रावणाला दहा डोकी होती, तुम्हाला आहेत का?. तरी किती एक्सक्युजेस सांगता??
बुंगाट बाईक चालवताना वारं अंगावर चढलं पाहिजे, कान-नाक-तोंडात घुसलं पाहिजे,
तर झुम झुम झुम एक्सलेटर पिळण्यात मज्जा !
हेल्मेट घालून कानात वारंच घुसलं नाही तर फील तरी येईल का काही बायकिंगचा? थ्रिल पाहिजे,
तर डोकं मोकळंच ठेवायचं.
केस फार गळतात हेल्मेट घातलं की, डोक्याला मधोमध टक्कल पडतं ! एकदम चिवड्यात लाडूच.!
तरुणपणी कोण टक्कल पाडून घेईल?
प्लीज, किती पुरुषी दिसतं ते बोजड हेल्मेट !मुली आणि हेल्मेट? शक्यच नाही !
एकदम बोगस !!
आपण इथं शहरात चालवतो गाडी, एकदम स्लो, एकदम सेफ. त्यात सतत ट्राफिक जाम.
हवं कशाला हेल्मेट?
मुळात हेल्मेटचं लोढणं डोक्यावर आणि खर्च बोकांडी घ्यायचाच कशाला?नस्ती फॅडं काढतात.
काही गरज नाही त्याची!
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com