शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

ओझं

By admin | Updated: October 27, 2016 15:54 IST

वजनाचा आकडा. मार्कशिटवरच्या लाल रेषा. मार्कांचे बिचारे टक्के. कुणाकुणाचे आता कधीही डायल करावे न लागणारे फोननंबर.. कुणी कुणी दिलेल्या, आणि आता फक्त छळणाऱ्या भेटवस्तू..कुणी कुणी कधी कधी केलेले अपमान.. कुणी मारलेले टोमणे कुणाच्या रोखून पाहणाऱ्या नजरा.. आॅफिसात मिळालेले मेमो.. वडिलांनी दिलेले फटके..

पाठीवरचं बोचकंवजनाचा आकडा. मार्कशिटवरच्या लाल रेषा. मार्कांचे बिचारे टक्के. कुणाकुणाचे आता कधीही डायल करावे न लागणारे फोननंबर.. कुणी कुणी दिलेल्या, आणि आता फक्त छळणाऱ्या भेटवस्तू..कुणी कुणी कधी कधी केलेले अपमान.. कुणी मारलेले टोमणे कुणाच्या रोखून पाहणाऱ्या नजरा..आॅफिसात मिळालेले मेमो.. वडिलांनी दिलेले फटके..शेजारच्यांनी दिलेला त्रास..मित्रानं केलेला घात..मैत्रिणीनं दिलेला दगा.ब्रेकपनं भिजले रुमालपरीक्षेतलं अपयशहे सारं काय आहे?- ओझं.ते ओझं आपण मनावर सतत वागवतो.कधी मनाच्या माळ्यावर आतल्या बाजूला ठेवतो.कधी बाहेर काढून उस्तवार करतो.कधी ते बदाबद आपल्या अंगावर पडतं..आणि मग आपण ते तसंच ठेवून देतो कोंबूनमग ते डोकावत राहतं कुठकुठून...हे सारं का करतो आपण?ते ओझं उतरवून नाही ठेवता येणार?दिवाळीत माळ्यावरच्या अनेक अडगळीच्या गोष्टी भंगारात देतो,तसं भंगारात नाही काढता येणार?उगीच चोंबाळत बसायचं ते ओझं..ुउरापोटी घेऊन धावायचं..आणि मानगुटावर ओझं आहे म्हणून आपला स्पीड कमी पडतोम्हणत चिडचिडायचं.कशाला असं?उतरवून ठेवू,नकोसे आकडे.नकोसे टोमणे, नजरा. झालेले अपमान.नको त्या खुपत्या भावना.छळकुटे संवाद.हलकं वाटलं,तर कदाचित आपला आनंदी जगण्याचास्पीड वाढेल..ओझं वागवायचंकी उतरवून ठेवायचं..निर्णय आपला.. आपलाच!उडी आणि जमीनजास्त उड्या मारू नकोस..आपटशील..असं कुणी सांगितलं तर त्याच्याकडे बिंधास्त दुर्लक्ष करा!आणि स्वप्न आपलं कितीही मोठं असो,ेबेलाशक, हिमतीनं उडी मारा.विश्वास स्वत:वर पाहिजे,स्वत:तल्या बळावर पाहिजे,तेवढा पुरतो!पण अंदाज चुकला..उडी चुकली आणि आपण आपटलोच तर?तर...?तर काय?आपटलो तरी पडू तर जमिनीवरच ना!!आपण उड्या मारतोय,आकाशात उडतो म्हणूनकुणी आपल्या पावलाखालची जमीन तर नाही ना काढून घेऊ शकत?शकतं का?आपण उडालो, तरी आपली जमीन तिथंच राहते..पडलो तरी जमिनीवर पडू..लागलं तर परत उभं राहू..परत चालू, परत उडू..एवढा विश्वास तर कायम राहतो स्वत:वर..अंगावरच्या जखमांच्या खुणाआणि न भरलेले व्रणहे आपल्या धाडसाचे पुरावे..ते मानानं जपावेत..साजरे करावेत..मिरवावेत..