शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

नेटवेडे

By admin | Updated: June 19, 2014 22:00 IST

घरातलं वातावरणच अशांत म्हणून काही जण नेटची पळवाट शोधतात तर काही इतके इंटरनेटला चटावतात की घरातलं वातावरणच नासवून टाकतात. ई-व्यसन सोडवायचं तर आधी मान्य करायला हवं की आपल्याला हे व्यसन आहे.

घरातलं वातावरणच अशांत म्हणून काही जण नेटची पळवाट शोधतात तर काही इतके इंटरनेटला चटावतात की घरातलं वातावरणच नासवून टाकतात. ई-व्यसन सोडवायचं तर आधी मान्य करायला हवं की आपल्याला हे व्यसन आहे.
---------
आमच्या ‘मुक्तांगण’मध्ये व्यसनमुक्तीचं काम करताना, माणसं व्यसनांपायी कशी हतबल होतात, व्यसनांच्या आहारी गेल्यानं कशी स्वत:ला हरवून बसतात हे सारं मी जवळून पाहत होते. पण टेक्नॉलॉजीच्या अतिवापरात कोवळी मुलं हरवून जातील, इंटरनेटचं व्यसन होऊन त्यांना जखडली जातील याची काही कल्पनाच नव्हती. तंबाखू, दारू, सिगरेट, गांजा यासारख्या व्यसनातून लोकांना सोडवण्याचा अनुभव होता, पण हे ‘ई-व्यसन’ समोर आलं तेव्हा जरा आम्हीही थबकलोच. 
मुक्तांगणमध्ये जे इंटरनेट डी अँडिक्शन सेंटर आम्ही सुरू केलं त्याची सुरुवातही अचानकच झाली. एकदा एक पालकच आपल्या मुलाला आमच्याकडे घेऊन आले. म्हणाले, ‘या मुलाला इंटरनेटचं व्यसन लागलंय हो, अशानं पोरगं हाताबाहेर जाईल, त्याला सोडवा या व्यसनातून.’ 
आपल्या मुलाला इंटरनेटचे व्यसन हळूहळू कसे लागत गेले. मुख्य म्हणजे इंटरनेटचा अतिवापर हे एकप्रकारचे व्यसन कसे आहे हे त्यांनीच आम्हाला पटवून दिले.
मग आम्ही त्याच्याशी बोललो. त्याचं नेमकं काय होतंय हे समजून घेतलं. मग लक्षात आलं की, तो जसा चिडतो, जसा अस्वस्थ होतो, जसा आक्रमक, जसा इंटरनेट मिळालं नाही की सैरभैर होतो ते पाहता ही सारं लक्षणं व्यसनाधीनतेचीच होती हे लक्षात आलं. 
ही ई व्यसनाधीनतेची समस्या आम्हालाही नवीन होती. मग आम्हीही या प्रकरणाचा अभ्यास केला. इंटरनेट अँडिक्शन डिसऑर्डर (आयएडी) असं ज्याला म्हणतात ते नेमकं काय असतं हे समजून घेतलं. आणि मग हा उपक्रम सुरू झाला. 
इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीचं आपल्याला अँडिक्शनच झालंय, असं वाटणारी अनेक मुलं आमच्याकडे मग यायला लागली. केंद्रात अँडमिट काही आम्ही या मुलांना करुन घेत नाही, कौन्सेलिंग करतो, त्यांची मानसिकता, नेमका प्रश्न काय आहे हे समजून घेत त्यांना त्यांची लाइफस्टाइल बदलण्यासाठी मार्गदर्शन करतो. अर्थात काही मुलं ही इतकी जास्त अँडिक्ट असतात की त्यांना काही दिवस अँडमिट करून घेण्याशिवाय पर्याय नसतो. 
गेल्या काही दिवसांत आमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे अँडिक्ट होणारी मुलं बहुतांशी मध्यम आणि उच्च मध्यम घरातली असतात. आपल्या मुलांनी स्मार्ट व्हावं,
 जगाशी कनेक्टेड असावं म्हणून आणि शाळा-महाविद्यालयातले प्रोजेक्ट करणं सोपं जावं म्हणून पालकांनीच त्यांना घरी हौशीनं इंटरनेट घेऊन दिलेलं असतं. मोबाइलवरही इंटरनेटचे पॅक उपलब्ध करुन दिलेले असतात. 
आपली मुलं या साधनांचं नेमकं काय करतात हे पहायला पालकांना वेळ नसतोच आणि मुलांशी बोलायला तर नसतोच नसतो. मग ही मुलं त्या जगात स्वत:हून वाहवत जातात.
या मुलांशी बोलताना बाकीही अनेक गोष्टी लक्षात येतात.
 
