शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

मुलींना किती ताण असतात कुणाला कळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 06:20 IST

‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020- विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध.

ठळक मुद्देका? कोण? काय? कधी? - लाइफच्या ‘ट्वेंटी ट्वेंटी’ची गोष्ट

-श्वेता चंदनकर 

1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?मला लिहायला आवडतं. काहीच दिवसांपूर्वी समजलं, की माझी कविता 93 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी निवडली गेली आहे. फार भारी वाटलं.  ‘कविताबिविता करून उगाच टाइमपास करतेस’ असं म्हणणार्‍या लोकांची तोंडं बंद झाली, हेही भारीच झालं! मस्त वाटतंय. 

2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?

सर्वात जास्त स्ट्रेस नोकरीचा आहे. कधी एकदाची नोकरी लागते आणि विषय संपतो अस झालंय. मनपण सारखं भरकटत असतं. आपण ते केलं असतं बरं झालं असतं असं वाटतं. त्यासाठी चाललेली धावपळ, अभ्यास, मेहनत कधी सफल होईल, हे कळत नाही. अभ्यासावर असलेला फोकस हलतो, काय होईल या ताणाने डोकं फुटायची वेळ येते.    ‘कॉलेज संपलयं आता पुढे काय?’- या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळत नाही. त्यात सुंदर दिसण्याचा, वजन आटोक्यात ठेवण्याचा ताण असतोच मुलींसाठी! अमकीला नोकरी लागली, तमकीचं लग्न ठरलं यावरून टोमणे खावे लागतात. यातच परत भर म्हणून घरची कामं आली पाहिजेत, स्वयंपाक उत्तम जमला पाहिजे याचा ताण!  ‘तू जरा क्रीमबिम लावत जा गं, मुलांना गोर्‍यापान मुलीच आवडतात’ असल्या सल्ल्यांनी इतकं लो फील होतं. न्यूनंगड निर्माण व्हायला लागतो.मुलींच्या आयुष्यात किती प्रकारचे ताण असतात, हे अन्य कुणाला कळणं फार कठीण आहे.

3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?मला मोजक्याच मैत्रिणी आहेत, आणि आम्ही सगळ्या फार घट्ट आहोत. आता बाकीच्या मार्गाला लागल्या, त्यामुळे भेटी फार होत नाहीत; पण आमची मैत्री आयुष्यभर राहील.

4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची? आमचीच जनरेशन गंडलेली आहे, आम्हालाच आमच्या आई-वडिलांशी कनेक्ट करता येत नाही.

5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस? 

माझ्या मते, अत्यंत कॉम्पिलीकेटेड लव्ह-लाइफ हा एक मोठा स्ट्रेस होऊन बसला आहे. कारण करिअर घडवायच्या वयात आम्ही नको त्यावेळी भलत्याच गोष्टीला प्रायोरिटी देतो; त्यामुळे जमलेलं गणित बिघडतं आणि कोडी निर्माण होतात.आपल्या आयुष्याचा लव्ह हा एक भाग आहे हे आपल्याला माहिती असून, आपण अख्ख्या आयुष्यालाच लव्हचा भाग बनविण्यात व्यस्त असतो, इथेच चुकतो आपण.

6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय?आधी नोकरी करायचं ठरवलयं त्यानंतर लग्न.लग्नानंतर वर्किग वुमन म्हणून जगायचयं. पण लग्नाआधी किंवा नंतर स्वतर्‍चं एकतरी पुस्तक प्रकाशित करायचंच, हे माझं ठरलंय.