शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अब मुश्किल नहीं कुछ भी.

By admin | Updated: January 22, 2015 17:48 IST

‘थोडा है थोडे की जरुरत है.’ हा या देशाचा खरा मंत्र. आहे त्यात माणसं समाधानी आहेतही आणि नाहीतही.

 ‘थोडा है थोडे की जरुरत है.’

हा या देशाचा खरा मंत्र. आहे त्यात माणसं समाधानी आहेतही आणि नाहीतही.
जगातला सगळ्यात मोठा अपवर्डली मोबाइल म्हणजेच वरच्या स्तरात सरकण्यासाठी धडपडणारा हा समाज आहे. त्यातही तरुणवर्ग.
म्हणून तर इथे गावोगावी भेटतात महेंद्रसिंह धोनी आणि कंगना राणावतच्या हिमतीचे अनेक चेहरे. एरव्ही कोण होता धोनी, रांची नावाच्या छोटय़ा शहरात हायफाय क्रिकेटचं कोणतं वातावरण होतं?
पण तिथला एक छोकरा, थेट भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान होतो. दोन वर्ल्डकप जिंकून देतो. विदेशात सर्वाधिक यशस्वी कॅप्टन ठरतो. त्याला माघार माहिती नाही. त्याला छोटी स्वपA आवडत नाही. तो डरत नाही कशाला, जे करतो ते बिनधास. अॅग्रेसिव्हली.
त्याला ना त्याच्या दिसण्याचा कॉम्प्लेक्स, ना त्याच्या अॅक्सेण्टचा.
त्याची स्वत:ची म्हणून एक स्टाईल आहे, स्वत:चा एक खास अॅटिटय़ूड आहे.
आणि हा अॅटिटय़ूड नव्या भारताची खरी ओळख आहे.
नसेल आपल्याकडे बडं नाव, नसेल बापजाद्यांची दौलत, नसेल कुणी गॉडफादर. पण आपल्यात धमक तर आहे. गुणवत्ता तर आहे. मग त्याच्या जोरावर मोठं स्वपA पाहण्याची धमक बाळगणं हा नवा अॅटिटय़ूड आहे.
म्हणून तर या सा:या देशानंच जणू नव्या स्वपAांची लस टोचून घेतली आहे. ही स्वपAं फक्त पैसे कमवण्यापुरती मर्यादित नाही. तर स्वपA आहे, आपल्या मनासारखं जगण्याचं. जिंकण्याचं. स्पर्धेत सरस ठरण्याचं. काहीतरी वेगळं करण्याचं. अत्यंत कल्पक काम करून जगावर अधिराज्य गाजवण्याचं.
आणि या भारल्या उमेदीनं हा सारा तरुण देश नवं काहीतरी घडवण्याचा प्रय} करतो आहे. आजवरच्या पिढय़ांकडे एक चालसे अॅटिटय़ूड होता. आंथरुण पाहून पाय पसरण्याचा संस्कार होता. आता मात्र पाय हवे तसे पसरून आपल्या गरजेप्रमाणो अंथरुण तयार करण्याचा चंगच या तरुण पिढीनं बांधलेला दिसतो.
शहरातच कशाला गावोगावी एक स्मार्ट तरुण चेह:यांची फौज दिसते. जी आपलं गाव, आपली गल्ली, आपली आयुष्यं नव्यानं बांधत आहेत. बदल घडवायचा म्हणून स्वत:ला बदलण्याचा प्रय} करत आहेत. त्यासाठी अनेक नवनवीन स्किल्स शिकून घेत आहेत.
जे येत नाही ते शिकण्याचा आणि जे येतं ते धुमसून वापरण्याचा एक नवा कल दिसतो आहे.
‘जमेल आपल्याला’ हा नवा मंत्रच जणू या काळातली तरुण पिढी स्वत:ला आणि इतरांनाही देते आहे.
म्हणून तर भारतातली स्मॉल टाऊन पॉवर बडय़ाबडय़ा तज्ज्ञांना आणि अभ्यासकांना बुचकळ्यात पाडत आहे. खुर्द बुद्रूक गावात राहणारी तरुण मुलं, जिथं काही साधनं नाहीत त्या मुलांच्या महत्त्वाकांक्षा फुटलेले पंख हा अनेकांच्या केवळ कुतूहलाचाच नाही तर अभ्यासाचा विषय ठरतोय.
नव्या भारतात आपण स्मॉल टाऊनवाले आहोत असं तरुण मुलं अभिमानानं सांगत आहेत कारण स्मॉल टाऊनवालं असणं म्हणजे आपण हिमतीचे, जिगरबाज, सेल्फमेड आहोत असा एक नवीन मॅसेजच देता येतो.
या स्मॉलटाऊन पॉवरवाल्यानं बडय़ा मल्टिनॅशनलची गणितं, मार्केटिंगची तंत्रच बदलवून टाकली आहेत.
त्या नव्या तंत्रचं म्हणणंच आहे की, खरा भारत, खरी महत्त्वाकांक्षा या स्मॉल टाऊनवाल्या ‘इंडिया’ नसलेल्या ‘भारतात’ आहे.
आणि त्या भारताला आता मनोमन खात्री आहे की, अब मुश्किल नहीं कुछ भी. नहीं कुछ भी!
 
