शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ना मागची, ना पुढची; कोणतीच पिढी गंडलेली नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 06:35 IST

‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020- विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध. 

ठळक मुद्देका? कोण? काय? कधी? - लाइफच्या ‘ट्वेंटी ट्वेंटी’ची गोष्ट

 प्रगती जवळकर

1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?

शेवटच्या वर्षाला माझी कॅम्पस प्लेसमेंट एल अ‍ॅण्ड टी कंपनीत झाली, ही माझ्या आयुष्यातली ताजी भारी गोष्ट. माझ्या आई-वडिलांनी मला शिकण्यासाठी स्वातंत्र्य दिलं, त्यामुळे मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करते आहे. उत्तम शिक्षण घेऊन कोणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी होत आहे, ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?

सामान्य मुलीला असतात ते सगळे स्ट्रेस मला आहेत. रोज कॉलेजसाठी बसचा दोन तास प्रवास करताना काही वेळेस बस उशिरा येण्यापासून ते बसायला जागा न मिळणे, कधी मित्र- मैत्रिणींशी अगदी क्षुल्लक कारणावरून भांडण होणे, घरच्यांना पुरेसा वेळ न देऊ शकणे. यादी खूप मोठी आहे. देशात जे चाललंय त्याचाही मला स्ट्रेस येतो. काय करू?  

3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?

मला मोजकेच मित्र-मैत्रिणी आहेत; पण जे काही 2-4 आहेत, त्यांच्याशी अगदी छान मैत्री आहे. तशी मी मितभाषी असल्याने लगेच अनोळखी लोकांत मिसळता येत नाही. काही वेळेस खूप गर्दीत असूनही एकटेपणाची जाणीव होतेच.

4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची? कोणीही गंडलेलं नाही. दोन्ही पिढय़ा आपापल्या जागी अगदी योग्य आहेत. बदल ही काळाची गरज आहे, काळानुसार पिढय़ांमध्ये बदल होणारच. आपण तो योग्य प्रकारे स्वीकारला पाहिजे.

5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस? 

तुम्हाला चांगलं माणूस बनवतं, चांगलं घडवतं तेच खरं प्रेम. आमच्या पिढीने प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजून घेतला तर बरं होईल. आणि आई-वडिलांनीही जरा समजून घेतलं, तर आमच्या पिढीचं कॉम्प्लिकेटेड लव्ह-लाईफ जरा सोपं होईल.

6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय?आपल्याला मोठा मुलगा का नाही याची खंत माझ्या आई-वडिलांना कधीच असू नये, हे माझं स्वप्न आहे. कुटुंबातील एक मोठी मुलगी म्हणून मला संपूर्ण जबाबदारी योग्य रीतीने पार पाडायची आहे.