शहरं
Join us  
Trending Stories
1
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
2
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
3
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
4
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
5
सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
6
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
7
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
8
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
9
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
10
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
11
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
12
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
13
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
14
बॉलिवूडवर शोककळा! पंकज धीर यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचं निधन, ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
16
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
17
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
18
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
19
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी

ढब्बू ते नेमके असतात कोण? कसे जगतात कॉलेजात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 15:22 IST

कॉलेजात ढिगाने साइडलिंगला लागलेल्या अनेक तरुणांची कथाव्यथा

ठळक मुद्देकाही जण असेही असतात की ते प्रेम व्यक्तच करत नाहीत़ मन मरगळून जातं; पण ते बोलत काहीच नाहीत़

- साहेबराव नरसाळे

बस स्टॅण्डवर मित्रासोबत तो उभा़ तेवढय़ात एसटीच्या खिडकीत एका हातावर तो एक घडय़ाळ पाहतो़ एकदम किंचाळतो- अरे यार ती चालली़तेवढय़ात एसटीही निघत़े मित्रांना काही समजण्याच्या आत तो गाडीवर बसतो़- चावी देदुसरा - ‘पेट्रोल नाही़’-पैसेपण द़े बरं़़ तू बस गाडीवऱ बस लवकऱ़ भावडय़ा़़़ बस़़ बस़़ बस!मित्राला गाडीवर टाकतो आणि सुसाट सुटतो़ तोर्पयत मित्राला काही कळलेलं नसतं़ गाडीवर मित्र त्याला विचारतो - अरे काय झालंय? - ती त्या एसटीत होती़-तू कधी पाहिली़ मला तर नाही दिसली़ त्या खिडकीतला हात पाहिला का, त्यावर घडय़ाळ होतं़ ती तीच होती़मित्र कपाळावर हात मारून घेतो़ दुसरी असेल़ ती नसेल़नाही़ तीच होती़हळू चालव़़ हळू चालव़़़ - मित्राची आजर्व़तरी तो ऐकत नाही़ खड्डे पाहत नाही, स्पीड ब्रेकर पाहत नाही़ दणादण गाडी आदळत-आपटत तो एसटीचा पाठलाग करीत राहतो़ 10, 20, 30 असे करीत करीत तो तब्बल 65 किलोमीटर गाडी पळवतो़ नगरहून निघालेला तो शिरूरजवळ पोहोचतो़ एसटीच्या डाव्या बाजूनं आपली मोटारसायकल टाकीत तिच्या खिडकीजवळ नेऊन जोरजोरात हॉर्न वाजतो़ ती पाहत़े गर्रकन नजर वळवत़े मनात गुदगुदल्या झालेल्या असतात़ त्याला एक स्माइल द्यायची असत़े; पण तोर्पयत तो पुन्हा मागे पडतो़ एसटी पुढे निघत़े तो पुन्हा त्याच बाजूने येतो़ हॉर्न वाजवतो़ ती पाहत़े किंचित हसत़ेखल्लास!