शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

गुन्हेगारीच्या जगातून बाहेर पडत 'तो' मॅरेथॉन रनर कसा झाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 13:24 IST

त्यानं ठरवलं पैसा कमवायचा, त्यासाठी गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवलं. शार्प शुटर होत कधी खंडणीसाठी धमक्या, मारामार्‍या केल्या. तुरुंगाची हवा खाल्ली आणि व्यसनांच्या गर्तेत ढकलूनही दिलं स्वतःला! आता मात्र तो सावरलाय आणि...

ठळक मुद्दे‘पळणं’ ही स्वतर्‍ची ताकद बनवत व्यसनमुक्तीचा संदेश घेऊन तो मॅरेथॉन धावतोय. त्याच्या पॅशनची ही गोष्ट.

सारिका पूरकर-गुजराथी

एकेकाळी तो अंडरवर्ल्डचा शार्प शूटर होता आणि आता यशस्वी मॅरेथॉन रनर आहे. डोंबिवलीच्या राहुल जाधवची ही गोष्ट. हा ‘मॅरेथॉन’ प्रवास कसा झाला हे समजून घ्यायचं म्हणून अलीकडेच त्याची नाशिकमध्ये भेट घेतली. गप्पा अर्थातच फ्लॅशबॅकमध्ये जात सुरू झाल्या आणि त्याचा भूतकाळ उलगडत गेला.

मुंबई, ठाणे या शहरांतल्या मोठ-मोठय़ा बिल्डर्सला, बॉलिवूडमधील बडय़ा स्टार्सला खंडणीसाठी धमकवायचं, स्वतर्‍ची दहशत निर्माण करण्यासाठी प्रसंगी हाणामारी, तलवारी, लाठय़ा-काठय़ांचे वार करायचे आणि सर्वात शेवटी बंदूक चालवायची हे सारं एकेकाळी त्याला आम होतं. हे सारं कशासाठी कराचं तर त्याला पैसा कमवायचा होता. बक्कळ पैसा हवा होता. आपले वडील, इतर सर्वसामान्य नोकरदारांसारखे सकाळी 6 पासून रात्री 11 वाजेर्पयत राबराब राबतात, लोकलमध्ये धक्के खात घर व ऑफिस गाठतात आणि कमावतात किती तर महिन्याला दहा-बारा हजार रु पये. असं टिपिकल-काटकसरीचं मध्यमवर्गीय आयुष्य मला नको असं त्यानं वयाच्या 16-17 व्या वर्षीच ठरवून टाकलं होतं. आलिशान घर, पॉश गाडय़ा, महागडे कपडे असं चैनीचं आयुष्य याचं त्याला आकर्षण वाटत होतं. कष्ट करणार्‍यांना समाज मान देत नाही; पण ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यापुढे सारे झुकतात असं त्याचं निरीक्षण होतं. त्यात त्याची अभ्यासाची गाडी कधीच 60 टक्क्यांच्या पुढे जातच नव्हती. त्यामुळे पुढे जाऊन काय करिअर करणार? कोण नोकरी देणार आपल्याला? किती कमावू आपण? आणखी दहा वर्षानी कसं असेल आपलं आयुष्य, हा प्रश्न त्याला छळायचेच, उत्तर म्हणून त्यानं शोधले सट्टेबाजी, जुगार हे पर्याय. कमी कष्टात जास्त पैसे इथंच मिळतील असं त्याला वाटत होतं. काही मित्रांच्या साथीने त्यानं त्या मार्गावर  पाऊल टाकलं. वडील कंपनीत नोकरीला, भाऊ बी.एस्सीला, एक बहीण, आई गृहिणी असं घरात सुशिक्षित मध्यमवर्गीय वातावरण असतानाही याची पाऊलं गुन्हेगारी जगाकडे वळली. त्या जगात आत शिरण्याचा मार्ग तर सोपा असता; पण बाहेर पडण्याचा कठीण. आधी मित्र, नंतर काही राजकारणी अशी त्याची गँग मोठी होत गेली. खंडणी, हाणामारी यात तो सरावला. दारू-सिगरेटबरोबर चरस-गांजाही आता त्याला नशा करण्यासाठी लागू लागला. पोलीस सतत मागावर असत; पण त्यांना गुंगारा देण्यातही तो पटाईत झाला होता. दरम्यान, घरच्यांनी त्याला घराबाहेर काढलं. तू ज्या मार्गाने निघालाहेस त्याचा शेवट दोनच गोष्टीत होतो, एक म्हणजे एन्काउण्टर आणि दुसरा म्हणजे जेल असं मोठय़ा भावानेही समजावून पाहिलं, बहिणीनं नातं तोडलं. पुन्हा येऊ नकोस माझ्याकडे असं निर्वाणीचं सांगितलं. पण त्याला फरक पडला नाही. सतत हा दहा वर्षे पोलिसांना चुकवत तो त्याच जगात जगत राहिला.

