शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

ऑनलाइन सोशल

By admin | Updated: December 11, 2015 14:04 IST

कुणी आज काय जेवलं इथपासून ते कुणाच्या घरचा कुत्र आजारी आहे इथर्पयत आणि कुणाकुणाच्या वाढदिवसापासून लग्नाच्या वाढदिवसाला केलेल्या खरेदीर्पयत सारं कळतंच की ऑनलाइन मग अजून वेगळा काय संपर्क ठेवायचा, असं तरुण मुलं का म्हणतात?

- घराबाहेर न पडताही ‘संपर्कात’ राहणारी एक नवीन जीवनशैली!
‘काय सारखं फोनवर टुकटुक,
शेजारी बसलेला माणूस जिवंतय की मेलाय, हे तरी बघा जरा!’
‘सगळं ऑनलाइन करा, ऑनलाइन जेवायला मिळतंय का फुकटात बघा जरा.’ 
- असं उपरोधानं तरुण मुलांना येताजाता ऐकावं लागतं. पण तरुण मुलं काही हे सहजी मान्य करत नाहीत. 
उलट त्यांना असं वाटतं की, प्रत्यक्षात थेट संवाद नसला तरी काय झालं, आपल्या अवतीभोवतीच्या माणसांचं काय चाललंय हे तर आपल्याला ऑनलाइनही कळतं. कुणी काय जेवलं इथपासून ते कुणाच्या घरचा पाळीव कुत्र आजारी आहे इथर्पयत आणि कुणाकुणाच्या वाढदिवसापासून लगAाच्या वाढदिवसाला केलेल्या  खरेदीर्पयत सारं कळतंच की ऑनलाइन मग अजून संपर्क असा वेगळा काय वाटतो?
तिथल्या तिथे ऑनलाइनच कुणाला वाढदिवसाला विश केलं काय नी कुणाला श्रद्धांजली वाहिली काय, आपला ना वेळ खर्च होतो, ना फार इमोशनल गुंता होतो, असं अनेकांचं मत आहे.
आता एका सव्रेक्षणानं त्यांच्या या मतावर शिक्कामोर्तब केलं आहे.  
या सव्रेक्षणाचं म्हणणं आहे की, वयाच्या पस्तिशीच्या आत असलेल्या अनेक तरुण मुलामुलींना आता प्रत्यक्ष सोशलायङिांगपेक्षा ‘ऑनलाइन सोशलायङिांगच’ जास्त कम्फर्टेबल अर्थात सोयीचं वाटतं.
म्हणजे काय तर मित्रमैत्रिणींनाही अनेकदा प्रत्यक्षात भेटण्यापेक्षा आणि कुठल्यातरी कट्टय़ावर पडीक राहण्यापेक्षा अनेकांना आपापल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरच भेटणं आणि तिथंच सामूहिक कल्ला करणं हे जास्त आनंददायी वाटतं!
अनेकजण तर असंही मत नोंदवतात की, आपण मित्रला प्रत्यक्ष भेटल्यावर फार कमी बोलणं होतं आता, ब:याच दिवसांनी भेटल्यावर तर काय बोलायचं हेच सुचत नाही इतकं आम्ही रोज आणि सतत बोलतच असतो.
आणि तेही आता शब्दानं, प्रत्यक्षात बोलावं लागत नाही. अनेक मुलामुलींचं तर प्रत्यक्ष फोनवर बोलण्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे. त्याऐवजी ते सतत लिहून बोलतात. सतत कीपॅडवर टुकटुक.
मात्र त्यातून एक गोष्ट घडली आहेच.
जी माणसं ऑनलाइन भेटत नाहीत, त्यांच्याशी बोलणंच बंद होण्याच्या टप्प्यात आहे. म्हणजे काय तर मुंबई, बंगळुरू, दिल्ली, लखनौ या शहरांतल्या सव्र्हेत सहभागी झालेल्या बहुतांश तरुण मुलांनी मान्य केलंय की, आपल्या शेजारी कोण राहतं, त्यांचं नाव, त्यांच्या घरातली सुखदु:ख हे आपल्याला काहीही माहिती नसतं. येताजाता चेहरे ओळखीचे झाले तर हसतोबिसतो त्यांच्याकडे पाहून. पण तेवढंच. त्यापेक्षा जास्त ओळख आसपास नाही.
या सा:यामुळे आपणच आपल्या समाजापासून, प्रत्यक्ष संवादापासून तुटतोय का? असं विचारल्यावर मात्र संमिश्र मतं येतात. काहींना वाटतं असं काही नाही. ज्यांच्याशी संपर्कात राहायचं त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत. तो वाढवतोही. मग बाकीचं सारंच माहिती पाहिजे असा आग्रह कशाला?
काहींना मात्र वाटतं की, वरवरच्या या टेक्निकल संवादामुळे अनेकदा नातं कोरडं होत जातं. पण तो आता या नव्या काळाचा भाग आहे.
अशी मतमतांतरे असताना एक गोष्ट या सव्रेक्षणात जाणवली की, ऑनलाइन सोशलाइज झाल्यानं कुणी आपल्या रंगावर, व्यंगावर, बोलण्यावर, भाषेवर टिप्पणी करत नाही असंही अनेकांना वाटतं. त्यामुळे ते त्यांना सुखावतं!
एक नक्की, ‘सोशल’ असण्याच्या या काळात ‘ऑनलाइन सोशल’ ही एक नवीनच जमात तयार होत आहे.
ज्यांचे नियम प्रत्यक्ष जगापेक्षा वेगळे आहेत आणि जगण्याच्या अपेक्षाही ते बदलून घेत आहेत.
 
 
65}
तरुण-तरुणी म्हणतात,
ऑनलाइन सोशल
असणंच जास्त
सोयीचं.
 
7क्}
तरुण-तरुणींना वाटतं की, 
मित्रमैत्रिणी, नातेवाईक 
यांच्याबद्दल सगळंच 
त्यांना ऑनलाइन कळतं!
- निशांत महाजन