शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

NO जरुरी होता है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 08:33 IST

एखादी गोष्ट नाही मिळाली, संधी नाकारली गेली, एखाद्या जिवाभावाच्या व्यक्तीनंच आपल्याला नकार दिला, नाकारलं तर किती दिवस आपण आयुष्य त्या नकारात कोंडून घालणार? बाहेर पडा त्यातून एक नकार नीट पचवला तर हजार होकार वाट पाहत उभे राहतील. पण त्यासाठी नकाराकडे पहायची नजर कमवावी लागेल...

- प्राची पाठक

कोणी आपल्याला नाकारलं, नाही म्हणालं तर आपण दुखावले जातोच. आपलं काही चुकलं का, समोरच्यानं आपल्याला का नाकारलं असेल, कोण नेमकं कसं वागलं, का वागलं याची उत्तरं मिळाली तर बरं होईल, असं वाटत असतं. उत्तरं मिळून आपण गप्प बसणार असू, असंही नसतं. आपण आपली बाजू मांडू लागतो. कोणाला तीसुद्धा ऐकण्यात रस, वेळ नसेल ही शक्यता असते. पण आपल्याला वाटत असतं की जर आपल्याला निदान कारण कळलं तर मी माझी भूमिका नीट स्पष्ट केली असती. आपण किंचित आशा बाळगून असतो की माझी बाजू कळली तर नकार मिळाला नसता. पण हीपण एक शक्यताच असते. कुणाला अशी बाजू मांडायची संधी मिळूनदेखील नकारच स्वीकारावा लागतो. कोणाला आपल्याला नकार का मिळालाय, याचे उत्तर आयुष्यभरदेखील मिळत नाही.

खरं तर अशी सगळी स्पष्टीकरणं आयुष्य आपल्याला सहजच आणि हवी तशी देत नाही. त्यामुळे त्या त्या घटनेचं आपलं आपलं व्हर्जन घेऊन आपण तो नकार पचवत राहतो. इतरांना सांगायला गेलं तर त्याचे काय अर्थ लावले जातील, ते माहीत नसल्यानं अनेकजण नकाराशी सामना करताना एकटे पडलेले असतात. क्वचित कुणाला सांगितलं तर पुढे मागे तेही नातं तुटू शकेल, तोच मुद्दा आपल्यासाठी परत वापरला जाईल, चार ठिकाणी तीच गोष्ट उगाच होईल अशी भीती असते. आपण विनाकारण कुरकुर तर करत नाही ना? कदाचित आपलीच योग्यता नाही होकार मिळायची, समोरचा कोण समजतो स्वत:ला, त्याचा बदलाच घेईनच अशाही सगळ्या विचारांच्या फेरी आतल्याआत घडतात. इतक्या टोकाला त्या जाऊ शकतात की ज्याचा होकार मिळण्यासाठी आपण इतके कासावीस झालेलो असतो एके क्षणी, तोच कसा वाईट आहे, त्याचं कसंकसं आणि काय काय चुकतं तेच आपण मोठं करून कायम मनात आणि समोर येईल त्याला सुनावत राहतो.

नकार पचवणं हे केवळ मानसिक नसतं. एखाद्याला शारीरिक इजा केली तर कसा त्रास होईल, तशा स्वरूपाच्या त्रासातून मन आणि शरीर आपल्याला घेऊन जातं. आपल्याविषयी प्रश्नचिन्ह उभं करतं. स्ट्रेस येतो, खजील वाटतं. आपण कोणीतरी कमी आहोत, असा न्यूनगंड ते आपल्याला देऊन जातं. झोप उडते, तेच ते विचार मनात येतात. एकट्यानं आपण त्या विचारांशी, अस्थिरतेशी झुंजत बसतो. हळूहळू जवळपास असलेल्या लोकांनाही टाळू लागतो. नकार सतत मनात मोठा होत राहतो.

आता प्रश्न यातून कसं बाहेर पडायचं?पहिली गोष्ट म्हणजे आपण त्या नकारातच, त्याच टप्प्यात अडकलो आहोत, हे आपल्याशीच पक्कं केलं तर एक सोपी गोष्ट करता येते.

आपण इथं कितीवेळ अडकून पडायचे, याचं एक लिमिट स्वत:ला आखून द्यायचं. म्हणजे काय तर मी अमुक वेळ टीव्ही बघेन, अमुक वेळ फोन बघेन, अशी शिस्त लावायचा थोडाफार प्रयत्न आपण करतच असतो. कधी ताबा जातो; पण एरवी आपण हा विचार तरी करतो की यावर पूर्ण वेळ खर्च करणं योग्य नाही. तसंच वेळेचं एक लिमिट या भळभळणाºया जखमेला आखून देता येतं का, ते बघायचं. थोडक्यात, दु:ख खोटंखोटं विसरायचं नाही. ‘छे, छे मला काहीच फरक पडत नाही’, असंही म्हणायचं नाही. ‘हो, मी दुखावलो गेलोय/गेलेय आणि त्यावर नीट विचार करायला मी वेळ घेईन’, हे बजावायचं स्वत:ला.

अर्थात सगळीच उत्तरे लगोलग मिळणार नाहीत. कदाचित कधीच मिळणार नाहीत. पण आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे हे एक नाकारलं जाणं आहे का, असं आत्मपरीक्षण करता येतं. या नाकारल्या जाण्याला आपल्याला चांगलं काही करून/घडवून भिडायचं असेल, तर उत्तरं शोधायला, मागच्याच पानावर परत आणि सारखंसारखं अडून राहायला आजचा वेळ का घालवतो आहोत आपण याचा विचार करून त्याचं टाइम लिमिटच आखता येतं. म्हणजे चक्क आपण वेळ ठरवतो, चार दिवस, आठ दिवस घेतो. आणि मनात हे सॉर्ट आउट करतोच, हे असं ठरवून टाकायचं. तो वेळ उलटला की मात्र तेच ते परत होणार नाही याची काळजी घ्यायची. जमलं नाही तरी जमेल असा स्वत:लाच आधार द्यायचा. इतरांनी भलेही आपल्याला नाकारलं असेल, आपल्याला आपणच स्वीकारणं आणि समजून घेणं तर आपल्या हातात असते ना? ते कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी कुणाच्याही मदतीची गरज पडत नाही. आपला टेकू आपल्यातच शोधता येतो.

अवघड वाटतं हे, पण अशक्य नसतं. सरावानं जमतं. अंगवळणीही पडतं..

(मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेत, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)