शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

NEWTRO : न्यू - ट्रो, तरुणाईचा नवा ट्रेण्ड, स्वागत तो करो इसका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 13:15 IST

न्यू + रेट्रो = न्यू-ट्रो, असा हा नवा मामला आहे. 1980 आणि 1990 च्या दशकात जे जे लोकप्रिय होतं ते नव्याचा हात धरून आता पुन्हा येतं आहे.

ठळक मुद्दे आपलं आणि पारंपरिक असं टिकवून धरलं पाहिजे ही ओढ माणसांत आहेच.

- अनन्या भारद्वाज

मैने प्यार किया हा सिनेमा येऊन कितीतरी वर्षे होऊन गेली, पण सध्या सोशल मीडियात त्या सिनेमातली गाणी वेगळ्याच रूपात फिरताना तुम्ही पाहिली असतील, आलीही असतील फॉरवर्ड होत तुमच्यार्पयत.म्युझिक नाहीच, फक्त कुणीतरी गातंय. ( तेही बेसूर) पण अनेकांची ते पाहून हसून मुरकुंडी वळली आणि ती गाणी पुन्हा तुफान व्हायरल झाली.मैने प्यार किया हा 1989 साली रिलीज झालेला सिनेमा. एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते म्हणत प्रेमात पाडणारा. त्याकाळच्या तरुण पिढीला दिवानं करणारा.आज विशीत असलेले अनेकजण तेव्हा जन्मालाही आलेले नव्हते. मात्र तरीही या नव्या सोशल मीडिया व्हायरल ट्रेण्डने त्यांना वेड लावलं. तेच अशी ही बनवाबनवी सिनेमाचं. त्यातले इस्त्रायलचे मित्र, वारलेले रुपये आणि धनंजय माने नुकतेच पुन्हा एकदा राजकीय टिप्पण्या करत चर्चेत आले.हा सारा नवा मामला काय आहे?आपल्याकडे म्हणजे भारतात त्याला काही नाव नसलं तरी जगभरात सध्या कोरियातल्या अशा एका ट्रेण्डची जोरदार चर्चा आहे. आज टीनएजर असलेली आणि जेमतेम पंचविशीच्या आत असलेली तरुण पिढी त्या ट्रेण्डने दिवानी झालेली आहे. आणि त्या ट्रेण्डमुळे जगभरातल्या तरुणांर्पयत पुन्हा नव्यानं काही जुन्या गोष्टी जात आहेत, लोकप्रियही होत आहेत. कारण तरुणांच्या जगात कोरिअन म्युझिक, बॅण्ड्स यांची मोठी चलती आहे. त्यामुळे कोरियातल्या तारुण्यानं जन्माला घातलेला हा नवीन ट्रेण्ड काही दिवसात जगभर पोहोचला तर नवल वाटू नये.तसंही वर म्हटल्याप्रमाणे आपल्याहीकडे सोशल मीडियात 80 आणि 90च्या दशकात लोकप्रिय असलेल्या गोष्टी आता नव्यानं नवे कपडे लेवून येत आहेतच.कोरियात तो ट्रेण्ड अधिक ठळक आहे आणि तिथल्या सोशल मीडियात त्याचीच चलती आहे.त्या ट्रेण्डचं नाव आहे.न्यू-ट्रो.हे दोन शब्द एकत्र वाचून काहीच खरं तर कळणार नाही.त्यांची फोड केली तर मात्र लगेच ट्रेण्ड काय आहे हे लक्षात येईल.न्यू + रेट्रो = न्यू-ट्रो, असा हा नवा मामला आहे.म्हणजे काय तर काही गोष्टी नव्या, आजच्या काळातल्या, एकदम टीनएजवयाच्या, मॉडर्न, अपडेट तर काही गोष्टी जुन्या एकदम 80च्या आणि 90च्या दशकातल्या यांचा मेळ घालून हा नवीन ट्रेण्ड जन्माला आला. आणि कोरिअन टीनएजर्स आणि पंचविशीच्या आतले तरुण त्याचे एकदम दिवाने झाले आहेत.आपण कसे एकदम ‘न्यू-ट्रो’ जगतो आहोत  हे दाखवण्यासाठी त्यांनी आपली लाइफ स्टाइलच बदलून टाकली आहे. फॅशन आणि सौंदर्यप्रसाधनांचा विचार केला तर कोरिअन तारुण्य जगभरात आघाडीवर असतं. तिथलं तरुणांचं राहणीमान, मेकअप, त्यासाठीची प्रसाधनं हे अनेकदा भडक वाटू शकतं. मात्र आता न्यूट्रोच्या नावाखाली हे तारुण्य पुन्हा एकदा साधेपणाकडे वळत आहेत. कमीत कमी मेकअप, सगळ्या नैसर्गिक गोष्टींचा वापर, कपडेही काहीसे जुन्या वळणाचे, एवढंच नाही तर आपल्या खाण्यापिण्यातही त्यांनी पारंपरिक आणि स्थानिक पदार्थ खाण्यावर भर दिला आहे. ज्यांची ऐपत आहे त्यांनी तर आपल्या खोल्याही या न्यूट्रो पद्धतीनं रंगवून, बदलून घेतल्या आहेत.आणि हे सारं आपण कसं करतोय, का करतोय, त्यानं आपल्या लाइफ स्टाइलमध्ये कसे बदल झालेत हे सारं अनेकजण सोशल मीडियावर लिहून सांगतही आहेत.1980 आणि 1990च्या दशकातला नॉस्टेलजिया कोरियात नव्यानं जागा झाला आहे. त्या काळाविषयी ओढ आणि अप्रूप असं दोन्ही आहे. जागतिकीकरणानं बदलतं जग भारतानं जसं त्याकाळात अनुभवलं तसंच काहीसं कोरियातही झालं. त्यामुळे आपलं आणि पारंपरिक असं टिकवून धरलं पाहिजे ही ओढ माणसांत आहेच.आता नव्या पिढीनंही त्याचा हात धरत हा ‘न्यू-ट्रो’ ट्रेण्ड जन्माला घातला आहे.तो किती काळ टिकेल, हा प्रश्न नाही; मुद्दा आहे तो नव्याची जुन्याशी सांगड घालण्याच्या तरुण प्रयत्नांचा.आता तरी तो प्रयत्न यशस्वी होताना दिसतो आहे.

