‘एम्प्लॉयमेण्ट एक्सचेंज’ म्हणजे नोकरी मिळण्याची संधी देणारं जुनंच माध्यम
तेच आता थेट ऑनलाइन जात ‘तरुण’ झालंय !
‘एम्प्लॉयमेण्ट एक्सचेंज’
हे दोन शब्द उच्चरले की, तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? मुळात तुम्ही कधी पाहिलंय का ते ऑफिस? आणि ज्यांनी पाहिलेलं नसेल, त्यांनी आईबाबांकडून एम्प्लॉयमेण्ट कार्ड मिळवण्याचे एकेकाळचे किस्से तरी नक्की ऐकलेले असतील !
आजही अनेकजण एम्प्लॉयमेण्ट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवतात. पण आता गेले ते पूर्वीचे दिवस, जेव्हा ही नावनोंदणी म्हणजे सुळावरची पोळी होती.
कोंदट-कळकट आणि कुबट सरकारी कार्यालयात तासंतास लायनी लावा, मग ते कागदपत्र दाखवा, वस्कन कुणी आपल्या अंगावर ओरडलं तर ऐकून घ्या आणि आपण अगदीच ‘गरजू’ आहोत, असे चेहरे करून तासंतास त्या कार्यालयातल्या ‘तरुण’ गर्दीत मख्खं चेह:यानं बसून रहा..
आज जा तुम्ही त्या कार्यालयात, असे चित्रच दिसणार नाही..
मुळात आता कार्यालयात जायची गरजच उरलेली नाही. कारण घरबसल्या तुम्ही ऑनलाइन नावनोंदणी सहज करु शकता. जे काम अनंत कटकटींचं होतं, ते एकदम सोपं, ऑनलाइन सुटसुटीत आणि विनामनस्ताप होऊ लागलं.
पण या ऑनलाइन नोंदणीचं अप्रूप कमी वाटावं इतक्या नवीन गोष्टी येत्या काही काळात एम्पलॉयमेण्ट एक्सचेंजच्या कार्यालयात घडणार आहेत.!
आणि तशी घोषणा 9 जून 2क्14 रोजी खुद्द महामहीम राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना केली आहे. सरकार आता ‘एम्प्लॉयमेण्ट एक्सचेंज’ कार्यालयाचं रूपांतर थेट ‘करिअर सेंटर्स’ आणि ‘मॉडेल करिअर सेंटर्स’मध्ये करणार आहे.
म्हणजे काय तर कुठल्या कंपनीत, कुठल्या खात्यात तुमच्या लायक नोक:या आहेत, हे कळवण्याचं टपाली काम न करता आता सरकारी कार्यालय एक पाऊल पुढे टाकणार आहेत.
‘आपल्या देशातल्या तरुणांना तंत्रज्ञानाचा वापर करुन योग्य माहिती, योग्य वेळी आणि पारदर्शी कारभारातून मिळावी आणि त्यातून त्यांना उत्तम करिअर मार्गदर्शनही व्हावं हा या सेंटरचा मुख्य हेतूने असेल’ असं मत राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नोंदवलं होतं.
त्यानुसार देशात लवकरच एम्प्लॉयमेण्ट एक्सचेंज आपलं रूप पालटतील. ऑनलाइन नावनोंदणीचं हे काम एका वेगळ्या टप्प्यात जाईल आणि नवीन 5क् केंद्रही सुरू होतील !
हे सारं चित्र बदलत असताना प्रश्न एवढाच आहे की, नव्या संधीच्या शोधात असणारी तरुण पिढी या सा-या बदलत्या वर्तमानाचा कसा फायदा करून घेणार?
आपण किती ‘जागरूक’ आहोत यावर नवनवीन फायदे आपल्याला मिळणार की नाही हे ठरणार आहेत !
जी कामं एका क्लिकवर घरबसल्या होऊ शकतात, ती कामं करण्यासाठी आपल्याला नवीन तंत्रज्ञान शिकून घेतलं पाहिजे. मुळात आपल्या हातातले मोबाइल आणि आपले कम्प्युटर्स आपल्याला योग्य कारणांसाठी वापरता आले पाहिजेत. ऑनलाइन जगाचे हे नवे संदर्भ, नवीन अतिजलद व्यवस्था हे सारं आपण जितकं लवकर आपलंसं करू, तितकी नव्या संधीची दारं आपल्याला लवकर खुली होतील.! सध्या सुरुवात ऑनलाइन एम्प्लॉयमेण्ट नावनोंदणीपासून करायला काहीच हरकत नाही !
--------------------
नव्या जगात माहिती हीच सबलीकरणाची पहिली पायरी. माहिती वापरून, संधीचं सोनं करणं हा पुढचा प्रवास. त्या वळणवाटांवर नवी आव्हानं येतील. मात्र सूत्रं तेच, योग्य माहिती जमवून अभ्यास करून पुढे पाऊल टाकायचं. प्रत्येक पाऊल तुम्हाला नक्की यशाच्या शिखरावर नेईल..
- राजेंद्र दर्डा
www.facebook.com/social.teamaurangabad