शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

ना बोले तूम, ना मैने कुछ कहां.

By admin | Updated: February 12, 2015 16:52 IST

प्यार इश्क मोहब्बत.या टप्प्यात ना भल्याभल्यांची बोबडी वळते.त्या रंगीलातल्या आमीर खानसारखं होतं.

प्यार इश्क मोहब्बत.या टप्प्यात ना भल्याभल्यांची बोबडी वळते.त्या रंगीलातल्या आमीर खानसारखं होतं.तो म्हणतो ना, रोज रोज हम सोचता यहीं की,आज हमको वो अगर, मील जाए कहीं,
साला, ऐसा बोलेगा, साला वैसा बोलेगा,
खुल्लमखुल्ला उसपे दिल का राज हम खोलेगा,
वो सामने जो आती है,
सांस ही अटकती है,
और ये जुबां जाती है फिसल.
हे सेमटूसेम आपल्याही बाबतीत घडताना अनेकांनी अनुभवलं आहेच.
एकतर काही बोलता येत नाही, शब्द सुचत नाहीत,
अनेकदा तर बोलतो खूप पण त्यात जे बोलायचं तेच राहून जातं.
आणि एवढं करून असं करता करता, प्रेमातबिमात पडलंच,
प्रपोज मारलंच, तो/ती हो म्हणाले,
प्रेमाची गाडी पुढं निघालीच की,
गडबड होते.
गैरसमज आणि भांडणाचे स्पीडब्रेकर समोर यायला लागतात.
रोमान्स आणि प्रेम राहतं बाजूलाच, 
एकमेकांच्या बोलण्यातून नको ते अर्थ तरी काढले जातात 
नाहीतर एक वाक्य हमखास चिपकवलं जातं.
‘तुला कळतंच नाही, मी काय म्हणतेय ते’
किंवा
‘तुला काय नेमकं म्हणायचं असतं ना, ते नीट सांगत जा.
उगीच कोडी सोडवा खेळ नको.’
या अशा चालवा डोकी-सोडवा कोडी खेळात जर 
तुम्ही व्हॅलेण्टाईन्स डे सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करत असाल, 
आणि त्या प्लॅनिंगचा पचका होऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल..
तर काही सोप्या वाक्यांचे मोठे अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे.
ते समजून घ्या, तरच इश्कवाला दिवस नीट सेलिब्रेट होईल; 
नाहीतर ऐन व्हॅलेण्टाईन्स डेलाच भांडण, 
हा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो.
( कुणी तसं जाहीर कबूल करत नसलं तरीही.)
त्यामुळे ‘ती’ जे म्हणते ते
आणि ‘तो’ जे म्हणतो ते,
म्हणजे नक्की काय, हे तुम्हाला जरा माहितीच असायला हवं.
तरच तुमचा व्हॅलेण्टाईन्स डे ख:या अर्थानं हॅप्पी होऊ शकेल.
 
तो जेव्हा म्हणतो,
आय लव्ह यू !
एकतर त्याला जाम टेन्शन येतं, आय लव्ह यू म्हणायचं. 
(म्हणजे जे खरोखरच प्रेमात पडलेले असतात, तिच्यासाठी पुरते पागल झालेले असतात ते. 
पक्के फ्लर्ट असतात, 
त्यांच्याविषयी ही चर्चा नाही.)
तर त्याची अवस्था असते,
वो ना कहेंगे तो 
खुदकुशी कर जाऊंगा मै यारो, 
वो हां कहेंगे तो भी खुशी से मर जाऊंगा मैं यारो.
अशा अवस्थेत हिंमत एकवटून, रिहर्सल करकरून तो आय लव्ह यू म्हणतो.
पण त्याला ते पुन्हा पुन्हा म्हणणं जरा अवघड असतं.!
कारण त्याला वाटतं, सांगून टाकलं ना, एकदा झालं काम! पुन्हा काय तेच ते सांगायचं. येताजाता तेच ते काय म्हणायचं?
पण तिला वाटतं की, यानं सांगत राहिलं पाहिजे की, आय लव्ह यू. त्या शब्दात तिला बरंच काही ऐकू येतं. म्हणजे तू सुंदर दिसतेस, बाकीच्यांपेक्षा महत्त्वाची आहेस, मी तुला दगा देणार नाही. असं तिला त्यावेळी जे सोयीचं वाटतं, ते तिला ऐकू येतं.
पण तो हे म्हणतच नाही पुन्हा पुन्हा म्हणून तिची चिडचिड, ती म्हणते साधं आय लव्ह यू म्हणायचं, त्यात काय लागतं?
पण त्याला जमत नाही. कारण तो जेव्हाकेव्हा म्हणतो, ते म्हणणं, हे त्याचं मोकळं होणं, सुटणं असतं. एकदाच प्यार का इजहार पुन्हा पुन्हा नाही! त्यामुळे म्हण म्हण म्हणत त्याला छळणं, म्हणजे जरा अतीच होतं!
 