अखेर एकदा एन्काउण्टर स्पेशलिस्ट शहीद विजय साळसकर यांनी राहुलला रंगेहाथ पकडलं. तोवर त्याच्या नावावर सतरा-अठरा गुन्ह्यांची नोंद झालेली होती. परंतु, त्याला जामीन मिळाला. मात्र व्यसन इतकं वाढलं होतं की नशेत कुठंही पडून राहायचा. आईवडिलांना सुचत नव्हतं, याचं काय करायचं. नवीन काम शोधायचं तर याचा भूतकाळ आधीच तिथं पोहचायचा आणि काम मिळत नसे. पोलीस सतत उचलून नेत. 15 दिवस झाले की आत-बाहेर असे सुरू असायचे. यातून नैराश्य येत गेले. अर्धवेडाच झाला तो. दरम्यान डॉ. शैलेश उमापे यांच्याकडे त्याच्यावर उपचार सुरू झाले. आई-वडील, बहीण यांनी राहुलला पुनर्वसनासाठी त्याला पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं. तिथंही पोलीस त्याचा पिछा सोडत नव्हते. कोणत्या ना कोणत्या गुन्ह्याच्या तपासासाठी ते त्याचा माग काढत मुक्तांगणमध्ये पोहचत. पण मुक्तांगणमध्ये राहुलचा नवा जन्म झाला. तिथं समुपदेशन, मायेचा ओलावा, विविध उपक्रम यामुळे राहुल बदलू लागला. स्वच्छतागृह साफ करणं, हाऊसकिपिंगची विविध कामं करणं यात तो रमू लागला. मुक्तांगणमध्ये त्याला पकडायला पोलीस आले, की तेथील कर्मचारी राहुल ही कामं करतानाचे व्हिडीओ त्यांना दाखवू लागले. तो बदलतोय, त्याला बदलू द्या अशी विनंती पोलिसांना करू लागले. पोलीसही हे व्हिडीओ बघून आश्वस्त होऊन निघून जात. हळूहळू राहुलला मुक्तांगणच्या बाहेर जाण्याचा गेटपास मिळाला. भरपूर मित्र मुक्तांगणने दिले. खूप वर्षानी तो सगळ्यांशी मनमोकळं बोलूू लागला. हसू लागला. मुक्तांगणमध्ये असतानाच त्यानं वाहन चालवण्याचं प्रशिक्षण,  पेपर बॅग्ज बनविणं अशा उपक्र मांमध्ये तो सहभागी झाला. त्यातून मिळालेले पैसे त्यानं आईच्या हातावर ठेवले. ती खरी कमाई आईनंही आनंदानं घेतली. राहुलने खंडणीतून कमावलेल्या बक्कळ पैशातील रु पयाही तिनं पूर्वी कधी घेतला नव्हता.

त्याचकाळात राहुलला लक्षात आलं की, आपण चांगलं पळू शकतो. पोलिसांना चकवा देत सतत पळणार्‍या राहुलने आपण वेगात पळू शकतो हे ताडलं. आणि पळणं हेच आपलं पॅशन ठरवलं. काही दिवसांनी अंकुश मोरडे यांनी त्याला त्यांच्या चॉकलेटच्या कंपनीत नोकरी दिली. नोकरी करत असतानाच वेळ मिळेल तेव्हा तो धावत राहिला. मुंबई ते डोंबिवली तो धावला. कधी कधी लोकलने प्रवास न करता दोन स्टेशनचे अंतर धावून पूर्ण केले. काही दिवसातच मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला. वृत्तपत्रात त्याचे फोटो झळकले. 

आणि मग राहुल धावू लागला व्यसनमुक्तीसाठीच. 

पळणं सुरूच आहे; पण त्याच्या पळण्याला दिशा मिळाली आणि याचं आयुष्यच बदलून गेलं.

***

राहुल सांगतो..

एक दिवस लक्षात आलं, चुकीच्या मार्गानं पैसा तर भरपूर आला; पण मी एकटा झालो. मला माझं कुटुंब राहिलं नाही, आपल्याला कुणी लग्नाला, वाढदिवसाला बोलवत नाहीत. एखाद्या चौकात मी उभं राहू शकत नाही. कोणाशी बोलू शकत नाही. पैशाच्या मोबदल्यात जर मला हे सारं गमवावं लागत असेल तर त्या पैशाचा काय उपयोग? पैसा असूनही मान मिळणार नसेल तर पैसा काय कामाचा? त्यात व्यसन ज्यात मी मलाही विसरून गेलो होतो.आता मी सगळ्यांना सांगतो नशा करायचीच असेल तर पॅशनची करा. तुमचं पॅशन निवडा. चित्रकला, खेळ काहीही असू दे; पण ते पॅशन जगून पहा. खरा आनंद केवळ पॅशनच देऊ शकतं. हाच संदेश देत मी आता धावतोय. आयुष्यात अडथळे येतच राहतील; पण त्यामुळे थांबायचं नाही त्यांना ओलांडून पुढं जायचं. नकारात्मक विचारांना जवळ भटूकही देऊ द्यायचं नाही.