करणं, टेन्शन येणं यासारखे मानसिक आजारदेखील या वयात जास्त आढळतात. आई-वडिलांनी आपल्या मुलांशी खुला, मोकळा केलेला संवाद अशावेळेस मदतीचा ठरतो. काहीवेळेस मात्न काउन्सलर अथवा मानसिकरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. पौगंडावस्थाचा काळ हा लहानपण व तारुण्य यातील संधीकालच होय. या अवस्थेत मुला-मुलींमध्ये शारीरिक आणि मानसिक असे आमूलाग्र बदल होत असतात. त्यामुळे या बदलांना घाबरू नका, फक्त आवश्यक तिथं मदत मागा, मोकळेपणानं बोला.

...हा आजार का होतो?

मुलांमध्ये आढळणारा पौगंडावस्थेतील एक आजार म्हणजे गायनेकोमास्टिया. या विकारात मुलांमध्ये स्त्नीसारखा छातीचा विकास होत असतो.  पौगंडावस्थेत सुरुवातीच्या काळात स्त्रियांचे हार्मोन्स इस्ट्रोजेन याचे अधिक प्रभुत्व असल्यानं हा होतो. हा आजार नसून एक नैसर्गिक बदल आहे.  बरेचवेळा वाढत्या वयाबरोबर हा आपोआपच बरा होतो. मात्न काही मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात असल्यास त्यावर औषधोपचार अथवा सर्जरी करता येऊ शकते. या बदलाचा तृतीय पंथी असण्याशी काही एक संबंध नाही. हल्ली जिममध्ये बॉडी बिल्डिंग करता काही हार्मोन्सच्या इंजेक्शन्सचा वापर होतो त्यामुळेदेखील गायनेकोमास्टिया होऊ शकतो.