शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

लातूर ते मुंबई स्थलांतरानं काय शिकवलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 06:00 IST

आश्रमशाळेत शिकलो गावं बदलत राहिली पण वडिलांचं एक वाक्य सोबत होतं, स्पर्धेत भाग घेत राहा!

 - अमोल पाटील

शाळा सुटल्याची घंटा वाजली तशी आम्ही सारी मुलं घरी जाण्यासाठी वर्गाबाहेर पडलो. घर जसजसं जवळ येत होतं तसतशी मनात धडधड होती. कारण त्या दिवशी शाळेत दुपारच्या सत्रात वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या होत्या. त्या स्पर्धेत मीही सहभाग घेतला होता. इयत्ता पाचवीच्या वर्गात असताना मी पहिल्यांदा असं स्पर्धेत भाग घेऊन भाषण केलं. भाषण ऐन भरात असतानाच पाठ केलेली वाक्यं नीटशी आठवली नाहीत आणि मी अडखळलो. नंबर आला नाही. स्पर्धेत भाग घेतला हे वडिलांना माहिती होते. घरी येताच त्यांनी विचारलंच, काय झालं. मी घाबरलो होतो. गप्प होतो. ते म्हणाले, ‘स्पर्धेत सहभाग घेत राहा!’ त्यानंतर गावच्या शाळेत दहावीर्पयत मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत राहिलो. आणि मला बक्षीस मिळालं नाही असं कधी झालं नाही. एकदा तर माझं भाषण आवडल्यामुळे भाषण संपताच शाळेच्या संस्थाचालकांनी माझा पुष्पहार घालून सत्कार केला. वक्तृत्वावरील माझ्या प्रभुत्वामुळे मी शाळेतील सर्व शिक्षकांचा लाडका झालो. लातूर जिल्ह्यातील जनापूर या माझ्या छोटय़ाशा गावातील निसर्गरम्य वातावरणातली चंगळामाता आश्रमशाळा. दहावीला 78 टक्के गुण मिळवून मी केंद्रातून पहिला आलो.पण मी नववीत असतानाच वडिलांचं निधन झालं. आमच्यावर खूप मोठं संकट कोसळले. घर  आर्थिक संकटात होतंच पण वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी आईवर येऊन पडली. माझी आई म्हणजे सकारात्मकतेचा अखंड झरा. अगदी शेवटच्या क्षणार्पयत लढत राहणं हे मी तिच्यापासूनच शिकलो. दहावीनंतर मी उदगीरच्या आयटीआयला प्रवेश घेतला. तिथं माझं मन रमलं नाही. सहा महिन्यातच मी आयटीआय सोडलं. नंतरचे सहा महिने गावात नुसता फिरत राहिलो. केंद्रात पहिला आलेला मुलगा म्हणून नुकतंच तोंडभरून कौतुक केलेल्या गावकर्‍यांना माझ्या या रिकामं फिरण्याचं मोठं कोडं पडलं.अखेर लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात माझ्या मावसभावानं कला शाखेत माझा प्रवेश निश्चित केला. भावजींच्या मार्गदर्शनाने शेतकर्‍यांच्या मुलांसाठी असलेल्या वसतिगृहात प्रवेश मिळाला. मी बारावीमध्ये 89 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालो. उदगीरच्या शासकीय आध्यापक विद्यालयात मला प्रवेश मिळाला. तिथं माझ्या वक्तृत्व कलेला वाव मिळत गेला. दिवस दर दिवस मी नव्या गोष्टी शिकत गेलो. डी.एड. पूर्ण झाल्यानंतर मी लातूरच्या एका खासगी वसतिगृहात निवासी शिक्षक म्हणून काम करू लागलो. तिथं माझ्या राहण्याची आणि निवासाची सोय झाली. पुस्तके घेणं आणि कुठं जागा निघाल्या की फॉर्म भरण्यास लागणार्‍या खर्चासाठी त्यांच्याकडून मिळणार्‍या दरमहा दीड हजार रु पयाची खूप मदत व्हायला लागली. डी.एड. होईर्पयत अतिशय कष्ट करून माझ्यासाठी आई पैसे पाठवत होती. दरम्यान, मुंबई महापालिकेत शिक्षकभरतीची जाहिरात पेपरमध्ये वाचली. फॉर्म भरण्यासाठी थेट मुंबई गाठली. तिथं महापालिकेच्या शाळेत मी 2011 मध्ये शिक्षक म्हणून रु जू झालो. दरम्यान मुक्तविद्यापीठातून मी एम.ए मराठीचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपणी गावच्या शाळेतील लहान मुलांमुलींना भाषणं लिहून देणारा मी आता लेख, कविता लिहू लागलो, साहित्य संमेलनामध्ये सहभागी होऊ लागलो.  आता मी मालाडवरून विरारला राहायला आलो. दरम्यान पेपरमधील जाहिरात वाचून माझ्या मित्रांनी माझे साहित्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेसाठी पाठविण्याचं सुचवलं. त्यामुळे माझ्या ‘इंद्रधनुष्य’ या पहिला कवितासंग्रह अनुदानप्राप्त ठरला. 2014 साली तो प्रकाशित झाला. आता मी लिहितो, ब्लॉगही लिहितो.  गावाकडचं मातीतल जगणं, शेतकर्‍यांच्या पीडा मांडतो.  वेळोवेळी स्थलांतर झालं त्यानं माझ्या अनुभव कक्षा विस्तारत गेल्या, जगण्याला बळ मिळत गेलं हे नक्की!