शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

फायटर क्रिकेटर होणं कसं साधलं मिताली राजला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:50 IST

20 वर्षाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रि केट खेळणारी ती पहिली महिला खेळाडू. आणि एकूण क्रिकेटचा विचार करता, सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या आणि जावेद मियांदाद यांच्यानंतर चौथी.

ठळक मुद्दे भारतीय महिलांना वर्ल्डकप जिंकून द्यायचा हे तिचं स्वप्न आहे. बघूया ते तिला जमतं का?

- स्वदेश घाणेकर

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग (जस्ट एंट्री झालेला), व्हीव्हीएस लक्ष्मण हे पाच दिग्गज भारतीय पुरुष क्रिकेट संघात असताना क्रिकेटचा रोमांच किती टोकाचा असेल याची जरा कल्पना करा. भारतीय क्रिकेटनं जागतिक क्रिकेटवर आपली दादागिरी चालवायला सुरुवात केली तो हा काळ.  एकसेएक खेळाडू. त्यांचे डोंगराएवढे विक्रम असं सारं सुरू होतं. भारतीय संघाची यशस्वी सलामीची जोडी म्हटलं की तेंडुलकर-गांगुली ही नावंच समोर येणार. मधल्या फळीत द्रविड-लक्ष्मण यांची विकेट काढणंही अवघड. त्यानंतर आला सेहवाग. अखेरची षट्कं झोडून काढायला. या सार्‍यात भारतीय महिला क्रिकेटकडे आणि त्यातल्या खेळांडूकडे कुणाचं लक्ष जाणार होतं? मात्र त्याच काळात तिनं क्रिकेट पदार्पण केलं. त्यावेळी महिला क्रिकेटकडे ना पैसा होता, ना स्पॉन्सर्स, ना सामने लाइव्ह दाखवणं. पुरुष क्रिकेटपटूंच्या मक्तेदारीत तिला खेळाडू म्हणून, उत्तम क्रिकेटपटू म्हणून आपली ओळख घडवणं फार अवघड होतं. आपला स्वतर्‍चा असा ठसा उमटवण्याच्या निर्धारानं आलेली ती सावळी, सडपातळ (हडकुळी म्हटलं तरी चालेल) अशी मुलगी. पण पदार्पणाच्या  सामन्यात तिने ज्या आत्मविश्वासाने खेळ केला त्याचे दाखले आजही द्यावेसे वाटतात. आणि महिला क्रिकेटपटूच काय, पण पुरुषक्रि केटपटूंनाही काही न जमलेले विक्र म तिने मागील दोन दशकात स्वतर्‍च्या नावावर केलेत.मिताली राज. तिचं नाव मिताली की मिथाली हे सांगण्यापासून तिच्या वाटय़ाला संघर्ष आला. आर्यलड विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात 114 धावा तिनं चोपून काढल्या. 2002 मध्ये कसोटीत पदार्पण केले आणि तिसर्‍याच सामन्यात 214  धावांची मॅरेथॉन खेळी करून वर्ल्ड रेकॉर्डला तिनं गवसणी घातली. एखाद्या महिला क्रि केटपटूनं केलेली ती तेव्हाची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. त्यानंतर रेकॉर्ड आणि मिताली यांची जणू गट्टीच जमली. नुकताच भारतीय महिल संघाचा आफ्रिकेविरुद्ध वन डे सामना झाला. त्यात मितालीनं एक विलक्षण विक्रम नावावर केला. आंतरराष्ट्रीय क्रि केटमध्ये 20  वर्षाहून अधिक काळ सक्रिय राहणारी ती जगातली पहिली महिला खेळाडू बनली. पुरुष क्रिकेटपटूंशी तुलना केली तर सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या आणि जावेद मियांदाद यांच्यानंतर ती चौथ्या स्थानावर येते. गेली दोन दशकं ती भारतीय महिला क्रिकेट खेळत आहे आणि संघात आत-बाहेर होऊनही परफॉर्म करत आहे.खरं तर भारतीय महिला क्रि केटला एक ग्लॅमरस चेहरा होता तो मितालीच्या रूपाने मिळाला.  पण हे ग्लॅमर रूपातून नव्हे तर कामगिरीतून मिळवलेलं होतं. महिला क्रि केटपटूंत वन डे क्रि केटमध्ये सहा हजार धावा करणारी ती पहिली खेळाडू.. ट्वेंटी-20 क्रि केटमध्ये (पुरु ष व महिला) 2000 धावांचा पल्ला पार करणारी पहिली खेळाडू. वन डेत सलग सात अर्धशतकं झळकावणारी पहिली खेळाडू.. वन डेत सर्वाधिक अर्धशतकं नावावर असलेली महिला खेळाडू.  वर्ल्डकप स्पर्धेत 1000 धावा नावावर असलेली पहिली भारतीय असे अनेक विक्रम तिच्या नावावर आहेत.पण याही पलीकडे मिताली बंडखोर म्हणूनही ओळखली जाते. तो तिचा मूळचा स्वभाव नाही; परंतु कधीतरी आडवाटेनं जावं लागलं. पुरु षांप्रमाणे महिला क्रि केटला महत्त्व जे आता दिले जात आहे, त्याचं श्रेय मिताली आणि तत्कालीन सहकार्‍यांना नक्की द्यायला हवं. पण सातत्यानं महिला क्रिकेटला दिल्या जाणार्‍या सापत्न वागणुकीवर तिने प्रहार केला. महिला क्रिकेट सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचा मुद्दा तिने उचलून धरला आणि तडीसही नेला..राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात वयाच्या 19 व्या वर्षापासून सुरू झालेला हा क्रिकेट प्रवास गेली 20 वर्षे सुरू आहे. शाळेत मोठय़ा भावासोबत तिने गिरवलेले क्रिकेटचे धडे आणि प्रसंगी नेट्समध्ये मुलांसोबत सराव करून दिग्गज क्रिकेटपटू बनण्याचा मितालीचा ध्यास मोठा होता. एवढा प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळताना दर्जा आणि फिटनेस सांभाळणं हे तिनं उत्तम साधलं आहे.येत्या 2021च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर मिताली निवृत्ती घेण्याची दाट शक्यता आहे. भारतीय महिलांना वर्ल्डकप जिंकून द्यायचा हे तिचं स्वप्न आहे. बघूया ते तिला जमतं का? कारण आजवर फायटर म्हणूनच तिची ओळख आहे.