शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

नया है गरबा मिक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 13:28 IST

दरवर्षी नवरात्रात नवीन ट्रेण्ड येतातच,फॅशनचे, गाण्यांचे, स्टाइल्सचे; पण यंदा मामला जरा वेगळा आहे. यंदा फिटनेस गरब्याचा हात धरत अनेकांनी वजन कमी करण्यासाठी गरबा क्लासेस लावले. आणि त्यांना आवडावं म्हणून गरब्यानंही झुंबा, सालसाचा हात धरत नवीन गिरकी घेतली.. हा बदल नेमका काय आहे?

ठळक मुद्देदरवर्षी नवरात्रात नवीन ट्रेण्ड येतातच,फॅशनचे, गाण्यांचे, स्टाइल्सचे; पण यंदा मामला जरा वेगळा आहे. यंदा फिटनेस गरब्याचा हात धरत अनेकांनी वजन कमी करण्यासाठी गरबा क्लासेस लावले. आणि त्यांना आवडावं म्हणून गरब्यानंही झुंबा, सालसाचा हात धरत नवीन गिरकी घेतली.. हा बदल नेमका काय आहे?

- अनन्या भारद्वाज   

   आज घटस्थापना. नवरात्रोत्सवास प्रारंभ. दरवर्षी गरबा-दांडिया खेळायला तरुण मुलं-मुली जातात. आणि वर्षभराची मरगळ झटकून टाकतात मनातली. आता तर कार्पोरेटवाले खास आपल्या कंपन्यांमध्ये टीम बिल्डिंगसाठी गरबा-दांडिया वर्कशॉप आयोजित करू लागलेत. यंदा तर चित्र असं की अनेक जिमवाले सरसावलेत फिटनेस दांडियासाठी. त्यांनी देशी-विदेशी नृत्य आणि व्यायाम प्रकारांची सरमिसळ करून टाकली आणि ‘गरबा फॉर वेट लॉस अ‍ॅण्ड फिटनेस’ नावाच्या एका नव्याच ट्रेण्डने गेल्या दोन-तीन वर्षात आकार घेतला. यंदा हे फिटनेस गरबे जोरात आहेत. गल्लीबोळातल्या अनेक जिममध्ये गरबा वर्कशॉप घेतले गेले आणि तिथं पारंपरिक गरब्याने साल्साचा हात धरला. सुरती, कच्छी, काठियावाडी, गरबा-भांगडा मिक्स आणि झुंबा स्टेप्सवरही फेर धरू लागला. नृत्य संस्कृतीची सरमिसळ तर या गरब्यानं स्वीकारलीच; पण सोबत अनेक तरुण मुलांना फिटनेसकडे वळण्याचा एक बहानाही दिला.   

   अर्थात, दांडिया के बहाने आ जाना असं म्हणणारे बहाने काही गरबा-दांडियाचे पासेस मिळवण्यासाठी प्रयत्न करणाºयांना नवीन नाही. पण यंदा गरबा शिकणं आणि करणं यावर फिटनेस, स्टॅमिना, स्ट्रेस रिलिज करणं, रीफ्रेश होणं, स्वत:ला रोजच्या जगण्यातून बाहेर काढत, चौकटी मोडत नवीन काही शिकणं यासाºया नव्या गोष्टींचा बराच पगडा दिसतो आहे. आणि केवळ नटणंमुरडणं, कसंही नाचणं यापलीकडे गरब्याच्या स्टेप्स पुन्हा एकदा अनेकजण शिकत आहेत. त्या गरबा स्टेप्स मिक्स आहेत हे मान्य; पण हे गरबा मिक्स आहे मस्त ! आणि नवंही.. येत्या ९ दिवसांत धरलेला फिटनेसचा हा ताल कायम रहावा, दुसरं काय !

