शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

व्हॉट्सअ‍ॅपवर फेक मेसेजची फेकाफेकी करताय?- सावधान, महागात पडेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 15:14 IST

व्हॉट्सअ‍ॅपवर आला एखादा मेसेज, एखादा व्हिडीओ की आपण लगेच तमाम ग्रुप्सवर ढकलून देतो. जे पुढे पाठवलं ते खरंय की खोटं याची काहीच खातरजमा आपण करत नाही. मात्र आता असं करणं महागात पडू शकतं.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपवरील ग्रुपमधील कुणीतरी सदस्य काहीतरी वादग्रस्त पोस्ट शेअर करतो आणि त्याचा परिणाम ग्रुप अ‍ॅडमिनला भोगावा लागल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.

- प्रा. योगेश हांडगे

व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरवल्या जाणार्‍या अफवांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागल्याच्या घटना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह देशभर पाहायला मिळाल्या आहेत.  देशातील 10 राज्यांत एकूण 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  त्यामुळे अशा फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी सरकारही पुढे सरसावलं आहे. फेक न्यूजवर नियंत्नण मिळविण्यासाठी काही उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्र सरकारने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, यू टय़ूब, ट्विटर या कंपन्यांना केल्या आहेत. केंद्रीय माहिती आणि तंत्नज्ञान मंत्नी रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठविल्यानंतर आता व्हॉट्सअ‍ॅपने अफवा रोखण्यासाठी नवं फीचर आणण्याचं आश्वासन दिलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आयटी विभाग आणि गृह विभागासोबत विश्वासात राहून अशा अफवा रोखण्यासाठी काम करावे, असं आवाहनही रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअ‍ॅपला केले.व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खोटी माहिती पसरवून लोकांना चुकीच्या सूचना दिल्या जात आहेत. यामुळेच केंद्र सरकारने व्हॉट्सअ‍ॅपला हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा आदेश दिला होता.जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे 100 कोटी यूझर्स आहेत, त्यापैकी 20 कोटी एकटय़ा भारतात आहेत. दुसर्‍या देशांच्या तुलनेत भारतातील लोक मेसेज, व्हिडीओ किंवा फोटो जास्त फॉरवर्ड करतात. माहिती-तंत्नज्ञान मंत्नालयाने याबाबत व्हॉट्सअ‍ॅपला योग्य उपाय करण्याची सूचना केली होती. त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅपनेही नियमावली तयार केली आहे. भारतात राहणार्‍या यूझर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपने काही बदल केले आहेत. त्यातून आता हे पुढील बदल करण्यात आले आहेत. 

व्हॉट्सअ‍ॅपमधील नवे फीचर्स

* यूझर्ससाठी मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार आहेत.* मीडिया मेसेजसाठी असलेल्या क्विक फॉरवर्ड बटणचाही वापर यूझर्स आता करू शकत नाहीत, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. बनावट यूझर्सचा प्रसार रोखण्यासाठी कंपनीने ही पावले उचलली आहेत.* 6ुंी3ं्रल्ला या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार फेक न्यूज नियंत्नणात आणण्यासाठी  सस्पिशिअस लिंक डिटेक्शन  नावाचं फीचर व्हॉट्सअ‍ॅप देणार. या नव्या फीचरने यूझरला व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज फेक आहे की नाही याची पडताळणी करता येईल.* सस्पिशिअस लिंक डिटेक्शन फीचरद्वारे लिंकमध्ये काही संशयास्पद कंटेण्ट आहे का? ती फेक आहे का? याची खातरजमा व्हॉट्सअ‍ॅपकडून केली जाणार आहे. आणि जर लिंक संशयास्पद किंवा धोकादायक असेल तर लिंकवर लाल रंगाचा धोक्याचा इशारा देण्यात येईल. या धोक्याकडे दुर्लक्ष करत यूझरने ही लिंक ओपन केल्यास यूझर सर्वस्वी त्याला जबाबदार असणार आहे.* ग्रुप सेटिंगमध्ये अ‍ॅडमिनला ‘सेंड मेसेजेस’ असा ऑप्शन मिळेल, ज्याच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कोणते मेसेजे पाठवले जाणार, हे आता अ‍ॅडमिन ठरवणार आहे. *अ‍ॅडमिनने सेटिंग बदलल्यास व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरमुळे यापुढे अ‍ॅडमिनच्या परवानगीशिवाय मेम्बर्स ग्रुपमध्ये मेसेजेस पाठवू शकत नाहीत.*  हे नवं फीचर सध्या अ‍ॅण्ड्रॉइड बिटा 2.18.201 व्हर्जन आणि आयफोनच्या 2.18.70 या व्हर्जनमध्ये देण्यात आलं आहे.* लवकरच हे फीचर अ‍ॅण्ड्रॉइड आणि विण्डोजमध्ये उपलब्ध होणार आहे.* व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनसाठी खास  रिस्ट्रिक्ट ग्रुप फीचर येणार आहे.व्हॉट्सअ‍ॅपवरील ग्रुपमधील कुणीतरी सदस्य काहीतरी वादग्रस्त पोस्ट शेअर करतो आणि त्याचा परिणाम ग्रुप अ‍ॅडमिनला भोगावा लागल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅप रिस्ट्रिक्ट ग्रुप हे फीचर आणणार आहे. सध्या प्रयोगिक अवस्थेतील हे फीचर लवकरच अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.* या फीचरमुळे ग्रुपमध्ये वादग्रस्त पोस्ट शेअर करणार्‍या सदस्याला रिस्ट्रिक्ट करता येईल. असे केल्याने संबंधित सदस्य ग्रुपमधील इतर सदस्यांच्या पोस्ट वाचू शकतो, पाहू शकतो, मात्न स्वतर्‍ काही पोस्ट शेअर करू शकत नाही.

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )