शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

टोक प्रेमाचे, अपेक्षांचे आणि भांडणांचे!

By admin | Updated: January 8, 2015 20:23 IST

‘ऑक्सिजन’ला आलेली सारी पत्रं वाचली, विशेषत: मुलांची पत्रं वाचली तर असं वाटावं की, बिच्चारी तरुण मुलं; त्यांना किती ऐकून घ्यावं लागतं, किती बोलतात या मुली!

सतत बोलणार्‍या 
‘एकेकट्या’ मुली
 
‘ऑक्सिजन’ला आलेली सारी पत्रं वाचली, विशेषत: मुलांची पत्रं वाचली तर असं वाटावं की, बिच्चारी तरुण मुलं; त्यांना किती ऐकून घ्यावं लागतं, किती बोलतात या मुली!
आणि मुलींची पत्रं वाचली तर वाटतं, की एवढं बोलूनही, या मुलींच्या मनावर मणामणाचं ओझं आहेच. आपल्याला मनातलं बोलताच येत नाही, जे बोलायचं असतं ते तो ऐकूनच घेत नाही, त्याला कळत नाही, आणि जाणवत तर काहीच नाही!
हे असं का होतंय, हे याच पत्रातून शोधायचा प्रयत्न केला तर दिसतं की, या मुली प्रचंड एकेकट्या आहे. एरव्हीही मुली प्रेमात पडल्या की, त्याच माणसाभोवती आपलं जग गुंफायला लागतात. ‘तो’ सोडून इतर कशात त्यांचं मन रमत नाही, गुंततही नाही. त्याच्या रिअँक्शनवर यांच्या सगळ्या अँक्शन अवलंबून होतात. मोबाईल हातात आल्यावर हे एककेंद्री जगणं अधिकच वाढलेलं दिसतं. त्यालाच सतत फोन करणं, एसएमएस करणं, तो प्रत्यक्ष सोबत नसला तरी फोनमुळे आपल्या सोबतच आहे असं वाटून सतत त्याच्याशी बोलत राहणं. तासंतास बोलणं. मुली प्रचंड बोलतात, प्रचंड वाचाळ झालेल्या दिसतात. प्रचंड शेअर करताना दिसतात. आपल्या दिवसाचा उठल्या क्षणापासून रात्री झोपेपर्यंतच हिशेब दिल्यासारखा त्याला सगळं सांगतच सुटतात. आणि अपेक्षाही ठेवतात की, त्यानं तसंच सारं सांगावं. पण तो इतका ‘वाचाळ’ झालेला नसल्यानं मुलींना ‘तो आपल्याला काहीच सांगत नाही’ असा जोरदार फील येतो. आणि त्यातून भांडणं, रुसवे-फुगवे, प्रचंड निराशा, पराकोटीची असुरक्षितता या टप्प्यातून बहुतांश मुली जाताना दिसतात.
हे सारं सुरू असतं तेव्हा या मुली फेसबुकवरही कमेण्टतात, इतर मित्रमैत्रिणींशीही आपल्या अफेअरबद्दल बोलत असतात.
बोलतात.बोलतात.बोलतच सुटतात!
निदान ही पत्रं वाचून तरी, हा प्रश्न पडलाच की, या अतीच बोलण्यानं प्रश्न सुटण्याऐवजी वाढत तर नाहीयेत.?
 
सोयीनं मॉडर्न
अबोल मुलं?
 
अनेक मुलींनी लिहिलं की, आम्ही बोलत असतो. तो ढिम्मच. सारखं म्हणावं लागतं, अजून.अजून.अजून बोल ना काहीतरी.
पण असं म्हटलं की, त्याचं डोकं फिरतं, अजून काय बोलू? झालं असेल तुझं बोलून तर ठेव ना फोन, तसंही आपल्यात कायम तूच तर बोलते.
हे त्याचं शेवटचं वाक्य. त्यानंतर ती फोन कट करुन टाकते. शेकडा नव्वद टक्के पत्रात हा उल्लेख आढळतोच. असं का होतं, हे शोधायचं म्हणून मुलग्यांची पत्रं नीट वाचली तर लक्षात येतं की, जी मुलं त्या मुलीनं ‘हो’ म्हणण्यापूर्वी पुरेशी ‘बोलकी’ असतात, तिला सतत फोन करुन इकडत तिकडम बोलतात, शेराशायरी फॉरवर्ड करतात, स्वत: काहीबाही खरडत, तिला सतत एण्टरटेन करत राहतात. ते एकदम धबधबे कोरडे पडावेत तसे एकदम आटूनच जातात त्यांच शब्द. हे असं का होतं?
नीट वाचलं तर लक्षात येतं, की ज्यावेळी जे करणं योग्य वाटतं, ते तेवढंच करतात. काम झालं, विषय संपला. त्यानंतर मात्र ती मुलगी किती बोलते, काय बोलते, आपण तिचं ऐकून घेतलं पाहिजे, ती डिमाण्डिग होत असेल तर आपण योग्य ती सॉफ्ट स्किल्स वापरून ते डील करायला पाहिजे. हे मुलांना माहितीच नाही.
हे टोक नाही तर ते टोक, असंच ते वागतात. आणि त्या वागण्यात प्रेमात पडलेल्या मुली बिथरतात.
मुलींनी आपल्या सोयीप्रमाणं वागावं, आपण बोलतं झालं की बोलावं, आपला मूड नसेल तर गप्प बसावं, आपण फोन केला तर पटकन फोन घ्यावा, आपण कामात असताना तिनं फोन करु नये.
शक्य झाल्यास काही विचारूच नये, प्रश्न तर नाहीच नाही.
ही अपेक्षा आजही आहेच.
प्रश्न निर्माण झालाय तो केवळ हातातल्या मोबाईलमुळे वाट्टेल तेव्हा बोलण्याचं स्वातंत्र्य मुलींना मिळाल्यामुळे.
आणि ते काही अजून तरुण मुलांच्या पचनी पडताना दिसत नाही, हे ही पत्रं सांगतात.
 