सायलेण्ट गरबा ए दिल है मुश्कील नावाचा सिनेमा आठवतो? रणबीर आणि अनुष्का शर्माचा? त्यातला एक सीन आठवा. ते गरबा खेळतानाचा. तर त्यात ते दोघे हेडफोन लावून गरबा खेळताना दिसतात. म्हणजे काय तर जी काय गरब्याची दणदणीत गाणी वाजायची ती गरबा खेळणाºयांच्या कानात वाजतात. बाकीच्यांना ऐकू जात नाही. शांततेत होतो गरबा. तर त्याचं नाव सायलेण्ट गरबा.एरव्ही गरबा-दांडिया मंडळं, डीजेचे आवाज, म्युझिक हे सारं म्हणजे कानाचे पडदे दुखतात. पण हा सायलेण्ट गरबा अनेक प्रश्नांवर उत्तरं सांगतो. यंदा मुंबई, अहमदाबाद येथे काही ठिकाणी असे सायलेण्ट गरबे आयोजित करण्यात आले आहेत. ते पर्यावरणपूरक तर आहेतच; पण स्टाइलही नवीन आहे. हेडफोन लावून खेळायचा गरबा !

टेम्पररी टॅटू

हाता-पायाच्या बोटापासून ते पूर्ण शरीरभर टॅटू काढण्याचे सध्याचे दिवस आहेत. तरुणाई यासाठी विविध डिझाईन स्वत: सिलेक्ट करून किंवा टॅटू आर्टिस्टला सांगून त्यानुसार टॅटू डिझाईन करत आहेत. सध्याच्या टॅटूच्या ट्रेण्डविषयी टॅटू आर्टिस्ट दयानंद देसाई म्हणाला की, परमनंट टॅटूमध्ये रिअलिस्टिक आणि पोट्रेट या दोन प्रकारात मुख्यत्वे टॅटू काढले जातात. यात फुलं, मोर, फुलपाखरू, झाड असे कितीतरी प्रकार येतात. तसंच बोटावर नाव लिहिण्याचीही सध्याची फॅशन आहे. शिवाय लोकांच्या डोक्यात जसा टॅटू काढायचा आहे ते लक्षात घेऊन त्यानुसार डिझाईन करून टॅटू काढला जातो. त्यात आणखी मॉडर्न इफेक्ट देण्यावर भर असतो. कायमचे टॅटू काढायला २५० रुपयांपासून ते पाच हजारापर्यंत खर्च येतो.

एकंदर तरुणाईचा कल टॅटू काढण्याकडे सध्या जास्त आहे. फॅशनच्या ट्रेण्ड्समध्ये सध्या टॅटूप्रेमालाही पसंती मिळते आहे.नवरात्रीसाठी काहीजण टेम्पररी टॅटू काढण्याला पसंती देतात. हे टॅटू साधारण ८ ते १० दिवस टिकतात. यात देवीच्या चेहºयाला पसंती जास्त आहे. तर दंडावर मॉडर्न इफेक्ट दिलेले कलरफुल टॅटूही सध्या लोकप्रिय आहेत.

गरबा फॉर वेटलॉसगरबा फॉर वेटलॉस अशा पाट्या जीमवाले कधी लावतील किंवा असे बोर्ड कधी झळकतील असा आपण कधी विचार तरी केला होता का? पण यंदा हे चित्र दिसलं, लहानमोठ्या शहरांपासून अगदी तालुक्यापर्यंत. फिटनेस आणि वेटलॉस गरब्याचे क्लासेस घेतले गेले. त्यात सालसा, झुंबा, भांगडा अशा विविध स्टेप्सही गरब्याच्या तालावर अनेकांनी शिकल्या. त्यात कार्पोरेट कंपन्यांनी जीमवाल्यांशी टायप करून असे क्लासेसही अनेक ठिकाणी भरवले. साधारण दिवसाला एका क्लासने ४०० ते ५०० कॅलरी बर्न होतात असे दावे केले गेले. आणि १५ दिवसांत वजन कमी करणे ते गरबा शिकणे, करणे, ग्रुपने मज्जा करणे हे सारं अनेकांनी अनुभवलं. गरब्यानंतर हा फिटनेसचा हात कुणी सोडू नये म्हणजे मिळवलं.

चांदीच्या दांडियाबाकी फॅशन आणि गरबा यांचं नातं जुनं आहे. घागरे, कानातले, गळ्यातले यासह अनेक दागिन्यांच्या फॅशन्स दरवर्षी येतात. पण यंदा चर्चा कसली आहे विचारा. चांदीच्या दांडियांची. विशेषत: गुजरातमध्ये हा ट्रेण्ड आला आणि मग तो आपल्याकडेही झिरपला. ९०० रुपयांहून अधिक किमतींना ह्या दांडिया मिळतात. आणि घेणारे घेतातही.. लाकडाला असा चांदीचा फटका बसला म्हणायचा यंदा.