ट्रायबल फॅशन्स
हा शब्द तर आपल्या कानावर नेहमी पडतोच.
मोठमोठाले चांदीचे, लाकडाचे पेंडण्ट, मण्याच्या माळा, दो:या हे सारं तर फॅशनेबल आहेच.
पण आता नवीन ट्रेण्ड आहे तो ट्रायबल नेल आर्टचा.
म्हणजे काय तर आपल्या नखांवर वारली चित्र.
कल्पना करून पाहा, मस्त वाटेल!
नेल आर्ट हे तसंही सध्याचं एकदम खास आणि हटके प्रकरण.
त्यात आता या ट्रायबल गोष्टी नखांवर सजायला सुरुवात झालेली आहे.
वारली चित्र, साप, नाग, वेली, फुलं यांसारखे अनेक आदिवासी डिझाइन्स नखांवर काढली जातात.
फक्त हाताच्याच नाही तर पायांच्या नखांवरही!
घरच्या घरी ट्राय करून पाहा.
डार्क बॅकग्राऊण्डवर कुठलीही ट्रायबल नक्षी खासच दिसते.
- श्रवणी बॅनर्जी