शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

एकदा नाही, कधीच नाही!

By admin | Updated: December 24, 2015 16:56 IST

थर्टीफस्टचं प्लॅनिंग करताना मित्रमैत्रिणी विचारणारच की, ड्रिंक्सचं काय? त्याचं उत्तर देण्यापूर्वी आणि ‘पिण्याचं’ समर्थन थर्टीफस्ट सेलिब्रेशनपुरतं करण्यापूर्वीही या काही गोष्टी तुम्हाला माहिती हव्या.

 
- धरव शाह
(धरव मनोविकारतज्ज्ञ असून, महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी तो व्यसनमुक्ती जाणीव-जागृतीचेही काम करतो.)
 
एक ड्रिंकही तुम्हाला दारुडं बनवू शकतं, हे लक्षात ठेवा!
 
थर्टीफस्टचं प्लॅनिंग करताना 
मित्रमैत्रिणी विचारणारच की,
ड्रिंक्सचं काय?
त्याचं उत्तर देण्यापूर्वी
आणि ‘पिण्याचं’ समर्थन 
थर्टीफस्ट सेलिब्रेशनपुरतं करण्यापूर्वीही  
या काही गोष्टी तुम्हाला माहिती हव्या.
त्या वाचा आणि मग ठरवा 
आपापल्या सेलिब्रेशनची व्याख्या आणि कल्पनाही!
 
4 प्रश्न, 1 उत्तर
 
 
पार्टी, सेलिब्रेशन म्हणजे दारू पिणं हे आता समानार्थी शब्द झालेत. मी ठिकठिकाणच्या शाळा-कॉलेजात जातो, तिथल्या मुलामुलींशी बोलतो. आनंद साजरा करण्याच्या कल्पनांपासून ते मनावरच्या ताणार्पयत आणि पिअर प्रेशर्पयतही, तेव्हा काही प्रश्न मला नेहमी विचारले जातात. आजवर किमान 250 प्रेझेंटेशन्स याच विषयावर करत मुलामुलींशी बोललं की ते काही प्रश्न कायम विचारले जातात.
थर्टीफस्टचं प्लॅनिंग करताना तुमच्याही मनात हेच प्रश्न नक्की असतील म्हणून त्या ‘मनातल्या’ प्रश्नांची ही उत्तरं!
ती वाचा आणि मग ठरवा आपापल्या सेलिब्रेशनची व्याख्या आणि कल्पनाही!
पार्टीत ‘कण्ट्रोल’मधे प्यायलं, सोशल ड्रिंक पुरतं, तर काय हरकत आहे, ते तर सेफच असतं ना?
- एका बहुकेंद्री व्यापक अभ्यासानं हे सिद्ध केलं आहे की, भारतीयांमधे लाईट किंवा क्वचित (म्हणजे ओकेजनली) केलेले मद्यपानही हार्टअॅटॅकचा धोका वाढवते. लाईट ड्रिंक्समुळेही काही प्रकारांचा कॅन्सर होण्याचा धोका असतो असं हा अभ्यास म्हणतो. क्वचित कधीतरी एक-दोनदा दारू पिणा:यांना काही फार गंभीर आजारांना सामोरं जावं लागत नाही; मात्र असं असतानाही क्वचित कधीतरी प्यायलं आणि गाडी चालवताना अपघात झाला अशा कहाण्या आठवा, दारू पिऊन माणसांना उडवणा:या किंवा स्वत:चा जीव गमावणा:यांच्या हकीकती आठवा. ते दारुडे नसतीलही; पण आपण ‘कण्ट्रोल’मधे पितो असं म्हणूनच त्यांनी दारू प्याली असण्याची शक्यता आहे. आणि हा ‘कण्ट्रोल’ सुटणं ही काही अपवादात्मक गोष्ट नव्हे. दारू हे व्यसन आहे आणि तिच्या याच क्षमतेमुळे एकदा दारूच्या ग्लासला हात लावला तरी तिचं व्यसन लागण्याचं प्रमाण 15 टक्के आहे. म्हणजे एकदाच पिऊन पाहू असं वाटणा:यांनाही तिचं व्यसन लागूच शकतं. आणि हे इतकं नकळत घडतं की, आपल्याला दारूचं व्यसन लागलं आहे हे मन मान्यच करत नाही. आपण किती पितो यावर आपला कण्ट्रोल आहे यावर ठाम विश्वास असणा:यांचं आयुष्य प्रत्यक्षात नासायला लागलेलं असतं. तब्येत, व्यावसायिक आयुष्य, कुटुंब आणि एकूण जगण्यावरच या व्यसनाचा परिणाम होऊ लागतो. आणि ज्या टप्प्यावर हे लक्षात येतं, त्या टप्प्यावरही ती सोडणं अवघड जातं. अनेकजण आमच्याकडे आता स्वत:हून येतात. सांगतात, ‘डॉक्टर माङयामुळे पूर्ण परिवार दु:खी आहे, मी कुत्र्यापेक्षा वाईट वागतोय, प्लीज मला ही दारू सोडायची आहे.’ मग उपचार सुरू होतात. डिस्चार्ज मिळतो. आणि पुन्हा घरी जाऊन ते प्यायला लागतात.
हे चक्र सुटत नाही. 
त्यामुळे या चक्रापासून लांब राहण्याचा उपाय एकच, एक पेग नको, एक पफ नको आणि एकदाही ट्राय नको. कधीकधी नको नी कधीच नको. 
कारण एकदाची सुरुवात होते त्यानं नशा थांबत नाही, प्रमाण वाढतच जातं!
त्यामुळे सेलिब्रेशनच्या व्याख्येतूनच पहिल्यांदा ही दारू काढून टाका!
 
