शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

ढाण्या

By admin | Updated: November 19, 2015 21:50 IST

खेडय़ापाडय़ातल्या शाळेत अभिनय शिकवणारा शिक्षक का नाही? या प्रश्नानं त्याला घेरलं आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका तरुणानं गावक:यांच्या मदतीनंच बनवली एक शॉर्टफिल्म.

 - अबोली कुलकर्णी-शेलदरकर

 
खेडय़ापाडय़ातल्या शाळेत
अभिनय शिकवणारा शिक्षक
का नाही?
या प्रश्नानं त्याला घेरलं
आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या
एका तरुणानं गावक:यांच्या
मदतीनंच बनवली एक शॉर्टफिल्म.
त्यात गावकरी सिनेमाची भाषा शिकले
आणि तो जगण्याची.
 
 
 
खेडय़ापाडय़ातल्या मुलामाणसांनी बनवलेल्या
एका वेगळ्याच सिनेमाची गोष्ट
‘प्रत्येक शाळेत चित्रकलेचा शिक्षक असतो, खेळाचा शिक्षक असतो मग अभिनयाचा का नाही? हे वास्तव असलं तरी तितकंच खरंही आहे. आजही खेडेगावातच काय तर शहरातही कुठल्याच शाळा-कॉलेजांत अभिनयाचा मास्तर पहायला मिळणार नाही. टॅलण्ट जरी खेडय़ात असलं तरी तिथं  शास्त्रशुद्ध अभिनयाचं शिक्षण तरी कुठून मिळणार? आणि  कुठला शिक्षक खेडय़ात जाऊन तिथलं ‘हिडन’ टॅलेंट शोधेल? 
जवळपास अशक्यच हे सारं पण कथेवर औरंगाबादेतील एका अभिनयवेडय़ा शिक्षकाने आपल्या विद्याथ्र्याना घेऊन एक शॉर्टफिल्म बनवलीय. 
ही फिल्म बनवली आहे एम.ए.इन थिएटर्स मध्ये मुंबई विद्यापीठात पदवी घेतलेल्या विनय शाक्यनं. औरंगाबादेतील सर्वसामान्य घरातला हा तरुण. 
एकदा अभ्यासक्रमाची असाईनमेंट म्हणून तो सिंदोन गावात पथनाटय़ासाठी गेला. तीनशे-चारशे वस्ती असलेलं ते गाव, बलुतेदारी पद्धतीने लोक त्यांचा उदरनिर्वाह करायचे. आपल्या मुलांना लहानाचं मोठं करून शेतीकडं वळवायचं एवढंच त्यांचं ध्येय. शिक्षण आणि कला याकडे हे लोक कसे पाहतील ? हा मोठा प्रश्न विनयला पडला.  तितक्याच त्याला काहीतरी आवाज आला. 
आवाजाच्या दिशेनं गेला असता त्याला दिसलं की, मातीनं माखलेला शर्ट आणि हाफ चड्डी घातलेली गावातली पोरं सिनेमातल्या हिरोंची डायलॉगबाजी करत होती. त्यात एक त्यांचा म्होरक्या होता. मोठमोठय़ानं सनी देओलचा आवाज काढून दुस:यांना प्रभावित करत होता. विनयही झाडामागे लपून त्यांची अॅक्ंिटग पाहू लागला. एकदम त्याच्या डोक्यात विचार आला, कुठून आली यांच्यात एवढी कला? कुठे शिकले असतील?तेवढय़ात कोणीतरी मोठयांनी आवाज दिला आणि पाहता पाहता सगळी पोरं पसार झाली. त्यातला एका पोराला पकडून विनयनं विचारलं,‘ काय रे, कुठून शिकलात तुम्ही हा अभिनय? तर तो म्हणाला,‘ म्हणजे?’ विनय म्हणाला,‘ अरे कुठे शिकवणी की, शाळेत शिकलात तुम्ही हे सगळं? ’ तो म्हणाला,‘ येडेबिडे झाले की काय तुम्ही? आमाला कुठं शाळेत अभिनयाचा शिक्षक?’ असं म्हणून तो विनयच्या कचाटय़ातून सुटला. त्याच्या शेवटच्या वाक्यानं विनयचं आयुष्यच बदललं. का नाही शाळेत अभिनयाचा शिक्षक? खरं तर असायला हवा.
औरंगाबादला परतल्यावर त्याला वाटलं की, शॉर्टफिल्म बनवली तर जे आपल्याला गावक:यांना सांगायचंय ते कदाचित नीट सांगता येईल. त्यानं ठरवलं  पुन्हा  सिंदोनला जायचं आणि एक शॉर्टफिल्म करायची तिथंच गावक:यांच्या सहकार्यानं. सोबत मित्र होतेच. किमान एखादा महिना तरी मुक्काम पडेल या हिशोबाने ते निघाले. 
गावात आल्यावर गावक:यांचं तेच रूटीन. पोरं शाळेत गेली नाहीतर शेतावरच असली पाहिजेत.  विनयनं सरपंचांशी बोलायचं ठरवलं. सरपंचांना भेटल्यावर त्यांना सांगितलं की, ‘ मी गावात राहून शॉर्टफिल्म तयार करू इच्छितो.’ सरपंच म्हणाले,‘तुमचं तुम्ही काय ते बघा.’ त्यांनी ग्रामसभा बोलावली.पण दवंडीतून विषय कळाल्याने संध्याकाळी सभेला चिटपाखरू आलं नाही. केवळ सरपंच, विनय आणि त्याची टीम. 
विनयला सोडून संपूर्ण टीमला वाटलं की,‘ काय खुळ सरांनी डोक्यात घेतलंय? इथल्या लोकांना काही घेणंदेणं नाही! शाळेत अभिनयाचा शिक्षक असलं काय अन् नसलं काय! आपली धाव मुंबई-पूण्याला वळवायची तर हे काय?पण  विनयला वाटलं खरं चॅलेंज इथेच आहे.दुस:या दिवसापासून विनयने घराघरात जाऊन सर्वाना शॉर्टफिल्मची गरज आणि महत्त्व समजवू लागला. सलग चार ते पाच दिवस त्याचा वेळ सर्वाना समजावण्यातच गेला. सहाव्या दिवशी सरपंचाने गावाच्या मध्यभागी सभा बोलवली. सभेत गाव ही फिल्म करायला तयार झालं.
 