सार्थक झालं़ काय असतं प्रेम? हेच तर असतं़ तिच्या एका स्माइलसाठी जीव धोक्यात घालायचा़ तिला जे आवडेल ते करायचं़ काहीही करा़; पण तिला वाटलं पाहिजे- तो आपली ‘केअर’ करतोय़ एस्स़़ तिचा ‘केअर टेकर’ व्हायचं़ तिला इम्प्रेस करण्यासाठी वाट्टेल ते करायचं़ तिला आवडतील तसेच कपडे घालायच़े आपल्याकडं नसतील तर मित्रांकडून घ्यायच़े मित्रांचेच पैसे वापरायच़े कधीकधी आईवडिलांकडून भांडून पैसे घ्यायच़े तिला हॉटेलात न्यायच़े ‘हे खा, ते खा’ असा आग्रह करायचा़ तिच्यावरून कॉलेजात भांडणं, हाणामार्‍या करायच्या़ कोणतीही जोखीम पत्करायला तयार व्हायच़े अशी कोणतीही गोष्ट करायची की, ज्यातून तिला खात्री पटेल- हा आपलाच आह़े आपल्यावर जीव ओवाळून टाकायलाही कमी करणार नाही़ हे सगळं झालं की मग हळूच प्रपोज करायचं़मुली पटविण्याची ही ‘थेअरी’ तशी आताशा अनेकांना तोंडपाठ झाली आहे. कधीतरी आपण या थेअरीतला हिरो झालेलो असतो़ पण नुकतीच मिसरुड फुटलेल्या तरुणांसाठी ते ‘थ्रील’ असतं़ तिच्यासाठी रात्रीरात्री जागणं, दिवसदिवस तिच्यामागं फिरणं आणि तिनं स्माईल दिली की आकाश ठेंगणं झाल्याचं सुख मिळणं, याच्यापुढं जगातली सारी सुखं फिक्की पडतात़ किती जादू असते या प्रेमात़ ही जादूची कांडी काहींचं आयुष्य बनवते, तर काहींचं बिघडवत़े काहींचं प्रेम जुळतं तर काहींच जळतं़ ज्यांचं प्रेम जुळतं, त्यांना एकमेकांशिवाय क्षणही सरत नाही़; पण कधीकधी बात ब्रेकअपवर येत़े  हाणामार्‍या़ केसेस आणि तुरुंगवारीर्पयत पोहोचत़े काही दिवसात बहरलेल्या प्रेमाच्या झाडाचा निव्वळ खराटा उरलेला असतो़ असे खराटा झालेले आपल्यात डझनाने सापडतात़  प्रेमात ‘ब्रेकअप के बाद’ हा एक सीन असतोच असतो़ उदास़ मळलेला़ सगळं संपलेलं आहे, असं समजून खिन्न झालेला तो़ केवळ तिच्या व्हॉट्सअ‍ॅपचं लास्ट सीन चेक करण्यातचं गढून जातो़ अभ्यासावरचं लक्ष उडतं़ कोण काय सांगतं, कोण काय बोलतं, कोण काय करतंय, असे कोणाकडेच लक्ष नसतं़ आपल्याच तंद्रीत तो राहतो़ डिस्टिंक्शन मिळविणारा तो रडतकढत पास होतो़ पुढचं सारं बदलून जातं़ तिच्यामुळं असं झालं एव्हढंच सांगण्यासारखं त्याच्याकडं उरलेलं असतं़ ती नसती आली आयुष्यात तर मी अमुकअमुक झालो असतो़ करिअर घडलं असतं़; पण तिनं सारं बिघडवलं, अशा करुण कहाणीचा तो भाग झालेला असतो़ ही झाली जुळून मोडलेल्या प्रेमाची गोष्ट़ सोशल मीडिया येण्यापूर्वी प्रेमपत्र होतं़ सांगोवांगी निरोप होत़े त्याची जागा मोबाईल आल्यानंतर मेसेजनं घेतली आणि आता अ‍ॅण्ड्रॉईड फोननं प्रपोज मारणं एकदम सोप्प करून टाकलं़ आता बोलायचीही गरज उरली नाही़ तिला एक लव्ह इमोटिकॉन पाठवायचं की ती समजून जात़े एव्हढं सोप्प झालंय़ मात्र काही जण असेही असतात की ते प्रेम व्यक्तच करीत नाहीत़ फक्त तिच्या एका स्माइलसाठी तिच्या घराच्या आसपास तासन्तास रेंगाळतात़ तिच्या बसचा पाठलाग करतात़ तिच्याविषयी कोणी काही बोललं याचं मन मरगळून जातं़; पण ते बोलत काहीच नाहीत़ ते व्यक्तच होत नाहीत़ असे ढब्बू नग कॉलेजात ढिगाने साइडलिंगला लागलेले दिसतात़ पण त्यांचं एक बरं असतं की त्यांच्यावर झालेले नसतात ‘प्रेमाचे कोणतेच साईड इफेक्ट’़तसं ‘प्रेमाचे साइड इफेक्ट’ कळण्याचं ते वयंही नसतं़ ती तुझी नाहीये, असं एखाद्या ‘वेडय़ा मजनू’ला कितीही समजून सांगितलं तरी त्याला ते कळत नाही़ त्याचं एकतर्फी प्रेम करणं सुरूच असतं़ तिलाही ते मान्य नसतं़ ती दुसर्‍यांमार्फत त्याला समजावत़े कधीकधी स्वतर्‍ही सांगते- ‘सोडून दे नाद़’ पण हा नादखुळा झालेला असतो़ तिच्यासाठी खुळा झालेला तो स्वतर्‍च्याच आयुष्याचा खुळाखुळा करून घेतो़ तिचा हिरो व्हायला निघालेला तो तिच्यासाठी व्हिलन ठरतो़ त्याचं प्रेम खरं असेलही. पण अशा अनेक कहाण्या आहेत, ज्यात प्रेमाला जातीय, धार्मिक रंग चिकटवला जातो़ क्षणार्धात हिरोचा व्हिलन होतो आणि ‘व्हिलन’चा अंत झालाच पाहिजे, या विचाराच्या टोळीधाडी त्याच्यावर तुटून पडतात़ तो तुटतो़ मोडतो अन् त्याचा आयुष्याशीच ब्रेकअप होतो कायमचाच! (साहेबराव लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आह़े)