शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

 चांगली सरकारी नोकरी मिळवणे. बस्स! माझं ठरलंय! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 06:35 IST

‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020- विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध. 

ठळक मुद्देका? कोण? काय? कधी? - लाइफच्या ‘ट्वेंटी ट्वेंटी’ची गोष्ट

- रोहित सूर्यवंशी

1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?

 माझा आतार्पयत इंजिनिअरिंगमध्ये कोणताही विषय मागे राहिलेला नाही, ही सगळ्यात भारी गोष्ट आहे आयुष्यातली! इंजिनिअरिंग करणे हे माझे लहानपणापासून पाहिलेले स्वप्न होते. ते आता लवकरच पूर्ण होईल.

2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?

 डिग्री पूर्ण झाल्यानंतरच्या गेट एक्झाम क्वॉलिफाय करणे हा सगळ्यात मोठ्ठा स्ट्रेस! आता मोठा झालो आहे. त्याबरोबर येतात त्या जबाबदार्‍या पूर्ण करू शकेन ना, याचीही कधीकधी भीती वाटते.

3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?

मला खरंच खूप मित्र-मैत्रिणी आहेत, मी अजिबात एकटा-बिकटा नाही.

4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची? आमचीच जनरेशन गंडलेली आहे. आम्हालाच आमच्या आईबाबांशी कनेक्ट करता येत नाही. आम्ही प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा मोबाइल किंवा सोशल मीडियातूनच बोलतो हल्ली. त्यामुळे घरी आईबाबांशी बोलायला, त्यांच्याशी जुळवून घ्यायला आम्हाला खूप अवघड जातंय. फेस टू फेस बोलण्याचं स्किल आम्ही विसरतच चाललो आहोत, त्यामुळेच जॉब इंटरह्यूमध्ये आमच्या दांडय़ा जातात. मोबाइलमुळे आमची जनरेशन पूर्णपणे वाया गेलेली आहे.

5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस? लव्ह-लाईफसाठी इथे वेळ कुणाला आहे?

6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय? डिग्री पूर्ण झाल्यावर गेटची तय्यारी करायची आहे, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचीही तयारी आणि चांगली सरकारी नोकरी मिळवणे. बस्स! माझं ठरलंय!