शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

हे काय माझं काम आहे का? - ही वाटणीच आता बाद ठरवायचे दिवस आलेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 5:34 PM

हे काम बायकांचं हे पुरुषांचं, मला अमुक येतच नाही, किचनमध्ये तर पाणीही गरम करता येत नाही, मला बल्ब बदलता येत नाही असं आता तिनं किंवा त्यानं म्हणूच नये,

ठळक मुद्दे कामातून जेण्डर रोल वजा केले तर हातात कौशल्य येतील!

-प्राची पाठक

चौकाचौकात, दारादारात उभे असलेले तरुण असं चित्रं भारतात सगळीकडे दिसतं. एकतर घोळक्यात गप्पा मारायच्या नाहीतर नुसतंच आलं गेलं बघत बसायचं. येणा:या-जाणा:या मुलींकडे पहायचं. हातात मोबाइल घेऊन घराबाहेर येऊन टाइमपास करत तासन्तास उभं राहायचं हे चित्र एरव्हीही दिसतंच.लॉकडाऊनच्या, कोरोनाकहराच्या काळातही हे फारसं बदललेलं नाही. अनेक तरुण भेटतातच एकमेकांना त्यांच्या कटय़ावर.दुसरीकडे काही मुली/महिला रस्त्यावर येऊन केस विंचरणो, तासन्तास कोणाच्या उखाळ्यापाखाळ्या करत बसणं असेही उद्योग करतात. पण त्यांना घरातली कामंही करावीच लागतात.तरुण मुलांना अशी ठरलेली कामं कराच असं काही सहसा बंधन नसतं. अर्थात अपवाद असतीलच. मात्र तरीही जितकं सहज पुरुष/तरुण मुलं घोळक्यात किंवा एकटय़ाने घराच्या बाहेर येऊन तासन्तास टाइमपास करत असलेले दिसतात, तितक्या सहज आणि तितक्या संख्येने स्रिया सार्वजनिक जागी वेळ घालवत असलेल्या दिसत नाहीत. जितक्या प्रमाणात मैदानं, सार्वजनिक ठिकाणं पुरुषांनी व्यापलेली असतात, तितक्या प्रमाणात स्रिया मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. सार्वजनिक जागी आमचाही तितकाच अधिकार आहे, हे सांगायला त्यांना खास चळवळ करावी लागते. कोविड लॉकडाऊनमध्ये तर बाहेरही फारसं जाता येत नाहीये. अशावेळी घरातच बसणं, स्वत:ला स्वत:च रमवणं तितकं सोपं नाहीये, हे लोकांच्या लक्षात आलं. घरातल्या बाईवर कामाचा किती ताण असतो, ते कळू लागलं. ‘ती काय घरीच तर असते’, असं सहजच सांगतांना सकाळी उठून अंगण झाडण्यापासून ते रात्री सगळ्यांची जेवणं झाल्यावर अन्न काढून ठेवून, भांडी घासून, ओटा पुसून झोपेपर्यंत घरात किती काम असतं, ते लोकांच्या लक्षात आलं.जेव्हा स्री घराबाहेर पडली आणि कमवूदेखील लागली, तेव्हा आपण अभिमानाने सांगितलं की, स्रिया आता पुरु षांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिला दिनापुरती लंबीचौडी आदर्शवत भाषणं दिली. पण, आपल्या घरातल्या बाईला आपण तिच्या कामात किती मदत रोज केली? स्रीचं पाऊल घराबाहेर पडलं, त्याच वेळी पुरु षांचं एक पाऊल मात्र घरात पडलं का? घरातलं काम हे कमी दर्जाचं काम आहे आणि ते करणं ही जणू स्रीचीच जबाबदारी आहे, अशा थाटात अनेक तरुण मुलंही वागत असतात. घरातली बाई आजारी पडली, तर घरातली कामं कोण, कशी, किती पैशात आणि किती काळ करू शकेल, याचा विचार केलेला फारसा दिसत नाही. आज हातात आयत्या गोष्टी येत आहेत नां, मग झालं तर. पुढचं पुढे बघू. अशी साधारण समज असते. आपल्या स्वत:च्या आणि आजूबाजूच्या किती घरांमध्ये रोजची जबाबदारी म्हणून स्वयंपाक करणारे पुरु ष दिसतात? पैसा कमावतो, या एकाच लेबलच्या आड लपायचे दिवस आता गेलेले आहेत. घरकाम हे जीवनावश्यक स्किल आहे. त्याला ‘हे काम पुरुषांचं’ आणि ‘हे काम बायकांचं’ असं लेबल द्यायची गरज नसते. किती घरांमध्ये घर आवरणं-झाडणं-पुसणं, भांडी घासणं, धुणं धुवून वाळत घालणं, धान्य पाखडणं, भाज्या नीट स्वच्छ करून साठवणं-चिरणं-शिजवणं, घरातल्या लहान मुलांना अन्न शिजवून खाऊ घालणं, ज्येष्ठांना जेवायला काय हवं नको ते बघणं, आजारी माणसाचं सगळं करणं, ही आणि अशी अनेक कामं करताना मुलं, पुरुष दिसतात? सध्याच्या लॉकडाऊन काळात आपण कसे मॉडर्न आहोत, हे दाखवायला फोटो सेशन करायला नाही म्हणायला काहींनी थोडीफार लुडबुड केली स्वयंपाक घरात. पण रोजची जबाबदारी म्हणून हे काम करणारे किती पुरु ष आहेत? आहेत थोडेफार ..पण फारच कमी.त्याच वेळी बागकाम करणं, घरात लहान मोठय़ा दुरुस्त्या करणं, सिलिंडर लावायला लगेच घरातल्या पुरुषांना हाक न मारणं, घरातली काही उपकरणं उघडून दुरुस्त करणं, गाडय़ांचा मेंटेनन्स करणं हे करणा:यादेखील स्रिया अतिशय कमी दिसतात. रस्त्यात दुचाकी पंक्चर झाली, तर ती पेट्रोल पंपापर्यंत लोटायलादेखील घरी फोन करून कोणी पुरुष बोलवायचा हेपण आता बदलायला पाहिजे.म्हणजेच काय तर जेंडर रोल्समधून आपण आता बाहेरच पडायला पाहिजे. सर्व कामांचा, कौशल्य म्हणून आणि आपण करू शकतो तर का नाही करायचं म्हणून विचार करायला पाहिजे.अमुक कामं याची नि तमुकतिची ही वाटणीच बाद करण्याचे दिवस आले आहेत.

