शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

वन वे तिकीट - छोटीसी बात

By admin | Updated: January 26, 2017 02:18 IST

अगदी बरोबर ठरवून आजचा मुहूर्त साधलाय सगळ्यांनी. स्वयंपाकवाल्या काकूंना आजच सुटी हवी होती.

  - प्रसाद सांडभोर 

बकाबकाअगदी बरोबर ठरवून आजचा मुहूर्त साधलाय सगळ्यांनी. स्वयंपाकवाल्या काकूंना आजच सुटी हवी होती. रूममेट महाशयांना आजच घरी निघून जायचं होतं आणि बाकी मित्रमंडळींना पण आजच बिझी असायचं होतं... 
 
भुकेच्या नादात अजिबात विचार केला नाही. तडक हे रेस्टॉरण्ट गाठलं. थांबायला हवं होतं जरा. घरीच आॅर्डर करता आलं असतं जेवण. असं एकटं बसून नसतं खावं लागलं. घरी बनवता पण आलं असतं की काहीबाही. आरामात. घरच्या कपड्यांत. ऐसपैस बसून पुस्तक वाचत नाहीतर लॅपटॉपवर पिक्चर बघत खाता आलं असतं नेहमीसारखं. श्या! ही भूक ना अजिबात सारासार विचार करू देत नाही मेली! असो. पटपट खाणं संपवूया.
 
इथे चारजणांच्या टेबलावर एकट्याला बसायला कसलं आॅड वाटतंय. समोर टीव्ही आहे तसा टाइमपास म्हणून. पण कसलं बोअर गाण्यांचं चॅनेल लावून ठेवलंय. खाणं संपेपर्यंत फोनमधले जुने फोटो पहावेत का? श्या! नको. फोन काढायच्या भानगडीत हे दही दाढीला लागलं वाटतं. कुठे बरं आहे नक्की. दिसणार कसं? पण इथे ओळखतंय कोण आपल्याला.हसलं कुणी तरी काय जातंय! हा! हा!!
 
त्या कोपऱ्यात बसलेल्या तीन मुली इकडे का बघताहेत? त्यांना दिसतंय का दही? की त्या विचार करताहेत, एवढ्या बकाबका का खातोय हा मुलगा? खरंच, कशाला म्हणून घाई? छान, चविष्ट, आवडीचं आहे सगळं मग आपली मजा करण्यात काय हरकत आहे? दरवेळी का हवेत मित्र? घरचे? ओळखीचे लोक? एकट्यानं सुद्धा मजा करता आली पाहिजे. ठीकंय, जेवण संपलंच आहे आॅलमोस्ट. निघूया इथून. पण घरी जाण्याआधी टपरी से एक चॉकलेट आईस्क्र ीम तो बनती है आज.सिर्फ खुद के वास्ते :) xprsway@gmail.com