तो जेव्हा म्हणतो,
मला नकोय काही गिफ्ट!
एकतर आधीच प्रश्न असतो की, ‘त्याला’ काय गिफ्ट द्यायचं. त्यात तो म्हणतो की, मला नकोय गिफ्ट!
त्यानं तसं म्हटलं की, ती भडकते. चार दुकानं शोधून तिनं गिफ्ट आणलेलं असतं. आणि तो म्हणतोय, हे नकोय मला, या असल्या रंगाचा शर्ट मी नाही घालत, हा असला परफ्यूम मी नाही वापरत, हा बेल्ट आहे की रोपवे.?
असं तो काहीही म्हणू शकतो.
तर तो तसं म्हणाला, तर त्याच्या भावनेचा आदर करायला शिका. मुख्य म्हणजे एकटीनं जाऊन त्याच्यासाठी गिफ्ट घेऊच नये.
त्याला सरळ दुकानात न्यावं, बजेट सांगा, तुम्हाला त्याला काय घ्यायला आवडेल ते सांगा, आणि ते नको असेल त्याला तर त्याला जे हवं तेच त्याला घेऊ द्या. तरंच तो खूश होईल. कारण दुस:यानं आपल्याला काही देणं यातला रोमॅण्टिसिझम त्याला कळतच नाही. उलट आपण निर्णय घेऊन आपल्यासाठी काहीतरी निवडलं यात त्याला भयंकर आनंद होतो.
तो आनंद त्याला होऊ द्या, आणि जे घेतलं ते कितीही भुक्कड असलं किंवा वाटलं तरी त्याविषयी मतप्रदर्शन करू नका.
कारण तसं केलं की, तो चिडणार, वैतागणार!
 
ती जेव्हा म्हणते,
मला काहीच नको..
 
‘सांग ना, तुला काय गिफ्ट हवंय?’
असं मारे तो तिला विचारतो, त्याला वाटतं, देऊन द्यायचंच आहे तर तिच्या आवडीचं देऊ, कारण गिफ्ट दिल्यावर भुणभुण नको, हेच का दिलं, ते का नाही दिलं?
तो आपला गोष्टी सोप्या आणि सॉर्ट आऊट करण्याच्या मागे, म्हणून तो तिला विचारतो की, तुला काय गिफ्ट देऊ? एकदा नाही चारचारदा विचारतो. पुन्हा पुन्हा विचारतो. अनेकदा दुकानातही घेऊन जातो. ती सोबतही येते.
पण तिचं उत्तर ठरलेलं, ‘मला काहीच नको. खरंच नकोय!’
असं तिनं चारचारदा सांगितल्यावर त्याला वाटतं की, खरंच तिला काही नकोय, ती समंजस आहे. तिचं या फुटकळ वस्तूंवर नाही तर आपल्यावर प्रेम आहे. मग तोही गिफ्ट घेण्याचा विचार सोडून देतो. तिथंच सगळा घोळ होतो.
कारण ती जेव्हा म्हणते की, मला काहीच नकोय, याचा अर्थ एवढाच असतो की, तुला काय गिफ्ट हवंय हे असं तू पुन्हा पुन्हा विचारू नकोस, माझा संताप होतोय.
कारण तिच्या मते गिफ्ट विचारून देत नसतात. व्हॅलेण्टाईन गिफ्ट तर नाहीच नाही. तिला वाटतं, त्यानं विचार करावा हिला काय आवडेल, काय छान दिसेल, ते ठरवून चार दुकानं शोधून ते गिफ्ट आणावं, मस्त गिफ्ट पॅक करून हातात द्यावं. त्यात तिला रोमॅण्टिक वाटतं. तिचं प्रेम गिफ्टवर, त्याच्या किमतीवर नसतं.
तिला मस्त वाटतं ते, त्यानं आपला विचार करून गिफ्ट आणलं या भावनेनं.
पण ते त्याला कळत नाही.
आणि ती म्हणत राहते, मला काही नकोय. म्हणून म्हणून थकली की, फालतू कारणाचं खुसपट काढते, चिडते. बोलते.
त्याला वाटतं, मी तर विचारलं होतं, काय गिफ्ट देऊ, बजेटही सांगितलं नाही, पण हिचा पापड मोडकाच. घोळ होतो, तो इथेच!
 
ती जेव्हा म्हणते,
मला काहीही चालेल, तू ठरव!
 
‘आपण आधी सिनेमाला जाऊ, मग जेवायला जाऊ, का आधी लॉँगड्राईव्हला जायचं, तिकडून मग मॉलमधे जाऊ. काय चालेल ना?’
तो एकदम एक्साईट होऊन तिला विचारतो.
ती म्हणते, ‘मला काहीही चालेल, तू ठरव!’
मग तो ठरवतो, तिला इकडेतिकडे घेऊन जातो, जेवायला जातात. तर हिचा चेहरा एकदम उतरलेला. बोअर. त्यानं विचारलं तर ती म्हणते, मला जाम बोअर झालं, काही मजाच नाही आली. किंवा काही बोलतच नाही. हुप्पं होऊन बसते.
त्याला कळत नाही, एवढा वेळ हिच्या पाठी घालवला तरी हिचा पापड पुन्हा का मोडला? पागल तर नाहीये ही.
पण होतं काय, तिला वाटतं, आपण दोघं मिळून ठरवावं, यानं ठरवण्यापूर्वी आपल्याला विचारावं की, सांग तूला काय करावंसं वाटतंय?
किंवा असं काहीतरी प्लॅन करावं जे यापूर्वी कधी केलेलं नाहीये. काहीतरी सुपर एक्सायटिंग. पण याचं नेहमीसारखं ठरलेलं, लॉँग ड्राईव्ह, सिनेमा, जेवण की झालं.
त्यामुळे जेव्हा जेव्हा ती म्हणते की, मला काहीही चालेल, तू ठरव. त्यावेळेस गप्प राहून, तिला काही गोष्टी ठरवू देणंच हिताचं असतं असं खुशाल समजा!