हम बोलेगा तो.
 
* भारताच्या नागरिकाचं सरासरी वय आहे फक्त 25 वर्षे. जगातला सगळ्यात तरुण देश म्हणून भारताची ओळख आहे.
 
* 2060 पर्यंत जगात भारताची लोकसंख्या सर्वाधिक असेल. लोकसंख्येच्या बाबतीत आपण चीनला 2028 मध्येच मागे टाकू, असा अभ्यासकांचा दावा आहे.
 
* जगातलं सगळ्यात मोठं रस्त्याचं जाळं भारतात आहे. जिथं काहीच पोहोचत नाही तिथं सरकारी बस पोहोचतेच ही आपली ख्याती. 
 
* गुजरातच्या एका खेडय़ात फक्त एकच मतदार आहे, तरीही तिथं दर निवडणुकीत व्होटिंग बूथ उभारला जातोच, आणि ती व्यक्ती नियमित मतदानही करते. 
 
* या देशात दर दहा कोसावर भाषा बदलते म्हणतात. देशभरात सुमारे 1क्क्क् भाषा बोलल्या जातात.
 
* या देशात 1,652 भाषा आहेत असं 1961च्या जनगणनेनं नोंदवलं होतं, मात्र त्यात काही फक्त बोलीभाषेचा फरक आहे. दुर्दैवानं अनेक भाषा त्यानंतर नामशेष संपू लागल्या आहेत.
 
* या देशात बहुसंख्य माणसांना तोडकंमोडकं का होईना इंग्रजी बोलता येतंच.
 
*हिंदी, बंगाली, तेलगू, मराठी, तमिळ, उर्दू या सहा भाषा, साधारण प्रत्येकी पाच कोटी लोक ही भाषा बोलतात.
 
*देशात अशा 122 भाषा आहेत की, साधारण 1क्,क्क्क् लोकच ती ती एकेक भाषा बोलतात.
 
* मेगासिटी म्हणून जगात ज्या शहरांची गणना होते त्यापैकी 1क् शहरं भारतात आहेत.
 
* छोटय़ा शहरांची झपाटय़ानं वाढ हे भारतातलं आणखी एक वैशिष्टय़. संयुक्त राष्ट्र संघानं झपाटय़ानं वाढणा:या ज्या 1क्क् शहरांची यादी जाहीर केली आहे, त्यात भारतातली बहुसंख्य शहरं आहेत.
 
रेकॉर्ड्सचं रेकॉर्ड
 
* गिनिज बुककडे वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी जेवढे अर्ज येतात, त्यात भारतीय अर्जाची संख्या मोठी आहे. कुणाला तरी कुठे तरी या देशात काही ना काही रेकॉर्ड मोडायचेच आहेत.
 
* आकारमानानं जगातला सातव्या क्रमांकाचा हा देश. लोकसंख्येनं मोठ्ठा. आणि दहा हजार वर्षाचा सांस्कृतिक वारसा सांगणारा.
* अनेक धर्म, भाषा, वंश, जातिभेद आणि त्यातून उद्भवणारे ताणतणाव पेलूनही एकसंध राहिलेला हा देश; त्यातली विविधता आणि टोकाचे विरोधाभास हेच एक मोठं रेकॉर्ड आहे.
 
 छोटी छोटी स्वप्न
 
* या देशात माणसांची स्वपA मोठी होत आहेत, पण त्या स्वपAांच्या मालिकेत अनेक छोटी छोटी स्वप्न आहेत.
 
* छोटय़ा कारचं मार्केट म्हणूनच भारतात वाढतं आहेत.
 
* जगातली सगळ्यात वेगानं वाढणारी फॅशन आणि टेक्सटाईल इंडस्ट्री भारतात आहे.
 
* स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री भारतात होते.
 
* सोन्याची सर्वाधिक आयातही भारतातच होते.
 
* अनेक दहशतवादी हल्ले सोसून, तेढ सहन करूनही हा समाज विकासाची, प्रगतीची नवी स्वपAं पाहत आहे, ती पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे.
 
पण तरीही.
* जागतिक बॅँकेच्या अहलवालानुसार आजही या देशातली 5क् टक्के जनता उघडय़ावर शौचास बसते. शौचालय नसणं ही या देशात मोठी समस्या आहे.
 
* आजही या देशात दंगलीचं, जातीय तणावाचं, ऑनर किलिंगचं प्रमाण मोठं आहे. त्यातही उत्तर प्रदेशात हे प्रमाण गंभीर आहे.
 
* भ्रष्टाचाराच्या जागतिक यादीत भारताचा 94वा नंबर आहे. भ्रष्टाचार करण्यात भारतीय आघाडीवर आहेत.