शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फिजिकल डिस्टन्स पाळाच; इमोशनल डिस्टन्सचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:18 IST

फिजिकल डिस्टन्स पाळाच; पण मनांचं काय? मनानं दूर जाणं, मदत नाकारणं, माणसंच नाकारणं हे आपल्याला कुठं नेईल?

ठळक मुद्दे माणसा-माणसात आणि रक्ताच्या नात्यात अंतर पडणार नाही याची घ्यायला हवी. 

- गणोश पोकळे

सात-आठ महिने झाले कोरोना उद्भवला.आज गावखेडय़ात लोक सहज म्हणतात की काय हा आजार, माणसात माणूस राहिला. कोरोनाने माणसा-माणसात अंतर पाडलं.सामाजिक अंतराचा शाप घेऊन हा आजार आला. जगभरातली मानवी गजबज होत्याची नव्हती केली. कोटींच्या घरात लोकसंख्या असलेली शहरं मोकळी झाली. गावखेडय़ार्पयतचा मोकळा व्यवहार एका फटक्यात बंदिस्त झाला. गजबजलेल्या शहरासह गजबजलेले रस्ते एकाचवेळी निवांत झाले. प्रवाशांसह प्रवासही थांबला. पण शारीरिक दुरी राखता राखता माणसा-माणसात जे मानसिक अंतर पडत चाललंय त्याचं काय, असाही प्रश्न आहेच. कोण आणि कशी मिटवणार ही दरी. एक काळ असा येईल कोरोना साथ जगभरातून पूर्णपणो नाहीशी झालेली असेल. पण वाढलेलं मानसिक अंतर कसं कमी होणार?या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून शारीरिक अंतर पाळायचे आहे ही गोष्ट खरीच. पण हे अंतर पाळलंजातं तेव्हा समोरच्या व्यक्तीला जी वागणूक दिली जाते त्या नजरा कशा बदलणार?शहरातून गावांत कुटुंब आले. काहींना आसरा आणि प्रेम मिळालंही. पण काहींच्या वाटय़ाला मात्र उपेक्षा आली. रक्ताच्या नात्याच्या माणसांनीही त्यांना जवळ करायला घरात घ्यायला नकार दिला. कुठं झाडाखाली त्यांना संसार मांडावा लागला. माणसांत, नात्यांत दुरावा आणि अविश्वास आला.मनानं माणसं दूर झाली. माणसांपासून, आपल्याच माणसांपासून धोका आहे असा अविश्वास नजरेत कसा काय रुजला.आणि तो आता कसा पुसला जाणार?संकट येत असतात, जात असतात. मात्र, या आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, स्नेहाचा, मायेचा ओलावा सुकणार नाही हे तरी आपण पाहिलं पाहिजे.संकटकाळात माणसांना मदतीची गरज अस

ते, तेव्हा मदत नाही करणार तर कधी?तेव्हा माणुसकी नाही जपणार तर कधी?कोरोनाकाळात शारीरिक  दुरी-अंतर हे महत्त्वाचं आहे. पण ते करताना मनंही जपली पाहिजे. हे अंतर ठेवताना आपण जे शब्द वापरतोय, जी वागणूक देतोय, ती जर मनाच्या आत ठेच पोहचवणारी असेल तर.  शेवटी इतकंच की, वेळ आल्यावर हा आजार नक्की जाईल. तो जाण्यासाठी आणि आपल्याला न होण्यासाठी होईल ती काळजी जरूर घ्यावी. पण त्यापेक्षा अधिकची काळजी माणसा-माणसात आणि रक्ताच्या नात्यात अंतर पडणार नाही याची घ्यायला हवी. (गणोश मुक्त पत्रकार आहे.)