ढाण्याचा शोध..
 शॉर्टफिल्मसाठी पात्रं शोधण्याचं काम सुरू झालं. गावातील काही मंडळी त्याने शॉर्टफिल्मसाठी निवडली. शॉर्टफिल्म ज्या मुलावर असणार आहे त्याचे नाव ‘ढाण्या’ ठेवायचे हे त्याने नक्की केले. स्क्रिप्टमधील भेंडे मास्तर, जयदेव, बच्चेकंपनी त्याने नक्की केली. पण ढाण्याचं काय? त्याच्या पात्रप्रमाणो एकही मुलगा गावात दिसेना. दरम्यान, त्याने मुंबईच्या टीमलाही शॉर्टफिल्मच्या शूटिंगसाठी बोलवले होते. त्या टीमने आल्याबरोबर गावाच्या एका स्पॉटवर शूटींगचे सर्व साहित्य लावायला सुरूवात केली. जवळपास एक दिवस सेट उभारण्यासाठी गेला. विनयही त्याच गडबडीत असतांना कॅमे:यासोबत एक मुलगा खेळत होता. कोणीतरी त्याला दूर करत होते आणि तो मात्र पुन्हा पुन्हा कॅमे:यासमोर यायचा. विनयच्या तीक्ष्ण नजरेतून मात्र तो सुटला नाही. त्याने नक्की केले हाच शॉर्टफिल्मचा ‘ढाण्या’. 
नाटकांत जशी तालीम होते तशीच रिहर्सल या पात्रंची घेण्यात आली. सगळेजण कौतुकाने आणि सहकार्याने शूटिंग एन्जॉय करत होते. ‘लाईट..कॅमेरा..अॅक्शन..एवढा एकच आवाज गावात घुमत होता. गावातच राहून शूटिंग म्हटल्यावर महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे जेवणाचा. हा प्रश्न गावानेच सोडवला. सर्वानी मिळून ‘ढाण्या’च्या टीमला जेवायला घालतं. .  हळूहळू आकार घेत ढाण्या नावाची शॉर्टफिल्म बनत गेली.
 
ढाण्या बनवणारे हात
नुकताच ‘अंबरनाथ मराठी फिल्म फे स्टिव्हल’ मध्ये शॉर्टफिल्म प्रकारात ‘बेस्ट चाईल्ड अॅवॉर्ड ’ मिळाला. ढाण्याची कथा वास्तवात आणण्यासाठी टीम अहोरात्र कथेवर काम करत होती. दिग्दर्शक विनय शाक्य - रवि धनवे, संजय गुजर, रोहित शिलवंत,  रवि धनवे, नवीन मोरे, गौर,  समीर गायकवाड, स्वप्नील माळी- ऋषीकेश होशींग,  स्वरूपा शाक्य- फारू क शाह, प्रकाश वाघ, श्याम लगड, निखील सुरज, संजय गुजर  नारायण गुजर, प्रतिक लाड, स्मिता पाटील , मंजुषा पिंपळवाडकर, फारूख शाह, नितीन तेलगावकर , मोहित गुजर , आरमान शेख, देवांशु साळुंके, आनिष खेमनार, संभाजी शिंदे , वैभव बेलसरे, समर्थ चौधरी, रोहित कंबार, दिनेश कदम, अमोल पाटील, पवन साळवे, परम वानारे, सुदर्शन सिद, प्रांजल पिंपळकर, श्रीराम शिंदे, कृष्णा बडे, सिद्धेश्वर सूर्यवंशी, सुयोग कुलकर्णी, शुभम हुंडीवाले, पल्लवी शिंदे, कोमल बरडे, राहुल घोडके, शरयू शिंदे, अमृता राठोड, नन्नवरे सर.