शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नशिला वन वे

By admin | Updated: November 17, 2016 17:20 IST

या मार्गानं गेला तर जगताना मरणयातना आणि उद्ध्वस्त आयुष्य यापलीकडे हाती काही येत नाही. तरीही ड्रग्जच्या आहारी जात व्यसनांच्या गर्तेत का लोटतात तरुण मुलं स्वत:ला?

आहे ना तुझ्यात हिंमत, मग कर डेअरिंग,सिद्ध कर ना की, तू काय पपलू नाहीस..असे डायलॉग मारत एकमेकांना भरीस पाडणारे आणि हातात पेटती सिगारेट देणारे खरं तर दोस्त कसे असतील? म्हणजे आपण त्यांना दोस्त कसे म्हणू शकतो?पण ते असतात.. आणि ‘असल्याच’ दोस्तांच्या प्रभावामुळे,संगतीमुळे आणि त्यांनी दिलेल्या डेअरिंगवाल्या चॅलेंजमुळे अनेकजण अमली पदार्थांच्या व्यसनांच्या नादी लागतात..या व्यसनांना ‘वन वे’ म्हणतात.असा वन वे, जिकडून जगण्याच्या दिशेनं परतीचा मार्ग फार कमी लोकांना सापडतो,आणि बाकीचे काही मात्र आयुष्य उद्ध्वस्त करून घेतया न परतण्याच्या वाटेनं कायमचे पुढे निघून गेलेले असतात..मुंबई-पुण्यासह मोठ्या शहरात हा अमली पदार्थांचा विळखा तरुण मुलांना ग्रासत आहे..त्यांच्यावर उपाययोजना म्हणून पोलीस पथकं जनजागृती करत आहेत, हेल्पलाइन, इन्फोलाइनही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र तरीही आपल्या जगण्याचा स्टेटस सिम्बॉल असल्यासारखे अनेक तरुण व्यसनांच्या गर्तेत स्वत:ला लोटून देत आहेत..एक दिलासा वाटावा अशी गोष्ट म्हणजे पाचशे-हजाराच्या नोटांवर सरकारनं घातलेल्या अलीकडच्या बंदीनं या ड्रग्ज तस्करीच्या व्यवहाराला थोडा आळा बसेल असा पोलिसांचा होरा आहे. कारण अमली पदार्थांचा व्यवहार हा पूर्णपणे रोखीनेच केला जातो. यात पाचशे आणि हजार रुपयांच्या मोठ्या नोटांचा वापर होत होता. या नोटाच चलनातून रद्द केल्यामुळे तस्करीचा वेग कमी झाल्याचं अमली पदार्थविरोधी पथकाचं म्हणणं आहे. त्याचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसांत ड्रग्ज घेण्याचं प्रमाणही कमी होताना दिसेल असा या पथकाचा अंदाच आहे. मात्र त्यापायी तळमळणाऱ्या व्यसनी तरुणांचं आयुष्यही अधिक भयाण होईल हेदेखील खरं आहे..ज्या वाटेवर अशा भयंकर नरकयातना आहेत, त्या वाटेवर मुळातच न जाता, स्वत:ला व्यसनांपासून दूर ठेवणं हेच तरुणांच्या हातात आहे. आणि दोस्तांच्या मर्दानगीच्या बोगस कल्पनांना झिडकारत खऱ्या अर्थानं सुंदर-स्वस्थ आयुष्य जगण्याचे मार्ग शोधणं हेच शहाणपण आहे..त्या साऱ्याची एक विशेष चर्चा.. स्टेटसच्या अमली सिम्बॉलचे बळी