शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंड आणि फिजी कोरोना मुक्त बेटावरचे  तारुण्य कसे तरले या कोरोना काळात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 13:18 IST

न्यूझीलंड आणि फिजी. हे दोन देश कोरोनामुक्त झाले. तिथल्या तारुण्यानं कशी लढली ही लढाई? पर्यटन व्यवसाय ठप्प झाला; पण त्यांनी हार मानली नाही.

ठळक मुद्दे साथीचा रोग नियंत्रणात आणण्यासाठी फिजी तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  - कलीम अजीम

गेल्या आठ महिन्यांपासून जग कोरोनासंकटाशी दोन हात करतंय. काही देशांत परिस्थितीनं विदारक रूप धारण केलं आहे तर बरेच देश आता कोरोनामुक्तीच्या मार्गावर वाटचाल करत आहेत. त्यात पहिला नंबर न्यूझीलंडचा. आता न्यूझीलंडसह नऊ देशांनी कोविड 19 पासून मुक्ती मिळवली आहे.जनतेला धन्यवाद देत पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी देशाला कोरोनामुक्त घोषित केलंय. 8 जूनपासून देशातील सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना मागे घेण्यात आल्या आहेत.5क् लाख लोकसंख्या असलेल्या या देशात कोरोनामुक्तीचा बहुमान तरुण आणि महिलांना मिळतोय. दक्षता, योग्य नियोजन, संवेदनशीलता व दूरदृष्टी हे पंतप्रधान जेसिंडा यांचे गुण आहेत. वय जेमतेम 39 वर्षे. तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी आपल्या देशाला एका संकटातून बाहेर काढलं आहे.न्यूझीलंडमध्ये मार्च महिन्याच्या दुस:या आठवडय़ात 6 कोविड रुग्ण आढळले. त्यानंतर देशात बाहेरून येणा:या सर्व प्रवाशांना सेल्फ आयसोलेशन बंधनकारक करण्यात आलं.लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आणि 25 मार्च रोजी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा झाली.जगभरात एप्रिल-मे महिन्यात या रोगराईचा प्रसार झपाटय़ाने होत होता. परंतु न्यूझीलंडमध्ये मात्र ही संख्या 1154 वर येऊन थांबली. 22 माणसं दगावली. आज देशात एकही कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण नाही याचं श्रेय पंतप्रधानांनी जनतेला दिलंय. विशेष म्हणजे तरु णाईनं कसोशीनं पाळलेल्या सूचना व नियमांची केलेली अंमलबजावणी त्यानं हे यश मिळालं. घोषणोच्या वेळी त्यांनी हॅप्पी डान्स करून जल्लोषदेखील केला.जेसिंडा आर्डन जगभरातील तरुणाईच्या आयकॉन झाल्या आहेत. देशावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी त्या ठामपणो उभ्या राहिल्या. अबॉर्शन लॉ, प्रोटेस्टंट-कॅथलिक संघर्ष असो वा दहशतवादी हल्ला त्यांनी ठामपणो सर्वाचा मुकाबला केला.इराकवरील अमेरिकेचा हल्ला असो वा चीन व म्यानमारमधील अल्पसंख्याकांचे शोषण किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचा महिलासंदर्भातील दृष्टिकोन आदी प्रकरणात त्यांनी नेहमी आपली मानवीय भूमिका मांडली.त्यांच्या या कामगिरीबद्दल फोब्र्ज मासिकाने त्यांना 2019 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिलं. तर टाइमनं ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून त्यांचा सन्मान केला.2017 मध्ये पंतप्रधानपदाचा शपथविधी होताच त्यांनी आपण प्रेगनंट असल्याची घोषणा केली.त्यावेळी त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली गेली. त्यांना ट्रोल करण्यात आलं. पण त्यांनी या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. आज त्यांच्या कर्तृत्वाची दखल जगाने घेतली आहे.कोरोनासंकटाशी योग्य सामना केल्याबद्दल झालेल्या सर्वेक्षणात 59.5 टक्क्यांनी त्यांची लोकप्रियता वाढलेली आढळली.त्या न्यूझीलंडच्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधान ठरल्या आहेत. संकटातून बाहेर पडण्यासाठी सुपर पावर असण्याची गरज नाही, हे त्यांनी दाखवून दिलं. योग्य वेळ साधून केलेलं नियोजन आणि त्याचं प्रामाणिकपणो केलेलं पालन महत्त्वाचं हे त्या वेळोवेळी सांगतात.देशातील आणि विदेशातील तरुणांमध्ये ‘तरुण नेता’ म्हणून त्यांची कीर्ती उंचावलेली आहे.

