शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मिस ट्राफिक पोलीस

By admin | Updated: February 8, 2017 15:22 IST

... सक्काळी सक्काळी या चौकातली ही गर्दी. अश्शीची ठरलेली. नेहमीप्रमाणे डावीकडच्या सिग्नलचं ट्रॅफिक इथपर्यंत आलंय आणि इथे उजवीकडे हा दुसरा सिग्नल लागलाय. गाड्याच गाड्या. हॉर्न आणि धूर... तरीपण अशी गर्दीतून वाट काढत चालण्यात वेगळीच मजा आहे. सगळं जग सिग्नल सुटायची वाट बघत थांबलंय.

- प्रसाद सांडभोर

... सक्काळी सक्काळी या चौकातली ही गर्दी. अश्शीची ठरलेली. नेहमीप्रमाणे डावीकडच्या सिग्नलचं ट्रॅफिक इथपर्यंत आलंय आणि इथे उजवीकडे हा दुसरा सिग्नल लागलाय. गाड्याच गाड्या. हॉर्न आणि धूर... तरीपण अशी गर्दीतून वाट काढत चालण्यात वेगळीच मजा आहे. सगळं जग सिग्नल सुटायची वाट बघत थांबलंय.आपण मात्र मनमौजी - आपले आपले चालतोय. रोजचीच गर्दी, रोजचाच रस्ता आणि रोजचीच मजा... अरेच्चा! आज सिग्नलजवळ चक्क ट्राफिकपोलीस उभी आहे!मिस ट्रॅफिक पोलीस म्हणावं का? आपल्याएवढीच दिसतेय वयाने एखाददोन वर्ष पुढेमागे... नाकावर मास्क लावलंय. पाठीवर सॅक अडकवलीय...सिग्नलच्या बॉक्समध्ये हात घालून काय बरं करतेय ती?... ओह, गर्दीनुसार बटण दाबून सिग्नलची वेळ अ‍ॅडजस्ट करतेय. बाप रे! कसलं काम आहे हे.किती वेळाची ड्यूटी असत असेल? किती वेळ असं एकाजागी उभं राहायचं?उन्हापावसात - हॉर्न - धुरात? मी जरा जास्तच रोखून पाहतोय का?तिनं का बरं असं पाहिलं आत्ता माझ्याकडे?चलो बाबू, ट्राफिक कण्ट्रोलला असली तरी पोलीस आहे ती!***पटपट चालायला हवं नाहीतर गॅलरीतला सूर्यास्त मिस होणार! या गर्दाळलेल्या लोकांना सूर्यास्त - संध्याकाळ - कशाचीच काही फिकीर नाही. हे काय? मिस ट्रॅफिक पोलीस अजूनही इथेच! संपूर्ण दिवसभर इथेच होती ही? आता तर सिग्नल पूर्णच बंद पडलाय वाटतं - हातवारे करून काम चाललंय एकटीचं... ट्राफिक पोलीस का बरं बनली असेल ही मुलगी? कधी ठरवलं असेल? केवढी एनर्जी लागत असेल दिवसभर? - कसं बरं मॅनेज करत असेल असं काम? मलाच उगीच वाटतंय की खरंच हसली ती आत्ता माझ्याकडे पाहून? ओळख काढून बोलावं का? विचारावेत सगळे प्रश्न?आत्ता नको नंतर कधीतरी.  

xprsway@gmail.com