शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

चाय में बारीश की मिलावट!

By admin | Updated: July 6, 2016 17:27 IST

आज आॅफिसमधून जरा लवकर बाहेर पडलो, आजची संध्याकाळ थोडी जरा वेगळीच वाटली. पावसची रीमझिम सुरु झाली होती.

- सुयोग काळे 
आज आॅफिसमधून जरा लवकर बाहेर पडलो, आजची संध्याकाळ थोडी जरा वेगळीच वाटली. पावसची रीमझिम सुरु  झाली होती. लोकांची घरी जायची लगबग दिसत होती. मी ही नेहमी प्रमाणे बस  स्टॉपकडे वळलो. पण मन काही घरी जायच्या बेतात दिसत नव्हतं. 
काय हे रोजचं झालाय मशीन प्रमाणे आपण जगतोय. ठरलेल्या वेळेत आॅफिसला पोहचायचं आणि उशिरापर्यंत काम करून घरी परतायचं. 
पण आज नाही, आज थोडे थांबायचं.  आज थोडावेळ का होईना स्वत:चं लाईफ जगायचं. 
मागे वळलो , समोर बरीस्ता दिसलं. वाटलं जावं आणि एक कॉफी मागवावी. पण तिथं पैशाच्या साºया दिखाव्यापुढे मन रमायचं नाही, असं वाटलं. मग पलीकडे तिकडे चहाची टपरी दिसली, चला तिकडे पोचलो. 
वाटलं मित्रांना फोन करावा, पाहू कोण येतंय का?? नको तीच परत ठरलेली कारणं!
 ‘नाही रे अजून आॅफिसमध्येच आहे, खूप काम आहे!’ 
एक चहा चा कप उचलला, खिशात वाजणारी चिल्लर शांत केली. साडेपाच फुटाचा माणूस पाावसापासून वाचेन एवढ्या आडोश्याला जायून उभा राहिलो. पण तरीही मला हरवायचं असं काय त्या पावसानं ठरवलं होतं.  पावसाचा एक थेंब चहाच्या कपात. त्यानंतर अजून एक- दोन थेंब. मी ही हसलो, वा चाय में बारीश की मिलावट!  
मनही हसलं , का रे आज तुला मित्रांची आठवण नाही का येत? मी ही थोडा सावरतच, असं अचानक याला काय झालं?  मित्र तर असतातच, त्यांची आठवणही येतेच. पण आता पहिल्यासारखं नाही जमत  सारखं मित्र मित्र करायला. प्रत्येकाला स्वप्नाचं आकाश आहे, ते मिळवण्यासाठी  प्रत्येकाच्या पंखांत धडपड आहे. मग कशाला कुणाला आडवायचे.
खरंतर चार पावलं मागे गेलं  कुणाला आवडणार नाही. ते बालपण आणि कालचे कॉलेज लाईफ, कट्यावरची भांडण. पण असं मागे जाता येत नाही, कधीच!
विचारात असं हरवून, पावसातला चहा पिऊनही झाला.
शेजारी बस स्टॉपवर बस उभी होती. बास झालं, ही शेवटची बस आहे.  निघायलाच हवं. बसमध्ये चढलो, परत मी एकटा माझ्या एकट्या मनाबरोबर, माझ्या रोजच्या आयुष्यात परतलो!