कटकट्या घरातून सुटका?
त्यांच्या घरात आईवडिलांची सतत भांडणं-वाद सुरू असतात.
 
अनेक घरात आर्थिक समस्या, नेहमीच्या कटकटी, अशांतता यांना मुलं कंटाळलेली असतात.
 
काही मुलं अत्यंत एकेकटी, एकलकोंडी झालेली असतात.
 
त्यांचं अभ्यासात मन रमत नाहीत, ती बुजरी असतात.
 
अशी मुलं चटकन या माध्यमाच्या आहारी जाऊन व्हच्यरुअल जगात शेर झालेली दिसतात.
 
डी अँडिक्शन केंद्रात उपचार काय?
ज्या मुलांना कौन्सिलिंग करून, ज्यांच्या लाइफस्टाइलमध्ये बदल सुचवून त्यांचं अँडिक्शन कमी करता येऊ शकतं त्यांना आम्ही अँडमिट करून घेत नाही.
पण काही मुलांचं अँडिक्शन पराकोटीचं असतं. इतकं की अन्नपाण्यापेक्षा जास्त त्यांना इंटरनेट-मोबाइलची गरज भासते. घरातली माणसं, मित्र, अभ्यास, जगणं यापासूनच ती तुटलेली असतात. त्यांना मात्र आम्ही अँडमिट करून घेतो. पाच आठवडे आमच्या केंद्रात त्या मुलांना ठेवलं जातं. मोबाइल, इंटरनेटचा वापर पूर्ण बंद केला जातो.
त्या काळात या मुलांना तुम्हाला या गोष्टींचं व्यसन लागलंय हे पटवून देणं हेच एक आव्हानात्मक आणि अवघड काम असतं. त्यांचं रोजचं आयुष्य त्यांच्या अशा वागण्यानं किती डिस्टर्ब होत आहे. अभ्यासाकडे, करिअरकडे कसं दुर्लक्ष होतंय, घरच्यांशी तुम्ही कसे वागताय हे पटवून द्यावं लागतं.
 त्यांचेही काही प्रश्न असतात, काही तक्रारी असतात, त्यांना मनमोकळं करायचं असतं, ते सारं शांतपणे ‘ऐकून’ घ्यावं लागतं. हळूहळू मग एकेक उपक्रम सुरू होतात. डायरी लिहिणं, वेगवेगळे खेळ खेळणे, योगासनं करणं, आवडीची पुस्तकं वाचणं, म्युजिक थेरेपी, अभिनय, गटचर्चा असे बरेच प्रकार त्यांच्याकडून करवून घेतले जातात. मग त्यातून ही मुलं जरा खुलतात. नेट नसलं तरी आपल्याला ‘बोअर’ होत नाही, एकेकटं वाटत नाही हे त्यांच्या लक्षात यायला लागतं. नेट नसल्यानं होणारी चिडचिड कमी व्हायला लागते.
त्याचवेळी पालकांचंही कौन्सेलिंग करावं लागतं, मुलांशी थोडी मैत्री करून द्यावी लागते, आणि मग ही मुलं मान्य करतात की, आपल्याला व्यसन लागलं होतं, आणि आपण त्यातून सुटणं हा एक आनंदाचाच भाग आहे. तसा आनंद त्यांना मिळायला लागतो हे महत्त्वाचं.
 
हसर्‍या घरात कटकटी मुलं?
काही कुटुंबात मात्र अशा काही कटकटी नसतात. छान प्रसन्न वातावरण असतं. पण  इंटरनेटच्या वापराला चटावलेली, काहीबाही पाहणं, गेम खेळणं, सतत फोटो शेअर करत गॉसिपिंग करणं या सार्‍याला सरावलेली मुलं स्वत:च विचित्र वागू लागतात.
 
अती इंटरनेट वापरातून काही मुलं चिडचिडी होतात. एकेकटी होतात.
 
अतिवापरानं त्यांची चांगली मनस्थिती बिघडते.
 
घरच्यांशी भांडणं होतात, बहीण भावांशी अबोले धरतात.
 
आपण पोर्न साईट पाहतो किंवा ऑनलाइन गँबलिंग करतो याचा त्यांना गिल्ट वाटतो, तो गिल्ट त्यांना जास्तच अस्वस्थ करतो.
 
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र  
0२0 २६६९७६0५
0२0 ६४0१४५९८
www.muktangan.org
 
- मुक्ता पुणतांबेकर,
संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे
( शब्दांकन - हीनाकौसर खान-पिंजार)