जे कधीतरी दारू पितात, पण व्यसनी नसतात, त्यांच्यामुळे तर कुणाला काही त्रस होत नाही ना?
- त्रस होत नाही असं नाही. तो होतोच. एकदा जरी दारू प्यालेली असेल तरी त्यावेळीही स्वत:वरचा कण्ट्रोल आणि निर्णयक्षमता, तर्कबुद्धी यांचा तोल सुटलेलाच असतो. अनेक लोक, अगदी डॉक्टर, बडे अधिकारीसुद्धा दारूच्या नशेत असताना गैरवर्तन करताना पकडले गेलेले आहेत. आणि नंतर आयुष्यभर त्या गोष्टीसाठी त्यांना तोंड लपवावं लागलेलं आहे. आजवर झालेले अनेक अपघात हे पार्टी ड्रिंकर्समुळे झालेले आहेत, व्यसनींमुळे नव्हे! अनेकदा नोकरी लागली म्हणून, वाढदिवस म्हणून पाटर्य़ा होतात. तिथं कधीतरीच आनंदात प्यालो म्हणताना अपघात झाला म्हणून अपंगत्व येण्यापासून जीव गमावल्यार्पयतच्या कितीतरी घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. 
त्यामुळे नियम तोच, आनंदात नाही. पार्टीत नाही, पहिल्यांदाच नाही नी एकदाच नाही. मद्यपान नाहीच करायचं.
 
पण स्ट्रेस किती वाढला आहे, अनेकजण म्हणतात की थोडंसं ‘पिण्यामुळे’ तर स्ट्रेस कमी होतो, हे खरंय का?
- कुणाच्या डोक्यावर लाखभर रुपये कर्ज असेल आणि त्याचं टेन्शन आलं म्हणून तो दारू प्यायला तर ते कर्ज कमी होईल का? ब्रेकअप झाला म्हणून दारू प्यायला सुरुवात केली तर सोडून गेलेली गर्लफ्रेण्ड परत येईल का?  नाही! पण दारू न पिता समजा रडूनभेकून का होईना हे स्वीकारलं की ती गेली आपल्याला सोडून तर कधीतरी त्या दु:खातून बाहेर पडत पुन्हा प्रेमातही पडता येईल. पण दारूच पीत बसलं तर आयुष्य अजून नासत जाईल!
त्यामुळे हे लक्षात ठेवायला हवं की, दारू हे उत्तर नाही. पिण्यानं कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. काही तास ते प्रश्न विसरल्याचा भास फक्त होतो. पण ती नशा उतरली की स्ट्रेस वाढल्यासारखा वाटतो. आणि दूरगामी परिणाम अधिक वाईट होतात ते वेगळेच. त्यापेक्षा प्रश्न सोडवण्याचं कौशल्य शिकता येईल. संगीत, खेळ, मेडिटेशन, ट्रेकिंग, मित्रपरिवार यासारख्या चांगल्या गोष्टीत मन रमवून परिस्थितीशी लढता येईल. त्यातून आत्मविश्वासही वाढेल!
 
दारू पिणं म्हणजे  ‘मॅनली’ असं वाटतं, असं तरुण म्हणतात. ते खरंच तसं असतं का?
- कसं शक्य आहे? दारू पिणारी, सिगारेटींचा धूर भकाभका सोडणारी मुलं मुलींना आवडत नाहीत. त्यात ‘मॅनली’ असं काहीही नाही. उलट त्यामुळे पैशाचा चुराडा तर होतोच, पण तब्येतही खराब होते, स्टॅमिना कमी होतो. तोंडाला घाणोरडा वास येतो. तुमचा अॅट्रॅक्टिव्हनेस कमी होतो. प्रोफेशनल क्षमताही कमी व्हायला लागतात. हे सारं ‘मॅनली’ असं कसं म्हणता येईल?
 यंदा एवढं कराल?
सायकॅट्रिस्ट म्हणून काम करताना असे उद्ध्वस्त होत असलेले तरुण मी पाहतो. त्यामुळे येत्या वर्षाचं स्वागत करताना दारूला त्या सेलिब्रेशनमधून वजा करा. छान आनंददायी पार्टी प्लॅन करा. जिथं फक्त आनंद असेल, आपली माणसं असतील आणि पूर्ण शुद्धीत नव्या जगण्याचं, नव्या वर्षाचं स्वागत करता येईल. अशी आनंदाची यादगार पार्टी मग तुम्ही कधीच विसरणार नाही.