फिजी 

फिजी तसा कमी लोकसंख्येचा गरीब देश. पर्यटन हा देशाचा प्रमुख व्यवसाय.  स्पा, हॉटेलिंग व समुद्र पर्यटनावर देशाचा मोठा जीडीपी उभा आहे. कोरोनासंकट आणि जगव्यापी टाळेबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली.न्यूझीलंड व फिजीत पर्यटन करार आहेत. न्यूझीलंडचे लोक फिजीत व्यवसाय करतात. त्यातून कर रूपात मोठा अर्थलाभ फिजीला होतो. कोरोना संकटानंतर बरेच न्यूझीलंडवासी मायदेशी परतले. त्यामुळे स्थानिक व्यवसाय व व्यवहारावर त्याचा परिणाम  झालाच.फिजीत या रोगराईचा सर्वाधिक फटका तरु णांना बसला आहे. कारण पर्यटनसंबंधी व्यवसायात जसे स्पा, बार, टुरिस्ट ऑपरेटर, गाइड आदीत तरु णांची मोठी संख्या आहे. शिवाय अन्य उद्योगातही तरु णाची संख्या लक्षणीय आहे. बँकॉक पोस्टच्या मते, फिजीत कोरोना संकटामुळे 15000अधिक कामगार प्रभावित झाले आहेत.इतकं गंभीर संकट असूनही कोविडमुक्तीनंतर तूर्तास पर्यटन सुरू करणार नसल्याची घोषणा या देशानं केली आहे.5 जूनला फिजीनं स्वत:ला कोरोनामुक्त घोषित केलं. 9 लाखांची लोकसंख्या असलेल्या या देशात मार्चमध्ये कोरोना संक्रमणाची 18 प्रकरणं समोर आली. मात्र कुणी त्यात दगावलं नाही.आता फिजीत कुणी अॅक्टिव्ह रुग्ण नाही असं सांगत पंतप्रधान फ्रैंक बैनिमारमा यांनी ट्विट करून देशवासीयांना धन्यवाद दिले आहेत.45 दिवसांपासून एकही नवा पेशंट फिजीत आढळला नसून आम्ही कोरोनामुक्त झालो. आमचा रिकव्हरी रेट 100 टक्के राहिला, असं त्यांनी पोस्ट केलं.चक्रीवादळातून सावरतोय तोच कोरोनासंकट नवं आव्हान म्हणून पुढं आलं. या नव्या संकटाचा सामना करण्यासाठी तरु णांनी पुढाकार घेतला.फिजी तरु णांनी टाळेबंदी काळात सरकारला सर्वतोपरी सहकार्य केलं.अनेकांनी आपला व्यवसाय स्वत:हून बंद केला. उपजीविकेच्या संकटापेक्षा त्यांच्यापुढे कोरोनाचं संकट अधिक बलाढय़ होतं. त्यावर मात करण्याची इच्छा बाळगून तरु णांनी जनतेला सरकारी र्निबधांचे कसोशीनं पालन करण्याचं आवाहन केलं. गट स्थापन करून पोलीस व सरकारी यंत्रणोला मदत केली.परदेशातून आलेल्या पर्यटकांची ओळख करून त्यांना आयसोलेट करण्यात आलं. लॉकडाऊन काळात तरु णांच्या गटांनी एकत्र येऊन लहान मुलांच्या शिकवणी घेतल्या.फिजी तरु णांच्या मदतीसाठी कॉमनवेल्थ ऑफ लर्निग आणि  यूएसपी ग्लोबल संस्थांनी पुढाकार घेतला. बँकॉक पोस्ट म्हणते, तरु णांची जगण्यासाठीची ही धडपड होती.  साथीचा रोग नियंत्रणात आणण्यासाठी फिजी तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  ( कलीम मुक्त पत्रकार आहे.)