******************

ऑल थिंग्ज नॅचरलकेमिकल टाळून जगण्याचा एक निसर्गस्नेही रस्ता!

ऑल थिंग्ज नॅचरल- हे  तीन शब्द म्हणजे सध्या अनेक तरुणांच्या जगात ‘मोस्ट प्रेशियस वर्ड्स’ म्हणून गणले जात आहेत. नव्या पर्यावरणस्नेही जगण्यात काहीच कृत्रिम, कॉस्मेटिक नको असं आताशा अनेकांना वाटू लागलं आहे. त्यातूनच हा नवा ट्रेण्डही उदयाला येतोय, ज्याला ऑल थिंग्ज नॅचरल असं म्हणता येईल.त्यामुळेच कॉटनचे कपडे, शक्यतो हातानं धुता येतील असे, सेंद्रिय साबण किंवा त्याचाही कमी वापर, मेकअपचा कमी वापर, त्यातही विविध लोशन, डिओड्रण्ट, नेलपेण्ट, लिपस्टिक या सार्‍याचा कमी वापर करणं, मेकअप न करणं हे सारं नवं म्हणून ‘इन’ आहे.खरं तर एरव्ही हे सारं करा आणि साधं राहा असं तरुणांना कुणी सांगितलं असतं तर कुणीच ऐकलं नसतं. अनेक मुलींचा ओढा तर मेकअपकडे असतोच.मात्र आता नो नेलपेण्ट, नो मेकअप, कीप इट नॅचरल असे हॅशटॅग सोशल मीडियात मिरवत आपण शक्यतो निसर्गाला हानी होईल असे केमिकल वापरू नयेत इतपत भान तरी अनेकांना येत आहे, जे महत्त्वाचं आहे.