.त्यासाठी काय करता येईल?

1. ज्यांना घरात सगळं आयतं हातात मिळतं, आजवर मिळत आलेलं आहे, ते त्यांचं सुख-सत्ता-आराम सोडून आपोआप घरात काम करायला तयार होत नाही. अनेकांचं कळतं; पण वळत नाही असं होतं. त्यामुळे एकतर त्यांना रोजची काही कामं ठरवून द्यावी लागतील किंवा आपणच ती स्वत:हून आपल्यासाठी ठरवून घेतली पाहिजेत.2. बेसिक घरकाम येणं, ते वरचेवर आणि रोजची जबाबदारी म्हणून करणं, हे तुम्ही स्री असा की पुरु ष की थर्ड जेण्डर अत्यंत जीवनावश्यक स्किल आहे. सगळ्या कामांना माणसं ठेवता येत नाहीत. माणसं पैसे देऊन नेमली, तरी त्यांना नेमकं काय, किती काम द्यावं, त्यांच्या वेळा कशा पाळाव्यात, हेही एक नियोजनच असतं. त्यात तुमच्या आर्थिक स्थितीच्या मर्यादादेखील येऊ शकतात. 3. घरकामात अनेक शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यात वस्तूंचं नियोजन करणं शिकता येतं. टापटीप शिकता येते. आपल्या नेमक्या गरजा जाणून घेता येतात. घरात नेमकं काय आणि किती आहे, त्याचा अंदाज येतो आणि त्यातूनच आपलं बजेटदेखील ठरवता येतं. 4. स्वयंपाक घर तर रासायनिक प्रयोगशाळाच असते. तिथे तुम्ही जे काही कराल, त्याचा रिझल्टदेखील तिथेच लागू शकतो. आपण एक छान काही काम सुरुवातीपासून करून पूर्ण केलं, इतकंच नाही, तर ते उत्तम चवीचं बनलं, असा आत्मविश्वास आपल्याला मिळू शकतो.5. हेल्दी खा, इम्युनिटी वाढवा अशी बॅनरबाजी सर्वत्र होत असताना ते हेल्दी खाणं वगैरे रोजच्या रोज, चारी ठाव बनवायचं कोणी? घरातल्या स्रीनेच तो सगळा ताण स्वत:वर घ्यायचा का? सगळ्यांनी मिळून कामाला हातभार लावला तर हे काम सोपं होऊ शकतं.6. मी पुरु ष असल्याने ही कामं मला जैविकरीत्याच येत नाहीत, करावीशी वाटत नाहीत, या पळवाटांमधून बाहेर पडू या. सायन्सच्या नावाखाली सोयीस्कर आणि अर्धवट माहिती पुढे करून जीवनावश्यक कामं शिकायचं आपण टाळत असतो, ते समजून घेऊ या. 7. एकत्र राहण्यात जितकी गोडी असते, त्याहून अधिक गोडी एकत्न घरची, दारची कामं शेअर करण्यात असते. एकत्र स्वयंपाक करण्यातदेखील झकास शेअरिंग असू शकतं, हे आपण कधी अनुभवणार? त्यातूनच आपल्याला खाद्यपदार्थांची जास्त व्हरायटीदेखील ट्राय करता येईल. रसरसून जगायच्या अनेक संधी घरातच उपलब्ध असतील, हे कळून येईल. करून तर पाहा.. कोण काय म्हणतं, ते विसरून..

(प्राची मानसशास्नसह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्नची अभ्यासक आहे.)