शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अंजलीबाई आणि मायराचा पैठणी ड्रेस, ही काय नवीन स्टाईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:18 IST

राणादाच्या अंजलीबाई आणि सरंजामेंच्या ऑफिसातल्या मायराताई एकदम पैठणीच्या साडीचे ड्रेस घालून पुरस्कार सोहळ्याला जातात त्या का?

ठळक मुद्देएकदम अस्सल  पैठणीचा ड्रेस शिवून घालणं हा बदल वेगळा पण फ्रेश.  

श्रुती साठे 

आता तुम्ही म्हणाल, फॅशनच्या दुनियेत कधी काय ट्रेंड मध्ये येईल याचा काही नेम नाही! कित्येक र्वष आपण आपल्या आजीची, आईची एखादी छानशी साडी घेऊन त्याचा ड्रेस शिवत आलोय! हे ड्रेस सहसा  रोजच्या वापरासाठी म्हणून ठेवत आलोय आपण. अगदीच भरजरी, गर्भरेशमी साडीचा लेहेंगा आणि कॉन्ट्रास्ट चोली किंवा अनारकली कुर्ता हा घरगुती कार्यक्रमांना  वापरण्याची आपली हौस बरीच वर्ष पूर्ण होतेय. पण आता सेलिब्रिटी म्हणवणार्‍या कलाकारांनी नावाजलेल्या अवॉर्ड शोमध्ये हे साडीचे ड्रेस करून घालावेत म्हणजे  नवलच नाही का? आपल्याला त्यांना नेहमीच ब्रँडेड, महागडय़ा कपडय़ात बघायची सवय असते, असं असताना त्यांनी एकदम अस्सल  पैठणीचा ड्रेस शिवून घालणं हा बदल वेगळा पण फ्रेश वाटला.   

अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्यात अभिज्ञा भावेचा पैठणी साडीतून तयार केलेला ड्रेस अनोखा होता. जरीकाठाच्या बाह्या असलेला पेपलम टॉप त्यावरील पानाच्या आकाराचा पुढे कट आणि त्यावर पैठणीचा पदर वापरून केलेलं पॅचवर्क यामुळे हा ड्रेस सुंदर दिसला. विशेष म्हणजे या टॉपसह टिपिकल लेहेंगा, पलाझो न वापरता अभिज्ञाने केलेला धोती स्टाइल सलवारचा वापर सुरेख दिसला. त्यावर वापरलेली अँटिक गोल्ड ज्वेलरी या साडी ड्रेसला शोभून दिसली. जे तिनं केलं तेच राणादाच्या अंजलीबाईंनीही केलं. अक्षया देवधरचा साडी ड्रेस लूकसुद्धा सुटसुटीत पण मोहक होता. ड्रेसला असलेल्या लांब जरीच्या बाह्या, मागे दिलेला डीप कट व त्यावर केलेली एम्ब्रॉयडरी,  पुढच्या लेअरला असलेला मोठा पैठणीचा काठ असा साडीचा केलेला वापर खूप नावीन्यपूर्ण वाटला. अक्षयाने त्याबरोबर अगदी योग्य अशी ज्वेलरी वापरून लूक पूर्ण केला. या साडी ड्रेसच्या नवीन ट्रेंडमधून काय पाहायला मिळतं? वर्षानुवर्षे चालत आलेले त्याच त्याच पॅटर्नचे साडीचे सलवार कमीज, कुर्ता न शिवता अभिज्ञा किंवा अक्षयासारखं अनोखं फ्युजन डिझाइन करून पहा. ट्रेण्ड तो है!