डिमाण्डिंग
मुलींचं करायचं काय?
 
सतत दर मिण्टाला फोन करकरुन जर घेतल्या-सोडल्या श्‍वासाचाच कुणी हिशेब मागत असेल तर समोरच्याला गुदमरल्यासारखं होणारच!
असं गुदमरवून टाकणारं प्रेम सध्या मुली करताना दिसतात. आपलं त्याच्यावर प्रेम आहे म्हणजे त्याची अतोनात काळजी घेतली पाहिजे. तो जेवला, झोपला, आजारी पडला, कुठे फिरायला गेला, त्याचे कपडे इस्त्री झालेत की नाही, त्याच्या बुटांना पॉलिश आहे की नाही इथपासूनची काळजी मुली आपापल्या घरी बसून करतात. अनेकदा हे अंतर दहा किलोमीटर ते हजार-पाचहजार किलोमीटरचंही असतं.
आपण काळजीपोटी आणि प्रेमापोटीच त्याच्याकडून शेअरिंगची अपेक्षा करतो, त्याला ‘साथ’ देतो असं त्यांना वाटतं. पण हे सारं करण्याच्या नादात आपण फार डिमाण्डिग होत चाललो आहोत. आपल्या नात्याला आपल्या तालावर नाचवतो आहोत, हे मुलींच्या लक्षातही येत नाही.
सतत फोन, सतत मॅसेज, मिण्टामिण्टाचे हिशेब, ते दिले नाहीतर भांडणं, रडबोंबल.
हे इतकं टोकाचं दिसलं या पत्रात की धास्तीच वाटावी. आणि काळजीही, मुलांची नाही तर मुलींची. आपल्या जवळची माणसं, मैत्रिणी, आपलं शिक्षण-करिअर हे सारं सोडून एकाच माणसात असं टोकाचं गुंतून घेतलं आणि पुढे ते नातंच तुटलं तर काय होईल या मुलींचं?
 
 
आक्रस्ताळा आक्रमक थयथयाट
 
आपण प्रेमात पडलोय, आपण कधीही एकमेकांशी बोलू शकतो, संपर्कात राहू शकतो, एका फोन पलिकडे आहेस तू ही भावना किती आनंददायी असते एरव्ही.
पण आलेल्या सगळ्या पत्रांमधे दिसला मुलामुलींचा आक्रमक आक्रस्ताळा थयथयाट.
रडरड, प्रचंड आरडाओरडा, दोषारोप आणि अपेक्षांचे हे भलेमोठे डोंगर.
अत्यंत त्रास होतो या सार्‍या कहाण्या ऐकून, सततची भांडणं वाचून, या मुलांना एकमेकांशी बोलल्याचा आनंद शेवटचा कधी झाला होता हे त्यांनाही सांगता येणार नाही इतकी टोकाची अस्वस्थता घेऊन अनेकजण जगताना दिसतात. त्यांना बोअरच झालेलं आहे त्यांचं नातं, पण केवळ सवय म्हणून ते रेटताहेत काही काळ. त्यांचा लव्हपॅक र्चिाज होतो अधनमधनं पण संपतोही लवकर!
त्यामुळे भांडण झालं, त्याचा किंवा तिचा फोन नाही झाला तर एखादा व्यसनी माणूस तडफडतो तसे ही मुलं तडफडतात. रडतात. हताश बसतात. डिप्रेस्ट होतात. अत्यंत गयावया करत त्या माणसानं आपल्याशी बोलावं म्हणून अक्षरश: लोटांगण घालतात.
आणि फोन झालाच तर पुन्हा भांडतात.
हा इतका टोकाचा भावनिक स्फोट, टोकाच्याच भावना आणि त्याचे आक्रस्ताळे एक्सप्रेशन त्यांना आतून पोखरताना दिसते. वरवर हसरी दिसत असली ही मुलं तरी आतून प्रचंड एकेकटी, प्रचंड असुरक्षित आणि भयग्रस्त दिसतात.
हे प्रेम म्हणावं की नुस्ताच आपल्याशी कुणाला तरी बांधून घेण्याचा अट्टहास हेच कळू नये, इतकं ते गुंतागुंतीचं आहे.